Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bank FD Rate High: सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरात केला बदल; सर्वाधिक व्याजदर 9.60%

Bank FD Rate High: देशातील खासगी क्षेत्रातील सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने (Suryodaya Small Finance Bank) त्यांच्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार बँकेच्या नियमित ग्राहकांना 5 वर्षाच्या एफडीवर 9.10% व्याजदर दिला जाणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 9.60% व्याजदर देण्यात येणार आहे.

Read More

McDonald's Fine: McDonald's मध्ये घडलेल्या किळसवाण्या प्रकारामुळे कंपनीला 5 कोटींचा दंड

McDonald's Pay Fine of Rs 5 crore : विविध फूड ब्रँड्सच्या मोठमोठ्या जाहिराती बघून आपण खाद्यपदार्थांच्या मोहात पडतो. पिझ्झा, बर्गर, नूडल्स आणि फ्रँकीज सर्वांना खाऊ वाटते. भूक लागली की आजच्या तरुण पिढीतील अनेक जण मॅकडोनाल्डकडे धाव घेताना दिसतात. मात्र ही बातमी वाचून मॅकडोनाल्ड मध्ये जाऊन मनसोक्त बर्गरआधी तुम्ही नक्कीच विचार कराल.

Read More

Summer Products: अवकाळी पावसामुळे AC, कूलर, फ्रिजची विक्री रोडावली; FMCG कंपन्यांनाही फटका

AC, कूलर, रेफ्रिजरेटर तसेच आइसक्रीम, शीतपेयांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. मात्र, यंदा अवकाळी पावसाचा परिणाम उत्पादनांच्या मागणीवर झाला आहे. उत्तर भारतातील मार्केटवर अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम झाला. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्याचा परिणाम ग्राहकोपयोगी वस्तू आणि FMCG उत्पादनांच्या विक्रीवर झाला.

Read More

Money Laundering Control Act : काळा पैसा पांढरा करणं आता होणार कठीण, सरकारचा नवा नियम काय?

Money Laundering Control Act : देशात काळ्या पैशावरून वादंग सुरू आहे. त्यात मनी लॉन्ड्रिंग कायद्यात सरकारनं बदल केले आहेत. काळा पैसा आणि त्यासंबंधीच्या घडामोडी रोखण्यासाठी, त्यावर अंकुश ठेवता येण्यासाठी हा बदल करण्यात आलाय.

Read More

Railway Reservations Plans Open: गणपतीला कोकणात जाताय! रेल्वेच्या कन्फर्म तिकिटांसाठी 'या' तारखांवर लक्ष द्या

Railway Reservations Plans Open: गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी पुढील 15 दिवस महत्वाचे आहेत. कारण सप्टेंबर 2023 या महिन्यातील रेल्वे प्रवासाची आगाऊ तिकिट बुकिंग प्रक्रिया IRCTCच्या वेबसाईटवर सुरु झाली आहे. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजी असून त्यासाठीची आगाऊ तिकिट बुकिंग पुढील आठवडाभरात सुरु होणार आहे.

Read More

Manappuram Finance: मनी लाँड्रींगप्रकरणी इडीची मणप्पुरम फायनान्सवर कारवाई; 143 कोटींची संपत्ती गोठवली

देशातील आघाडीच्या नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्युशन (NBFC) मणप्पुरम फायनान्स या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने (ED raid On Manappuram Finance) कारवाई केली. कंपनीची 143 कोटी रुपयांची मालमत्ता इडीने गोठवली आहे. मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ठेवीदारांकडून अवैधरित्या पैसे गोळा केल्याचा आरोपही कंपनीवर आहे.

Read More

Online Fraud Alert: जामताराहून पाठवली AnyDesk ची लिंक आणि काही मिनिटातच बँक खातं झालं रिकामं!

जामतारा येथील सायबर चोरांनी AnyDesk च्या सहाय्याने मुंबईतील एका वृद्धाचे बँक डीटेल्स मिळवले आणि काही मिनिटातच त्यांच्या खात्यातील 1 लाख 80 हजार रुपये लंपास केले. खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर चोराला फोन करायचा प्रयत्न केला मात्र फोन क्रमांक स्वीच ऑफ दाखवला जात होता...

Read More

Startup layoffs : थांबता थांबेना स्टार्टअप्समधलं लेऑफ, भरतीमधल्या त्रुटीचं कारण देत मीशोनं 251 कर्मचार्‍यांना काढलं

Startup layoffs : देशभरातल्या स्टार्टअप्समधलं लेऑफ काही थांबायला तयार नाही. आता मीशोनं आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करून त्यात आणखी भर घातलीय. इतर कंपन्यांप्रमाणं आर्थिक कारण देत आपल्या भरतीमध्येच त्रुटी असल्याचं सांगत कर्मचाऱ्यांना घरी पाठवलंय.

Read More

El Nino : खरीप पेरणीसाठी बियाणांची उपलब्धता तपासावी, एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यांना केंद्राच्या सूचना

El Nino : एल निनोच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत. आधीच विविध राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यात आता एल निनोचं संकट कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सावधानतेचा इशारा दिलाय.

Read More

Food Inflation: हॉटेलमधलं जेवण महागलं, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचं बजेट बिघडलं…

एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान CRISIL Research या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात याचा तपशील प्रकाशित केला आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत 9% ने वाढ झाली आहे, तर मांसाहारी थाळीच्या किमतीत 32% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे...

Read More

Top 5 Fellowships in India: भारतातील 'या' टॉप 5 फेलोशिप देतात, 75 हजार रुपयांपर्यंत मानधन

Top 5 Fellowships in India: केंद्र आणि राज्य सरकार, विविध शैक्षणिक व्यवस्थापन दरवर्षी लाखो भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शैक्षणिक पदव्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी विविध शिष्यवृत्ती आणि फेलोशिप देतात. त्यातील टॉप 5 मध्ये येणाऱ्या फेलोशिप कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

Food ministry on edible oil price : खाद्यतेलाच्या किंमती कमी करा, किरकोळ विक्रेत्यांना सरकारचं आवाहन

Food ministry on edible oil price : जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनीही त्या कमी कराव्यात, असं अन्न मंत्रालयानं म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून चढ्या दरानं ग्राहकांना खाद्यतेल खरेदी करावं लागतंय. या निर्णयामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Read More