Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Coca-Cola Plant Closed: कोकाकोलाचा प्लांट तडकाफडकी बंद; शीतपेय निर्मिती करताना नियमांचे उल्लंघन?

Coca-Cola Plant Closed

कोकाकोला कंपनीच्या शीतपेयांना भारतात मोठी मागणी आहे. थम्सअप, कोकाकोला, स्प्राइटसह इतरही अनेक उत्पादने प्रसिद्ध आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील कोकाकोला कंपनीचा एक निर्मिती प्रकल्प तडकाफडकी बंद करण्यात आला आहे. कंत्राटी पद्धतीने या प्रकल्पात उत्पादन घेतले जाते. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकल्प तात्पुरता बंद केला आहे.

Coca-Cola Plant Closed: उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील कोकाकोला शीतपेय निर्मितीचा प्लांट तडकाफडकी बंद करण्यात आला आहे. या प्लांटमध्ये कोकाकोला, कोला, स्प्राइट, फंटा, मिनिट मेड यासह इतर सर्वाधिक खपाची शीतपेये बनवली जातात. शीतपेय निर्मिती करताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आल्यानंतर उत्पादन थांबवले. कोकाकोलाकडून कंत्राटी पद्धतीने शीतपेय निर्मिती केली जातात. मात्र, या प्रकल्पांत नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्याने प्रकल्प तत्काळ बंद केला.

शीतपेय तयार करताना सुरक्षा बाळगली जात नसून यासंबंधित आम्हाला "अनधिकृत माहिती" मिळाली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, कंपनीला ही माहिती कशी मिळाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील चौकशीसाठी कंपनीने थेट शीतपेयांची निर्मिती थांबवण्याचा निर्णय घेतला. आम्हाला जी माहिती मिळाली ती फक्त कोकाकोला या एका ब्रँडबद्दलची नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

SLMG बेवेरेजेस कडून कंत्राटी पद्धतीने निर्मिती

कोकाकोलाचे भारतात स्वत:चे निर्मिती प्रकल्प आहेत. सोबतच कंत्राटी पद्धतीनेही उत्पादनांची निर्मिती केली जाते. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात SLMG बेव्हिरेजेस या कंपनीकडून कोकाकोला शीतपेयांची निर्मिती करून घेते. या कंत्राटदारांना कोकाकोला कंपनीचे सर्व नियम आणि अटींचे पालन करावे लागते. तसेच या प्रकल्पांची कंपनीकडून वेळोवेळी तपासणीही होत असते. मात्र, उन्नाव येथील प्लांटमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली. त्यामुळे हा प्रकल्प तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

कोकाकोला कंपनीचे म्हणणे काय? 

नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच कोकाकोलाने निर्मिती प्रकल्प बंद केला. तसेच या प्लांटमधून तयार झालेल्या उत्पादनांची देशांतर्गत आणि परदेशातील बड्या प्रयोगशाळेत चाचणी सुरू केली आहे. उत्पादनांची गुणवत्ता आणि आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल यासाठी उपाययोजन सुरू करण्यात आल्या आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उत्पादन सुरळीत होऊ शकते, अशी माहितीही समोर येत आहे.

कोकाकोला कंपनीने मान्यता दिलेल्या अधिकृत पुरवठादारांकडूनच कच्चा माल खरेदी केला जातो, असे  SLMG group चे चेअरमन SN Ladhani यांनी म्हटले आहे. कंपनीत तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनाचे विविध प्रकारची तपासणी आणि ऑडिट केले जाते. त्यानंतरच निर्मितीसाठी कच्चा माल वापरला जातो त्यामुळे खराब क्वालिटीचा कच्चा माल वापरल्याचा प्रश्नच उभा राहत नाही, असे SN Ladhani यांनी म्हटले.

कोकाकोलाचा भारतातील विस्तार

कोकाकोला अमेरिकेतील आघाडीची शीतपेय निर्मिती कंपनी असून भारतात कंपनीचा विस्तार खेडोपाड्यापर्यंत आहे. कोला सगमेंटमधील थम्सअप बँडचा भारतातील मार्केटशेअर 16% आहे. कोकाकोला नावाने विक्री होणाऱ्या उत्पादनांचा भारतातील शीतपेय मार्केटमध्ये 9% वाटा आहे. कंपनीचे संपूर्ण भारतभर पुरवठा नेटवर्क पसरले आहे. त्यामुळे खेडोपाड्यातही ही कोलड्रिंक्स सहज मिळतात.