Reliance Jio: सध्या भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओकंपनी आघाडीवर आहे. ग्रामीण भागात उत्तम नेटवर्क देत असल्याने जिओला पसंती दिली जाते. त्याचबरोबर जिओचे रिचार्ज प्लानसुद्धा अनेकांना परवडणारे आहेत. आता दिवसभरात लागणारा डेटा सर्वांच्या आयुष्यात महत्वाचा झाला आहे, त्यामुळे अनेक लोकं डेटा बघून रिचार्ज प्लान घेतात. दर महिन्याला रिचार्ज करण्यात जास्त पैसे जातं असेल तर तुम्ही जिओचे वार्षिक रिचार्ज प्लान घेऊ शकता. त्याबाबत माहिती जाणून घेऊया.
जिओच्या यासर्व प्लानमध्ये अमर्यादित व्हॉइस प्लान आणि इंटरनेट डेटा ऑफर दिला जातो. यातील सर्वात लोकप्रिय रिचार्ज म्हणजे 2879 रुपयांचा रिचार्ज प्लान. याची व्हॅलिडिटी 365 दिवसांची असते. जिओचे दोन प्लान एक वर्षासाठी येतात, 2879 रुपयांचा प्लान आणि 2999 रुपयांचा प्लान. एकदा रिचार्ज केले की वर्षभर टेंशन नाही आणि दर महिन्याला केलेल्या रिचार्ज प्लानपेक्षा स्वस्त पडतात.
JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा मिळतो. दर दिवसाला मिळणारा डेटा संपला की इंटरनेटचा स्पीड 64Kbps इतका कमी होतो. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, देशभरात स्थानिक आणि एसटीडी व्हॉईस कॉल करू शकतात. त्याचबरोबर पॅकमध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
2879 रुपयांचा प्लान सर्वाधिक लोकप्रिय
याशिवाय, Jio कडे 2999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील आहे जो 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह आहे. दिवसाला 2.5 GB डेटा मिळतो, म्हणजेच संपूर्ण डेटा 912.5 GB होतो. बाकी सर्व 2879 रिचार्ज प्लानप्रमाणेच आहे. तर 2545 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 336 दिवस असून त्यात दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. 2879 रुपयांचा प्लान सर्वाधिक ग्राहकांचा लोकप्रिय आहे.