Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Unique ID For Doctors: वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टरांना Unique ID; नागरिकही पाहू शकतात डॉक्टरांची माहिती

मेडिकल प्रॅक्टिस करायची असल्यास भारतातील सर्व डॉक्टरांना आता सरकारकडून Unique ID घ्यावा लागणार आहे. National Medical Commission च्या नव्या निर्णयानुसार, देशभरातील डॉक्टरांचे कॉमन नॅशनल मेडिकल रजिस्टर तयार करण्यात येणार आहे. ही माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही पाहायला मिळणार आहे.

Read More

Ola Electric Two Wheeler Sale: एप्रिल महिन्यात इलेक्ट्रीक दुचाकींचा धूमधडाका; या कंपन्यांना सर्वाधिक मागणी

Electric Bike Sale: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या किमतींमुळे, इलेक्ट्रिक दुचाकींच्या खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. एप्रिल 2023 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकीच्या किरकोळ विक्रीच्या संदर्भात मोजक्या 5 कंपन्या अग्रेसर आहेत. या कोणत्या कंपन्या आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Fitment Factor: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात होणार वाढ! जाणून घ्या फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

7th Pay Commission: 2016 साली केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला होता. सातव्या वेतन आयोगानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. आता जुलै महिन्यापासून पगारात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील महिन्यापासून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची तयारीत आहे.

Read More

Tata steel : काय तुमच्याकडे आहे टाटा स्टीलचा शेअर? कंपनीच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

Tata steel : टाटा स्टीलचा शेअर असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. टाटा स्टील येत्या काळात आपल्या प्लांटची क्षमता अधिक वाढवण्याचा विचार करत आहे. टाटा स्टीलच्या प्रमुख अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिलीय. त्यामुळे आताच्या उत्पादनापेक्षा दुपटीनं हा विस्तार होणार आहे.

Read More

Mobile Tracking System : मोबाइल हरवलाय? नो टेन्शन! लवकरच सुरू होणार ट्रॅकिंग सिस्टम

Mobile Tracking System : मोबाइल हरवल्याचं टेन्शन घेण्याची आता गरज नाही. कारण सरकार लवकरच यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकतंय. मोबाइल ट्रॅकिंग सिस्टम सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून मोबाइल ट्रॅक केला जाईल तसंच तो तत्काळ ब्लॉकही केला जाऊ शकणार आहे.

Read More

Job Openings: रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढल्या, नोकरी जॉबस्पीकचा अहवाल

Job Openings: नोकरी जॉबस्पीक इंडेक्स या भारतातील प्रमुख जॉब इंडेक्सने एप्रिल 2023 मध्ये वरिष्ठ आणि व्यवस्थापन पातळीवरील उच्च पदस्थ नोकऱ्यांचा अहवाल (व्हाइट-कॉलर हायरिंग) जाहीर केला.रिअल इस्टेट क्षेत्राने नोकर भरतीत 21% वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. 16 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची मागणी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Read More

DMart March Quarter Results : डिमार्टला मार्च तिमाहीत 460 कोटींचा नफा

DMart Q4 Results : सर्व ग्राहकांना परीचित असलेले डिमार्ट हे नाव घरोघरी पोहचले आहे. Avenue Supermarts, DMart नावाने व्यापार करणाऱ्या कंपनीने, शनिवारी, 13 मे रोजी आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीचे निकाल (DMart March Quarter Results) जाहीर केले. मार्च तिमाहीत डिमार्ट कंपनीचा निव्वळ नफा 8 टक्क्यांनी वाढून 460 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 427 कोटी रुपये होता.

Read More

Adani Group Raising Fund: अदानी इंटरप्रायजेस आणि अदानी ट्रान्समिशन QIP द्वारे 21,000 कोटी उभारणार

Adani Group's Investment: अदानी समुहातील अदानी इंटरप्रायजेस आणि अदानी ट्रान्समिशन या दोन कंपन्यांनी पात्र संस्थात्मक प्लेसमेंट (Qualified Institutional Placement-QIP)मधून 21,000 कोटी रुपये जमा करणार आहे.

Read More

TRAI on SMS templates : एसएमएस टेम्पलेट्सचा गैरवापर थांबवावा, ट्रायच्या टेलिकॉम कंपन्यांना सूचना

TRAI on SMS templates : व्यावसायिक संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या एसएमएस टेम्पलेटचा वापर थांबवावा, अशा सूटना ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना दिल्या आहेत. पुढच्या 45 दिवसांत टेलिकॉम कंपन्यांना याविषयी बदल करण्यास सांगण्यात आलंय. मोठ्या प्रमाणात याचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read More

EPFO Grievance Redressal: EPFO संबंधित खातेदारांच्या तक्रारी 7 दिवसांत निकाली काढा, विभागीय कार्यालयांना आदेश

मागील काही दिवसांपासून EPFO कार्यालयात अनेक तक्रारी प्रलंबित पडल्या आहेत. तसेच या तक्रारी निवारणासाठीचा सरासरी वेळ वाढला आहे. त्यामुळे कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे चांगलेच कान टोचले आहेत. त्यानंतर EPFO कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना तक्रारी सात दिवसांच्या आत सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

CPI Inflation: किरकोळ महागाई दरात घट, सर्वसामान्यांना दिलासा

Consumer Price Index (CPI): गेल्या महिन्यात, म्हणजेच मार्चमध्ये महागाईचा दर 5.66 टक्के इतका नोंदवला गेला होता. किरकोळ महागाई दर म 2 ते 4 टक्क्यांवर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील असते. या श्रेणीतील महागाई सामान्य नागरिकांच्या आवाक्यातील आहे असे आरबीआयचे मत आहे. सध्याचा महागाई दर समाधानकारक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Read More

Adani-Hindenburg Report: अदानी-हिंडेनबर्ग अहवाल सादर करण्यासाठी सेबीला तीन महिन्यांची मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Adani-Hindenburg Report: अदानी समूहातील गैरव्यवहारांवर बोट ठेवणाऱ्या हिंडेनबर्ग संस्थेच्या अहलावर तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाना सेबीला आणखी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी वाढवून मिळावा यासाठी सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यावर न्यायालयाने तीन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला आहे.

Read More