Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

TweetDeck: ट्वीटरचे ट्वीटडेक फिचर आता विनामुल्य वापरता येणार नाही, मोजावे लागणार पैसे!

ट्विटरने या आठवड्यात आपल्या युजर्ससाठी एक घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना आता TweetDeck वापरण्यासाठी देखील शुल्क भरावे लागेल. वैयक्तिक खात्याच्या व्हेरीफिकेशनसाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जात होते मात्र आता ट्विटरच्या खास फीचर्ससाठी देखील युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More

IDFC merger: आयडीएफसी फर्स्ट बँक-आयडीएफसी लिमिटेडचं विलीनीकरण, एचडीएफसीनंतरचा दुसरा मोठा करार

IDFC merger: आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या बोर्डानं आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी फायनान्शियल होल्डिंग कंपनीच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणानंतर आर्थिक क्षेत्रातला हा दुसरा सर्वात मोठा करार आहे.

Read More

Threads App: ट्विटरला करा बाय बाय! मेटा आणत आहे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, कधी होणार लॉन्च? वाचा...

Threads App: मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरला टक्कर देण्यासाठी मेटा एक प्रतिस्पर्धी आणत आहे. कंपनी या आठवड्यात टेक्स्ट-बेस्ड अ‍ॅप थ्रेड्स अ‍ॅप लॉन्च करण्याची शक्यता आहे. जेव्हा ट्विटर यूझर्स नवीन अ‍ॅप शोधू लागले तेव्हाच मेटानं थ्रेड्स अ‍ॅपची घोषणा केली आहे.

Read More

Sugar Price : उसाची एफआरपी वाढली; कारखानदारांच्या आग्रही भूमिकेने साखर महागणार?

साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही. नव्या वाढीव एफआरपीमुळे साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे एफआरपीसोबत ताळमेळ घालण्यासाठी साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या दरामध्ये वाढ करण्याबाबतही सरकारने विचार करावा असे मत इस्माचे अध्यक्ष झुनझुनवाला यांनी व्यक्त आहे.

Read More

Battery swapping policy: इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी चार्जिंग करण्याऐवजी बदलून घेण्याच्या पॉलिसीला कंपन्यांचा विरोध

इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्जिंग करण्याऐवजी चार्जिंग स्टेशनवरुन बॅटरी बदलून घेण्याची संकल्पना केंद्र सरकारने आणली होती. मात्र, या संकल्पनेस बॅटरी आणि वाहन निर्मिती कंपन्यांनी विरोध केला आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यास 30 मिनिटांपेक्षाही जास्त वेळ लागतो. बॅटरी बदलून घेण्याची व्यवस्था उभी राहील तर चालकांना वाट पाहत बसण्याची गरज नाही.

Read More

Best SIP Fund: एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची आहे? 'या' इक्विटी एसआयपी फंडांनी 30 टक्क्यांपर्यंत दिला आहे परतावा

Best SIP Fund: सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) आर्थिक गुंतवणूक करू शकता. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांसाठी एसआयपी पद्धत अतिशय फायद्याची ठरली आहे. काही इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी चक्क 20 ते 30 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. कोणते आहेत ते फंड, जाणून घेऊयात

Read More

Financial Influencers: फायनान्शिअल इन्फ्लूएन्सर्ससाठी सेबी नियमावली आणणार; ब्रोकर्स, म्युच्युअल फंड्सलाही देणार निर्देश

फायनान्शिअल इन्फ्लूएन्सर्ससाठी सेबी लवकरच नियमावली आणणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटरसह अनेक सोशल मीडिया माध्यमांवर आर्थिक सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. काही इन्फ्लूएन्सर्स नागरिकांना चुकीचा गुंतवणूक सल्ला देत असल्याचे सेबीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे याबाबत नियमावलीचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

Read More

Agricultural News : शेतातील उत्पन्न वाढण्यासाठी 'ब्रॉड बेड मेथड' कशी उपयुक्त असू शकते? जाणून घ्या

Broad bed method : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोयाबीनची पेरणी सुरू होते. सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रगत पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येईल. सोयबिनची पेरणी करण्यासाठी ब्रॉड बेड मेथड कशी उपयुक्त आहे? त्यापासून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते का? जाणून घेऊया.

Read More

Solar stove : सोलर स्टोव्हमुळे मिळणार महागड्या सिलेंडरपासून दिलासा, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्टे काय?

Solar stove : ओव्हन, इंडक्शन स्टोव्ह इत्यादी बर्‍याच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी बाजारात आता उपलब्ध आहेत. पण सर्वाधिक वापरले जाणारे साधन म्हणजे गॅस. आता गॅसच्या किमतीमध्ये भरपूर वाढ झाली आहे. त्यामुळे त्याला ऑप्शनमध्ये सोलर स्टोव्हचा वापर तुम्ही करू शकता. जाणून घ्या सोलर स्टोव्हची किंमत किती?

Read More

MHADA lottery 2023: मुंबईत म्हाडाच्या 4 हजार घरांसाठी सुमारे 1 लाख अर्ज; एका घरामागे 25 अर्ज जमा

मे महिन्यात निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीसाठी सुमारे 1 लाख अर्ज जमा झाले आहेत. 4 हजार घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे. म्हाडाद्वारे बनवण्यात येणाऱ्या घरांपैकी सुमारे 93% घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडतील या दरात असतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै आहे.

Read More

Hero Two Wheeler Price Hike: हिरो मोटोकॉर्पचा ग्राहकांना झटका, टू-व्हीलरच्या किंमतीत दीड टक्क्यांची वाढ

Hero Two Wheeler Price Hike: देशातली सर्वात मोठी दुचाकी कंपनी असलेल्या हिरो मोटो कॉर्पनं आपल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या किंमतीत वाढ केली आहे. आजपासून म्हणजेच 3 जुलै 2023पासून ही किंमतवाढ लागू होणार आहे. याआधी कंपनीनं एप्रिल महिन्यात दुचाकींच्या किंमती वाढवल्या होत्या.

Read More

FPI Investment: जूनमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केले 47,148 कोटींचे शेअर्स; गेल्या 10 महिन्यातील सर्वाधिक गुंतवणूक

FPI Investment: जून महिन्यात भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक गेल्या 10 महिन्यांपेक्षा सर्वात जास्त आहे. यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये 51,204 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जून महिन्यात कुठे आणि किती गुंतवणूक करण्यात आली आहे, जाणून घेऊयात.

Read More