चिंग्स सिक्रेट (Ching's Secret) हा एक मसाल्याचा ब्रँड आहे. मागच्या काही दिवसांपासून ही कंपनी विकत घेण्यासाठी विविध उद्योगसमूह पुढे आलेत. यात टाटा (Tata), नेस्ले (Nestle), द क्राफ्ट हाइंज (Kraft Heinz), आयटीसी (ITC) अशा विविध कंपन्यांची नावं पुढे येत आहेत. मध्यंतरी नेस्लेशी करार पूर्ण झाल्याच्याही बातम्या येत होत्या. मात्र अद्यापही ही डील पूर्ण झालेली नाही. तर उलट अधिक रंजक अवस्थेत पोहोचलीय. नेस्ले आणि टाटा यांच्यातली चिंग्स सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स (Smith & Jones) यांच्यातली लढाई खूपच रंजक झाल्याचं तज्ज्ञांच मत आहे. नेस्ले ऑल-कॅश ऑफरवर काम करत आहे. तर तिकडे द क्राफ्ट हाइंज 75 टक्के अधिग्रहण आणि उर्वरित सार्वजनिक करण्याचा विचार करत आहे. टाटा ग्रुपकडून मात्र डीलविषयीच्या अपडेट्सवर अद्यापही यावर कोणतं विधान आलेलं नाही.
टॉप 3 दावेदार
चिंग्स सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स या कॅपिटल फूड्सअंतर्गत येतात. कंपनी विकण्याचा निर्णय मागच्या वर्षीच घेण्यात आला होता. इनव्हर ग्रुपचा 40 टक्के, जनरल अटलांटिकचा 35 टक्के आणि कॅपिटल फूड्स स्थापन करणाऱ्या अजय गुप्ता यांचा 25 टक्के हिस्सा यात आहे. गोल्डमॅन सॅचनं (Goldman Sachs) कंपनीला 500-800 दशलक्ष डॉलर इतकं मूल्य दिलंय. यासोबत नॉर्वेची ओरक्ला, हिंदुस्थान युनिलिव्हर, जपानची निसिन फूड्स आणि जनरल मिल्स यासह सुमारे डझनभर जागतिक आणि स्थानिक कंपन्यांशी कंपनी खरेदी करण्यासाठी कॅपिटल फूड्समार्फत संपर्क साधण्यात आला होता. आता नुकतंच नॉन बाइंडिंग बोली सादर केल्यानंतर टॉप 3 दावेदार समोर आले आहेत.
#LeadStoryOnET |
— Economic Times (@EconomicTimes) May 9, 2023
Deal Street: #Nestle, #Tata Consumer, #KraftHeinz look to spice up race for #ChingsSecret https://t.co/HTHlNhSbhT
काय म्हणाले अजय गुप्ता?
ईटीनं यासंबंधीचं वृत्त दिलंय. त्यांच्या रिपोर्टनुसार नेस्लेचं ऑल-कॅश ऑफरवर काम सुरू आहे. तर द क्राफ्ट हाइंजसारख्या काहींनी कंपनीच्या 75 टक्क्यांपर्यंत अधिग्रहण करून सार्वजनिकपणे घेण्याचं सुचवलंय. या डीलमधून जनरल अटलांटिक पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय. इनव्हस आणि गुप्ता टेबलवरच्या ऑफरच्या आधारे भविष्यातल्या मूल्य वाढीसाठी थांबणार आहेत. तर जनरल अटलांटिक आणि इनव्हस यांच्याकडून अद्याप कोणतंही अपडेट आलेलं नाही. बाजारातील सट्टा आणि अफवांना प्रतिसाद द्यायला आवडणार नाही, असं कॅपिटल फूड्सचे अजय गुप्ता म्हणाले आहेत. गुंतवणूकदारांना व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आम्ही सतत संपर्क करत आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.
विस्तारणारी कंपनी
कॅपिटल फूड्सचे ब्रँड चिंग्स आणि स्मिथ अँड जोन्स भारतभर सध्या वेगानं वाढत आहेत. चायनीज पदार्थ घरच्या घरी बनवण्यासाठी चिंग्स सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्सतर्फे मसाले बनवले जातात. कंपनीचे प्रमुख असलेले अजय गुप्ता यांनी याची सुरुवात 1995ला केली होती. देसी चायनीज अशीही एक टॅगलाइन कंपनीतर्फे वापरली जाते. नूडल्स, सूप, करी पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, सॉस अशा व्हरायटीज कंपनीतर्फे बाजारात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे अशा विस्तारणाऱ्या कंपनी आपल्याकडे खेचण्यासाठी टाटा आणि नेस्ले यांच्याच चांगलीच चढाओढ सुरू आहे. रंजक ठरत असलेली ही डील शेवटी कोण जिंकतं ते येणाऱ्या काळात समजणार आहे.