Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BSNL Plan: फक्त 397 रुपयांत 5 महिन्यांचा रिचार्ज; BSNL चा अफलातून प्लॅन जाणून घ्या

BSNL Plan

BSNL 5 Month Plan : बीएसएनएल हे ग्राहकांना स्वस्त सेवा देण्यासाठी ओळखले जाते. आज आपण बीएसएनलच्या अशा प्लॅन बाबत जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला 397 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये 5 महिन्यांची वैधता (Validity) 397 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

BSNL Plan Just 397 Rupees : इंटरनेट तसेच कॉलिंग सेवा पुरविणाऱ्या कंपन्या ग्राहकांना नेहमीच वेगवेगळ्या ऑफर देऊन स्पर्धा करीत असतात आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. याअंतर्गत BSNL (भारत संचार निगम लिमिटेडने) ग्राहकांसाठी एकदम स्वस्त प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 5 महिन्यांच्या वैधतेसह 397 चा रिचार्ज उपलब्ध आहे. म्हणजे ग्राहकांना 150 दिवसांमध्ये 397 रुपयांत विविध ऑफर दिल्या जात आहे.

काय आहे 397 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 397 रुपयांचा प्लॅन 150 दिवसांसाठी म्हणजे 5 महिन्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 60 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईल कॉलिंग देण्यात आली आहे. 60 दिवसांसाठी 2 GB इंटरनेट डेटाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. यानंतरही जर का ग्राहकांना डेटा हवा असेल तर, त्यासाठी वेगळा टॉप अप रिचार्ज करावा लागेल. यामुळे ग्राहकांना कमी बजेटमध्ये जास्त काळासाठी रिचार्ज सेवा उपलब्ध होत आहे.

हे आहेत फायदे

यामध्ये ग्राहकांना फ्री पर्सनलाइज्ड रिंगटोन देखील मिळेल. जर तुम्हाला 60 दिवसांनंतरही अनलिमिटेड डेटा आणि व्हॉइस कॉल्स मिळवायचे असतील, तर तुम्ही टॉपअप प्लॅन रिचार्ज करू शकता. ही योजना त्या ग्राहकांसाठी एकदम बेस्ट आहे, जे कमी बजेटमध्ये अधिक काळ व्हॅलिडीटीचा पर्याय शोधत आहेत. तसेच ज्यांच्या फोनचा उपयोग जास्तीत जास्त केवळ कॉलिंगसाठी केला जातो.

आणखी एक प्लॅन

तसेच, 997 रुपयांचा प्लॅन देखील BSNL कंपनीने आणला आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतोय. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 40 kbps राहते. या प्लॅनमध्ये डेटा सोबतच कॉलिंग सुविधा देखील दिली जाते आणि ग्राहक दररोज 100 एसएमएस पाठवू शकतात आणि हा प्लॅन 160 दिवसांसाठी (validity)आहे.