Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

DMart March Quarter Results : डिमार्टला मार्च तिमाहीत 460 कोटींचा नफा

DMart Q4 Results : सर्व ग्राहकांना परीचित असलेले डिमार्ट हे नाव घरोघरी पोहचले आहे. Avenue Supermarts, DMart नावाने व्यापार करणाऱ्या कंपनीने, शनिवारी, 13 मे रोजी आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीचे निकाल (DMart March Quarter Results) जाहीर केले. मार्च तिमाहीत डिमार्ट कंपनीचा निव्वळ नफा 8 टक्क्यांनी वाढून 460 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 427 कोटी रुपये होता.

Read More

Adani Group Raising Fund: अदानी इंटरप्रायजेस आणि अदानी ट्रान्समिशन QIP द्वारे 21,000 कोटी उभारणार

Adani Group's Investment: अदानी समुहातील अदानी इंटरप्रायजेस आणि अदानी ट्रान्समिशन या दोन कंपन्यांनी पात्र संस्थात्मक प्लेसमेंट (Qualified Institutional Placement-QIP)मधून 21,000 कोटी रुपये जमा करणार आहे.

Read More

TRAI on SMS templates : एसएमएस टेम्पलेट्सचा गैरवापर थांबवावा, ट्रायच्या टेलिकॉम कंपन्यांना सूचना

TRAI on SMS templates : व्यावसायिक संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या एसएमएस टेम्पलेटचा वापर थांबवावा, अशा सूटना ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना दिल्या आहेत. पुढच्या 45 दिवसांत टेलिकॉम कंपन्यांना याविषयी बदल करण्यास सांगण्यात आलंय. मोठ्या प्रमाणात याचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read More

EPFO Grievance Redressal: EPFO संबंधित खातेदारांच्या तक्रारी 7 दिवसांत निकाली काढा, विभागीय कार्यालयांना आदेश

मागील काही दिवसांपासून EPFO कार्यालयात अनेक तक्रारी प्रलंबित पडल्या आहेत. तसेच या तक्रारी निवारणासाठीचा सरासरी वेळ वाढला आहे. त्यामुळे कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे चांगलेच कान टोचले आहेत. त्यानंतर EPFO कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना तक्रारी सात दिवसांच्या आत सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

CPI Inflation: किरकोळ महागाई दरात घट, सर्वसामान्यांना दिलासा

Consumer Price Index (CPI): गेल्या महिन्यात, म्हणजेच मार्चमध्ये महागाईचा दर 5.66 टक्के इतका नोंदवला गेला होता. किरकोळ महागाई दर म 2 ते 4 टक्क्यांवर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील असते. या श्रेणीतील महागाई सामान्य नागरिकांच्या आवाक्यातील आहे असे आरबीआयचे मत आहे. सध्याचा महागाई दर समाधानकारक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Read More

Adani-Hindenburg Report: अदानी-हिंडेनबर्ग अहवाल सादर करण्यासाठी सेबीला तीन महिन्यांची मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Adani-Hindenburg Report: अदानी समूहातील गैरव्यवहारांवर बोट ठेवणाऱ्या हिंडेनबर्ग संस्थेच्या अहलावर तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाना सेबीला आणखी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी वाढवून मिळावा यासाठी सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यावर न्यायालयाने तीन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला आहे.

Read More

Top 5 scooters: कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींसाठी बेस्ट स्कूटी; 'ही' आहेत ट्रेंडिंग मॉडेल्स

बस, रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी स्कूटी घेण्याचा आग्रह अनेक विद्यार्थी पालकांकडे धरतात. कॉलेजच्या तरुणांना अशी स्कूटी पाहिजे असते जी त्यांच्या खिशाला परवडेल आणि मित्रमैत्रिणींसमोर स्टाइलही करता येईल. पाहूया बाजारात सध्या कोणत्या ट्रेंडिग स्कूटी आहेत, ज्यामुळे तुमची कॉलेज लाइफ आणखी कूल बनेल.

Read More

प्रतिशोध: अस्तित्वासाठी झुंज देणाऱ्या तृतीयपंथीयांना ‘The Trans Cafe’ मधून मिळते आहे नवी ओळख

The Trans Cafe: प्रतिशोध मालिकेच्या संपूर्ण टीमने मातृदिनाच्या निमित्ताने मुंबईतील वर्सोवा परिसरातील ‘द ट्रान्स कॅफे’ला भेट दिली. हा कॅफे पूर्णतः ट्रान्सवूमनद्वारे चालवला जातो. म्हणजेच कॅफेच्या मालकांपासून, शेफ आणि वेटरपर्यंत सर्व कमर्चारी हे ट्रान्सवूमन आहेत. चला तर जाणून घेऊया या खास कॅफेबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल...

Read More

Aadhar Card Scam: तुमच्या आधारकार्डवर किती सिमकार्ड इश्यू आहेत माहितीये तुम्हाला? इथे चेक करा!

Aadhar Card Scam: केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व त्यांना अवगत करण्यासाठी TAFCOP पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलवर सर्वसामान्य नागरिक आधारकार्डवर इश्यू करण्यात आलेल्या सिमकार्डची माहिती मिळवू शकतात. तसेच तुमच्या आधारकार्डवर किती आणि कोणते मोबाईल नंबर इश्यू झाले आहेत हे तपासू शकतात.

Read More

Drugs Price Cap: विविध ब्रँडनेमच्या नावाखाली औषधं महाग विकता येणार नाहीत; फार्मा कंपन्यांना दणका

फार्मा कंपन्यांना एकच औषध विविध ब्रँडनेम खाली वेगवेगळ्या किंमतींना विकता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. अनेक कंपन्या एकच औषध कमी जास्त किंमतींना विकत असल्याचे National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) संस्थेच्या लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

Olympic Tickets On Sale: पॅरिस ऑलिम्पिकची तिकिट विक्री सुरु, लॉटरी पद्धतीने होणार तिकिटांचे वितरण

Olympic Tickets On Sale: फ्रान्समधील पॅरिसमध्ये होणाऱ्या वर्ष 2024 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील तिकिटांची विक्री सुरु झाली आहे.दुसऱ्या टप्प्यात जवळपास 15 लाख तिकिटांची लॉटरी पद्धतीने विक्री होणार आहे. जगभरातील 40 लाख प्रेक्षकांनी ऑलिम्पिक तिकिटासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी भाग्यवान 15 लाख विजेत्यांना याची देही याची डोळा पॅरिस ऑलिम्पिक सोहळा पाहता येणार आहे.

Read More

Medicine will be Cheap : महागड्या औषधांपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका, केंद्र सरकारचा निर्णय काय?

Medicine will be Cheap : महागड्या औषधांपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका होणार असल्याची चिन्ह निर्माण झालीत. जवळपास 50 टक्क्यांनी ही औषधं स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारनं औषध किंमत नियंत्रण आदेशात सुधारणा केलीय. काय आहे नेमका आदेश, याविषयी सविस्तर पाहू...

Read More