Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Onion Economy In Lasalgaon: लासलगावचा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय! सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Onion Economy In Lasalgaon: सलग दुसऱ्या वर्षी कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने इथला कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पुढल्या हंगामात कांद्याची शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.यासंदर्भात नुकताच महामनीच्या टीमने थेट लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांद्याचे अर्थकारण जाणून घेतले.

Read More

Food on Wheels: मुंबईत फूड ट्रकला परवानगी, कोळीवाड्यातील खाद्यसंस्कृतीला मिळेल नवी ओळख

परवानगी असलेल्या फूड ट्रकला 24 तास सेवा देता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या निविदेनुसार केवळ कोळी आणि मच्छिमार समुदायातील नागरिकांना फूड ट्रकची परवानगी दिली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोळी महिला बचत गटांना फूड ट्रकची परवानगी दिली जाणार आहे.जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

Employability of Transgenders: तृतीयपंथीयांना रोजगारक्षम बनवण्यासाठी धडपडणारी निष्ठा निशांत!

Nishtha Nishant: अजूनही तृतीयपंथी व्यक्तींना समाज मान्यता मिळत नाही. रोजगाराची संधीच जर उपलब्ध नसेल तर तृतीयपंथीयांना बाजार मागण्याशिवाय आणि देहविक्री करण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु हे दोन्ही पर्याय पैसा जरी देत असले तरी आत्मसन्मान मात्र मिळवून देऊ शकत नाही हे निष्ठाला माहित होतं. जाणून घेऊयात तृतीयपंथीयांना रोजगारक्षम बनवण्यासाठी धडपडणाऱ्या निष्ठाचा प्रवास...

Read More

Last Minute Train Tickets Booking: शेवटच्या क्षणीसुद्धा रेल्वेचे तिकिट बुक करता येते, कसे ते जाणून घ्या

Last Minute Train Tickets Booking: अचानक रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो कन्फर्म तिकीटाचा! मेल/एक्सप्रेसचे रिझर्व्हेशन केले नसले तरी प्रवाशापुढे शेवटच्या क्षणी तिकिट बुकिंगचा पर्याय आहे. एखाद्या ट्रेनमध्ये शिल्लक जागा असेल तर प्रवाशाला शेवटच्या क्षणी तिकिट बुक करण्याची सुविधा IRCTC ने उपलब्ध केली आहे. ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आधी कन्फर्म तिकिट बुक

Read More

Business Idea: घरबसल्या बटाटा चिप्सचा व्यवसाय सुरू करा, खर्च आणि नफा किती होऊ शकतो? जाणून घ्या

Business Idea: कोरोना काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली, उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून व्यवसाय उभारणी वाढली. जास्तीत जास्त व्यवसाय हे घरगुती खाद्यपदार्थ बनवून विकण्याचे आहेत. त्यामध्ये केक, आइसक्रीम, पेप्सी, पापड, चिप्स आणि बरेच खाद्यपदार्थ आहेत. यामधील असाच एक व्यवसाय म्हणजे बटाटा चिप्स तयार करून विकणे. यात सुद्धा तुम्ही भरघोस नफा मिळवू शकता.

Read More

Study in Germany: उच्च शिक्षणासाठी जगभरातून जर्मनीला पसंती; नोकरीच्या संधी आहेत का?

जर्मनीमधील विद्यापीठात अॅडमिशन घेत असाल तर ट्युशन फी माफ आहे. इंग्रजी भाषेत शिक्षण उपलब्ध असून शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत. त्यामुळे मागील काही वर्षात जगभरातील विद्यार्थ्यांकडून जर्मनीमधील विद्यापीठांना पसंती मिळत आहेत.

Read More

Desi Chinese Chings Deal : 'चिंग्स'साठी टाटा अन् नेस्लेमध्ये शर्यत, कोण मारणार बाजी?

Desi Chinese Chings Deal : चिंग्स सिक्रेट मसाल्यांसाठी नेस्लेची टक्कर आता थेट टाटा कंझ्यूमरसोबत सुरू झालीय. या शर्यतीत द क्राफ्ट हाइंज आणि आयटीसी या कंपन्यादेखील अद्याप आहेत. मात्र टाटा आणि नेस्ले यांच्यातच खरी स्पर्धा असल्याचं बोललं जातंय.

Read More

LinkedIn layoff : महसूल वाढूनही नोकरकपात करणार लिंक्डइन! चायनीज जॉब अ‍ॅपही होणार बंद

LinkedIn layoff : रोजगाराच्या संधी सांगणाऱ्या लिंक्डइननं स्वत:च्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. 700हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचं कंपनीचं नियोजन आहे. फेब्रुवारीमध्येदेखील कंपनीनं अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा इथल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलीय.

Read More

BSNL Plan: फक्त 397 रुपयांत 5 महिन्यांचा रिचार्ज; BSNL चा अफलातून प्लॅन जाणून घ्या

BSNL 5 Month Plan : बीएसएनएल हे ग्राहकांना स्वस्त सेवा देण्यासाठी ओळखले जाते. आज आपण बीएसएनलच्या अशा प्लॅन बाबत जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला 397 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये 5 महिन्यांची वैधता (Validity) 397 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

Read More

Jio Recharge: वर्षभरासाठी असलेले जिओचे रिचार्ज प्लान, 2879 रुपयांमध्ये मिळणार दररोज 2 GB डेटा आणि बरेच काही

Reliance Jio Plans : रिलायन्स जिओकडे एकापेक्षा एक भन्नाट रिचार्ज प्लान आहेत. त्यापैकी एक वर्षासाठी असलेल्या प्लान बद्दल आपण जाणून घेऊया.

Read More

EV battery : लिथिअम बॅटरीसाठी आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही, भारत बनणार 'आत्मनिर्भर'

EV battery : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या लिथिअमच्या बॅटरीसाठी भारताला आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. नुकताच भारतात लिथिअमचा साठा सापडलाय. त्यामुळे येत्या काळात या लिथिअमचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Read More

Diesel four wheelers Ban: 2027 पर्यंत डिझेल वाहनांवर बंदी घाला, सरकारी समितीची शिफारस

दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चारचाकी डिझेल वाहनांना बंदी घालण्याची शिफारस सरकारी समितीने केली आहे. हा निर्णय 2027 पासून लागू व्हावा, असेही म्हटले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या Energy Transition Advisory समितीने या शिफारसी केल्या आहेत. देशातील ऊर्जा क्षेत्रामध्ये पुढील काही वर्षांमध्ये काय बदल अपेक्षित आहेत, याचा लेखाजोखा अहवालात मांडला आहे.

Read More