मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून ट्विटरची लोकप्रियता अजूनही कायम आहे. खरे तर एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून कंपनी वेगवेगळे प्रयोग करून बघते आहे. पाश्चिमात्य देशात सध्या आर्थिक मंदीची लाट जाणवते आहे. अशातच ट्विटरच्या महसुलात देखील घट झालेली पाहायला मिळाली होती. तोट्यात गेलेल्या ट्विटरला पूर्वपदावर आणण्यासाठी कंपनीने कामगार कपात देखील केली आहे. तसेच व्हेरीफाईड ट्विटर खात्यासाठी युजर्सला पैसे मोजावे लागत आहेत.
दरम्यान, आता आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे. ट्विटरने या आठवड्यात आपल्या युजर्ससाठी एक घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना आता TweetDeck वापरण्यासाठी देखील शुल्क भरावे लागेल.वैयक्तिक खात्याच्या व्हेरीफिकेशनसाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जात होते मात्र आता ट्विटरच्या खास फीचर्ससाठी देखील युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत.
खरं तर, या आठवड्यापासून, कंपनीने आपल्या युजर्ससाठी ट्विट वाचण्याची मर्यादा देखील निश्चित केली आहे, ज्यामुळे आता ट्विटर वापरकर्ते फक्त काही मोजकेच ट्विट वाचू शकणार आहेत. ठराविक मर्यादेनंतर त्यांना ट्विटरच्या वाचकांना देखील त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. सामान्य युजर्सने मात्र या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
We have just launched a new, improved version of TweetDeck. All users can continue to access their saved searches & workflows via https://t.co/2WwL3hNVR2 by selecting “Try the new TweetDeck” in the bottom left menu.
— Twitter Support (@TwitterSupport) July 3, 2023
Some notes on getting started and the future of the product…
अशा परिस्थितीत वापरकर्त्यांसाठी TweetDeck साठी पैसे मोजावे लागणार आहेत. ज्या युजर्सचे TweetDeck खाते आहे, अशांनी त्यांचे खाते व्हेरीफाय करून घ्यावे असे ट्विटरने म्हटले आहे. यासाठी 30 दिवसांची मुदत देखील देण्यात आली आहे.
TweetDeck हे Twitter चे विशेष फिचर आहे जे सोशल मीडिया इन्फ़्ल्युएन्सर, मीडिया कंपन्या, राजकीय पक्ष आणि सोशल मीडिया व्यवस्थापकांद्वारे वापरले जाते. यामध्ये यूजर्सना एकाच स्क्रीनवर वेगवेगळ्या अकाऊंटद्वारे केलेले ट्विट दिसतात. ट्विटर ट्रेंड तयार करण्यासाठी या फीचर्सला उपयोग केला जातो. एकाच वेळी अनेक ट्विटर खाते वापरण्याची अनुमती या फिचरद्वारे युजर्सला दिली जाते.
इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या पॉलिसीबद्दल बोलताना म्हटले आहे की कंपनीने ट्विटर युजर्ससाठी काही मर्यादा सेट केल्या आहेत. या पॉलिसीअंतर्गत व्हेरीफाईड खाते असलेले युजर्स दिवसाला 6000 ट्विटर पोस्ट पाहू शकतील. तसेच जे खाते व्हेरीफाईड नसतील अशा युजर्सला दिवसाला केवळ 600 ट्विटर पोस्ट पाहता येणार आहेत. तसेच ही पॉलिसी लागू झाल्यानंतर जे ट्विटर खाते नव्याने बनतील त्यांना केवळ 300 ट्विटर पोस्ट पाहता येणार आहेत.