Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Online Fraud Alert: जामताराहून पाठवली AnyDesk ची लिंक आणि काही मिनिटातच बँक खातं झालं रिकामं!

जामतारा येथील सायबर चोरांनी AnyDesk च्या सहाय्याने मुंबईतील एका वृद्धाचे बँक डीटेल्स मिळवले आणि काही मिनिटातच त्यांच्या खात्यातील 1 लाख 80 हजार रुपये लंपास केले. खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर चोराला फोन करायचा प्रयत्न केला मात्र फोन क्रमांक स्वीच ऑफ दाखवला जात होता...

Read More

Startup layoffs : थांबता थांबेना स्टार्टअप्समधलं लेऑफ, भरतीमधल्या त्रुटीचं कारण देत मीशोनं 251 कर्मचार्‍यांना काढलं

Startup layoffs : देशभरातल्या स्टार्टअप्समधलं लेऑफ काही थांबायला तयार नाही. आता मीशोनं आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करून त्यात आणखी भर घातलीय. इतर कंपन्यांप्रमाणं आर्थिक कारण देत आपल्या भरतीमध्येच त्रुटी असल्याचं सांगत कर्मचाऱ्यांना घरी पाठवलंय.

Read More

El Nino : खरीप पेरणीसाठी बियाणांची उपलब्धता तपासावी, एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यांना केंद्राच्या सूचना

El Nino : एल निनोच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत. आधीच विविध राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यात आता एल निनोचं संकट कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सावधानतेचा इशारा दिलाय.

Read More

Food Inflation: हॉटेलमधलं जेवण महागलं, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचं बजेट बिघडलं…

एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान CRISIL Research या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात याचा तपशील प्रकाशित केला आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत 9% ने वाढ झाली आहे, तर मांसाहारी थाळीच्या किमतीत 32% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे...

Read More

Top 5 Fellowships in India: भारतातील 'या' टॉप 5 फेलोशिप देतात, 75 हजार रुपयांपर्यंत मानधन

Top 5 Fellowships in India: केंद्र आणि राज्य सरकार, विविध शैक्षणिक व्यवस्थापन दरवर्षी लाखो भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शैक्षणिक पदव्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी विविध शिष्यवृत्ती आणि फेलोशिप देतात. त्यातील टॉप 5 मध्ये येणाऱ्या फेलोशिप कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

Food ministry on edible oil price : खाद्यतेलाच्या किंमती कमी करा, किरकोळ विक्रेत्यांना सरकारचं आवाहन

Food ministry on edible oil price : जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनीही त्या कमी कराव्यात, असं अन्न मंत्रालयानं म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून चढ्या दरानं ग्राहकांना खाद्यतेल खरेदी करावं लागतंय. या निर्णयामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Read More

Tata Power Profit : टाटा पॉवरच्या नफ्यात 48 टक्क्यांची वाढ, भागधारकांना लाभांशही जाहीर

Tata Power Q4 net profit : टाटा पॉवरने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा निकाल चांगला लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टाटा पॉवरचा चौथ्या तिमाहीतील नफा 48.5 टक्के वाढला. कंपनीला 939 कोटी रुपयांचा नफा झाला.

Read More

Printing Cost of Indian Currency: चलनी नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो माहितीये? जाणून घ्या

चलनी नोटा छापण्यासाठी RBI ला विशेष खर्च करावा लागतो. जसा सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतो आहे तसाच महागाईचा सामना सध्या आरबीआयला देखील करावा लागतोय कारण नोटांच्या छपाईचा खर्च वाढला आहे. चला तर जाणून घेऊयात 10, 20, 50,100, 500 आणि 2000 च्या नोटा छापण्यासाठी आरबीआयला नेमका किती खर्च येतो...

Read More

Gandhi Fellowship: गांधी फेलोशिपच्या माध्यमातून मिळवू शकता, दरमहा 14 हजार रुपये मानधन

Gandhi Fellowship: आजही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना पैसे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी पुढील शिक्षण अर्धवट सोडावे लागते. या परिस्थितीमुळे पिरामल फाउंडेशनने पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘गांधी फेलोशिप’ योजना सुरू केली आहे.

Read More

Gmail Blue Tick Service: Gmail ही सुरु करणार 'ब्ल्यू टिक सेवा', मग यासाठी पैसे भरावे लागणार का?

Gmail Blue Tick Service: बनावट ईमेल आणि चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी जीमेलने ब्ल्यू टिक सेवा सुरु केली आहे. या सेवेसाठी वापरकर्त्यांना किती शुल्क भरावे लागणार आणि ही सुविधा कोणाला दिली जात आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

HDFC Bank: एचडीएफसी बँक ग्रामीण भागात 675 पेक्षा जास्त नव्या शाखा उघडणार

एचडीएफसी बँक ग्रामीण आणि निमशहरी भागात 675 नव्या शाखा सुरू करणार आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये या शाखा उघडल्या जातील. पुढील दोन ते तीन वर्षात ग्रामीण भागातील बँकेचा व्यवसाय दुप्पट करण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले आहे. सोबतच एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी होम लोन या दोन कंपन्यांचे विलीनीकरण देखील येत्या काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम क्षेत्राला कर्जपुरवठा करण्याचे लक्ष्यही वाढेल.

Read More

Paytm Travel Carnival 2023 | ट्रेन, बस आणि विमान प्रवासासाठी Paytm देतेय मोठी सूट, जाणून घ्या ऑफर

Paytm Payment App चा वापर करणाऱ्यांना ‘पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल’ मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. बुकिंगसाठी ग्राहकांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीये. या खास ऑफर्समध्ये तुमच्या प्रवासासाठी जर तुम्ही फ्लाइट, ट्रेन किंवा बस बुकिंग करत असाल तर तुम्हांला 25 टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More