• 07 Jun, 2023 23:55

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Layoffs : अ‍ॅपलमधून कोणालाही गमवावी लागणार नाही नोकरी, काय म्हणाले टीम कुक?

Apple Layoffs : अ‍ॅपलमधून कोणालाही गमवावी लागणार नाही नोकरी, काय म्हणाले टीम कुक?

Apple Layoffs : विविध कंपन्यांमधून नोकरकपात होत असताना अ‍ॅपलमधून मात्र दिलासादायक बातमी समोर आलीय. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी नोकरकपातीसंदर्भात एक वक्तव्य केलं असून यामुळे अनेकांना विशेषत: अ‍ॅपलमधल्या कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

अ‍ॅपल (Apple) कंपनीतून कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्याचा विचार नसल्याचं कंपनीचे सीईओ टीम कुक (Tim Cook) यांनी म्हटलंय. कर्मचाऱ्यांना काढून टाकणं हा कंपनीसमोरचा सर्वात शेवटचा पर्याय असतो. अ‍ॅपल मात्र सध्यातरी असं काहीही करणार नाही, अशी ग्वाही कुक यांनी दिलीय. ते म्हणाले, की कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याचं कोणतंही नियोजन सध्या आमच्याकडे नाही. मात्र खर्च कमी करण्यावर आमचा निश्चितच भर राहणार आहे. जेवढे कर्मचारी आवश्यक आहेत, तेवढ्याच कर्मचाऱ्यांची भरती करण्यावर कंपनीचा भर असणार आहे. थोडक्यात नोकऱ्यांमध्ये कपात (Layoffs) करण्याऐवजी कमी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, म्हणजे नंतर नुकसान होतंय म्हणून कोणालाही बेकार होण्याची गरज नाही, असं स्पष्ट मत टीम कुक यांनी मांडलंय.

कंपन्यांचा नियोजनशून्य कारभार

मागच्या काही महिन्यांत कंपन्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका अनेकांना बसला. अनेक तरुणांना आपला रोजगार गमवावा लागला. प्रामुख्यानं कोविडनंतर नुकसान झाल्याचं कारण देऊन खर्च कमी करण्याचं कारण या कंपन्यांकडून सांगण्यात आलं. अनावश्यक नोकरभरती केल्यानं खर्च वाढल्याचंदेखील अनेक कंपन्यांचं मत होतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, मेट (फेसबुक), अ‍ॅमेझॉन यासोबतच आयटी कंपन्यांमधल्या अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात आली. अनेक कंपन्यांनी तर नोकरकपातीचे टप्पेच ठरवलेत. प्रत्येक टप्प्यात कर्मचारी कपातीचा भलामोठा आकडा समोर आला आणि अजूनही येत आहे. त्यात आपल्या बाजारातलं मूल्य आणि प्रतिष्ठा अ‍ॅपलनं कायम ठेवल्याचंच दिसून येतंय.

अ‍ॅपलचं स्पष्ट धोरण

कर्मचारी कपातीसंदर्भात अ‍ॅपलचं धोरण स्पष्ट असल्याचं टीम कुक यांच्या वक्तव्यावरून लक्षात येतं. आम्ही आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला बेकार होऊ देणार नाहीत. खरं तर नोकरकपात हा कोणत्याही कंपनीसमोरचा शेवटचा पर्याय असतो. त्याआधी अनेक बाबींचं नियोजन कंपन्यांनी करायला हवं. आर्थिक बाबी महत्त्वाच्या आहेत. भरती करतानाच याबाबींचा विचार व्हायला हवा. आम्हीदेखील भरती करताना आवश्यक तेवढ्याच कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेत असतो, असं टीम कुक यांचं म्हणणं आहे.

पूर्वीपेक्षा कमी संधी

अ‍ॅपलचं कर्मचाऱ्यांसंदर्भात नेमकं काय धोरण आहे, याविषयी सीएनबीसीनं एक रिपोर्ट दिलाय. या रिपोर्टनुसार, अ‍ॅपल कंपनी अत्यंत मोजक्या कर्मचाऱ्यांना कामावर घेत आहे. जेवढे कर्मचारी आवश्यक आहेत, तेवढ्यांनाच जॉब दिला जाईल. त्यामुळे एखाद्या महिन्यात मागणी कमी झाली किंवा इतर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तर त्याला तोंड देण्यासं कंपनी सज्ज राहणार आहे. खर्च कमी करण्याच्या मार्गांचाही कंपनी शोध घेत आहे. पूर्वीपेक्षा कमी कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे जॉब दिला जात आहे. त्यामुळे खर्च आपोआपच कमी होणार आहे. 

कंपनीच्या विस्तारावर भर

एकीकडे इतर कंपन्या तोट्यात असल्याचं कारण देऊन कर्मचाऱ्यांना घरी पाठवत असताना अ‍ॅपलनं मात्र वेगळी वाट निवडलीय. व्यवसायविस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यात कंपनीनं यशदेखील मिळवलं. कंपनीकडे 975 पेड सबस्क्रिप्शन असल्याचं टीम कुक यांनी सांगितलं. ही विक्रमी संख्याच अ‍ॅपलंच वेगळेपण दर्शवते. आमच्यासमोरही अनेक आव्हानं आहेत. खर्च वाढला आहे. मात्र हा खर्च कमी करण्यासाठी सावध पावलं कंपनी उचलेल, असं ते म्हणाले.