Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best SIP Fund: एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची आहे? 'या' इक्विटी एसआयपी फंडांनी 30 टक्क्यांपर्यंत दिला आहे परतावा

Best SIP Fund

Best SIP Fund: सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) आर्थिक गुंतवणूक करू शकता. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांसाठी एसआयपी पद्धत अतिशय फायद्याची ठरली आहे. काही इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी चक्क 20 ते 30 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. कोणते आहेत ते फंड, जाणून घेऊयात

सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये आर्थिक गुंतवणूक करू शकता. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूकदाराला महिन्याला ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवावी लागते. बाजारात अस्थिरता असून देखील गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांसाठी एसआयपी पद्धत अतिशय फायद्याची ठरली आहे. काही इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी चक्क 20 ते 30 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. कोणते आहेत इक्विटी एसआयपी फंड जाणून घेऊयात.

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड (Nippon India Large Cap Fund)

पुढील पाच वर्षांतील सर्वोत्तम एसआयपी फंडापैकी एक फंड म्हणून 'निप्पॉन इंडिया लार्ज कॅप' फंडाकडे पाहिले जाते. हा एक लार्ज कॅप फंड आहे. ज्याने अनेक वर्षांमध्ये सर्वाधिक परतावा दिला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडाने 3 वर्षात 30.11 टक्के परतावा दिला आहे. हा फंड प्रामुख्याने लार्ज-कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो, ज्या त्यांच्या स्थिरता आणि वाढीसाठी ओळखल्या जातात. हा फंड 14,171 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी सक्षम आहे.

एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड (HDFC Mid-Cap Opportunities Fund)

एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड ही एक एसआयपी योजना आहे. या इक्विटी म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. हा फंड एक म्युच्युअल फंड असून त्याने प्रामुख्याने देशांतर्गत इक्विटीमध्ये गुंतवणूक केली आहे.

देशांतर्गत इक्विटी श्रेणीमध्ये या फंडाने लार्ज कॅप शेअर्समध्ये 3.22 टक्के, मिड कॅप शेअर्समध्ये 56.61 टक्के आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये 18.49 टक्के गुंतवणूक केली आहे. हा फंड मध्यम आकाराच्या कंपन्यांना प्राधान्य देतो. ज्या पुढे जाऊन चांगला परतावा मिळवून देतात.

अ‍ॅक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटीज फंड (Axis Growth Opportunities Fund)

Axis Growth Fund मध्ये बहुतांश मोठ्या आणि मिड कॅप स्टॉकचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात सर्वाधिक परताव्यासाठी 3-4 वर्षांचा दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवावा लागतो. हा म्युच्युअल फंड प्रामुख्याने देशांतर्गत इक्विटीमध्ये पैसे गुंतवतो. ज्यामध्ये मिड कॅप शेअर्समध्ये 26 टक्के, लार्ज कॅपमध्ये 18.06 टक्के आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये 16.9 टक्के गुंतवणूक समाविष्ट असते. हा फंड पुरेसा परतावा देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. ज्यामध्ये मिड कॅप शेअर्समध्ये सर्वाधिक रक्कम गुंतवली जाते.

Source: hindi.financialexpress.com