Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Eicher Motors Profit: आयशर मोटर्सच्या नफ्यात 48 टक्क्यांनी वाढ; कंपनीने जाहीर केला लाभांश

Eicher Motors Profit Q4: वर्ष 2023 च्या मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीचा अहवाल जाहीर केला. या तिमाहीत आयशर मोटर्सच्या (Eicher Motors) नफ्यात 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीला झालेल्या या नफ्यामुळे कंपनीने भागधारकांना प्रति शेअर 37 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

Read More

Sovereign Gold Bond: 2018 मधील गोल्ड बाँडमधून गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट; मुदतपूर्व पैसे काढण्याची तारीख चेक करा

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी सॉवरिन गोल्ड बाँड (SGB) मध्ये गुंतवणूक केली होती त्यांना पाच वर्षानंतर दुप्पटीने फायदा झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Premature redemption price जाहीर केली आहे. म्हणजेच या बाँडमध्ये जी गुंतवणूक केली होती ती मुदतपूर्व काढून घेता येणार आहे.

Read More

Asian Paints Q4 result: एशियन पेंट्सच्या नफ्यात 44% वाढ; भागधारकांना लाभांशही जाहीर

भारतातील आघाडीची पेंट निर्मिती क्षेत्रातील कंपनी एशियन पेंट्सने आज (गुरुवार) तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 44% वाढ झाली. 2023 आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला 1,234.14 कोटी रुपये नफा झाला. भागधारकांना प्रतिशेअर 21.25 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

Read More

FIR Against Ashneer Grover: भारतपे चे माजी एमडी अश्नीर ग्रोवर विरोधात गुन्हा दाखल, 81 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

FIR Against Former Bharat Pay MD Ashneer Grover: शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनचे जज अश्नीर ग्रोवर यांच्यावर भारतपे च्या विद्यमान प्रमुखाने 81 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत बुधवारी (दि. 10 मे ) अश्नीर ग्रोवरविरोधात एफआयआर दाखल केली.

Read More

Indian startups : भारतातले स्टार्टअप्स व्हेंटिलेटरवर! 9 वर्षात यंदा मिळाला सर्वात कमी निधी

Indian startups : उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीची स्टार्टअपची संकल्पना भारतात व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळतंय. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधा त्यातही निधीचा पुरवठा योग्यप्रकारे होत नसल्यानं स्टार्टअपची स्थिती फारशी चांगली नसल्याचं दिसून येतंय.

Read More

धार्मिक संस्थांना केलेले दान घोटाळ्यांमध्ये व्यर्थ जावू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर दान करताना अशी काळजी घ्या

Religious Organization Scams: नागपूर शहरात उमरेड रोडवर असलेल्या प्रसिद्ध ताजाबाद दर्ग्याचे हजरत बाबा ताजुद्दिन नावाने एक ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे माजी अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार आणि माजी सचिव इक्बाल बेलजी यांनी मिळून 1 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. अशा घोटाळ्यांचे आपण बळी पडू नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, ते आपण जाणून घेऊया.

Read More

Dr Reddy's Q4 Profit: डॉ. रेड्डी कंपनीचा नफा 959 कोटींनी वाढला; भागधारकांना लाभांशही जाहीर

फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या डॉ. रेड्डी कंपनीच्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात 959 कोटींची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच काळात कंपनीने फक्त 87.5 कोटी रुपये नफ्याची नोंद केली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने 40 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची शिफारस केली आहे. अमेरिकी मार्केटमधील चांगली कामगिरी आणि त्वचारोगावरील औषधांची विक्री वाढल्याने कंपनीचा नफा वाढला.

Read More

Food Order From ONDC: सरकारी ONDC प्लॅटफॉर्मवरुन फूड ऑर्डर कसे कराल? स्टेप बाय स्टेप गाइड

आता ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यासाठी फक्त झोमॅटो आणि स्वीगीवर विसंबून राहण्याची गरज नाही. सरकारी ONDC प्लॅटफॉर्मद्वारेही तुम्ही घरबसल्या आवडती डीश ऑर्डर करू शकता. फ्री डिलिव्हरी आणि ऑर्डरवर चांगला डिस्काउंटही मिळू शकतो. ONDC वरून ऑर्डर कशी करता येईल, हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया.

Read More

Waayu app : ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप घेऊन आलाय अभिनेता सुनील शेट्टी! स्विगी, झोमॅटोला देणार टक्कर!

Waayu app वर स्विगी आणि झोमॅटोच्या तुलनेत अधिक स्वस्त दरात जेवण ऑर्डर करता येणार आहे. ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने’ हे अ‍ॅप लॉन्च केले आहे. Indian Hotel and Restaurant Association ही देशभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना आहे. स्विगी, झोमॅटो आणि तत्सम फूड डिलिव्हरी अ‍ॅपमुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होत होते, आता मात्र त्यांना कमिशन द्यायची गरज भासणार नाहीये...

Read More

Onion Economy In Lasalgaon: लासलगावचा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय! सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Onion Economy In Lasalgaon: सलग दुसऱ्या वर्षी कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने इथला कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पुढल्या हंगामात कांद्याची शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.यासंदर्भात नुकताच महामनीच्या टीमने थेट लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांद्याचे अर्थकारण जाणून घेतले.

Read More

Food on Wheels: मुंबईत फूड ट्रकला परवानगी, कोळीवाड्यातील खाद्यसंस्कृतीला मिळेल नवी ओळख

परवानगी असलेल्या फूड ट्रकला 24 तास सेवा देता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या निविदेनुसार केवळ कोळी आणि मच्छिमार समुदायातील नागरिकांना फूड ट्रकची परवानगी दिली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोळी महिला बचत गटांना फूड ट्रकची परवानगी दिली जाणार आहे.जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

Employability of Transgenders: तृतीयपंथीयांना रोजगारक्षम बनवण्यासाठी धडपडणारी निष्ठा निशांत!

Nishtha Nishant: अजूनही तृतीयपंथी व्यक्तींना समाज मान्यता मिळत नाही. रोजगाराची संधीच जर उपलब्ध नसेल तर तृतीयपंथीयांना बाजार मागण्याशिवाय आणि देहविक्री करण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु हे दोन्ही पर्याय पैसा जरी देत असले तरी आत्मसन्मान मात्र मिळवून देऊ शकत नाही हे निष्ठाला माहित होतं. जाणून घेऊयात तृतीयपंथीयांना रोजगारक्षम बनवण्यासाठी धडपडणाऱ्या निष्ठाचा प्रवास...

Read More