Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Deepak Parekh: दिपक पारेख यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीला विराम; HDFC च्या प्रमुख पदावरुन निवृत्तीची घोषणा

एचडीएफसीला मागील चाळीस वर्षांपासून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवल्यानंतर दिपक पारेख यांनी निवृत्तीची घोषणा केली. शुक्रवारी त्यांनी 78 व्या वर्षी संचालक पदावरुन निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. भावनिक पत्र लिहून त्यांनी समभागधारकांशी शेवटचा संवाद साधला. एकत्रीकरणानंतर एचडीएफसी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य कंपनी झाली आहे. यात दिपक पारेख यांचा मोलाचा वाटा आहे.

Read More

Go First एअरलाइन्सची विमाने पुन्हा आकाशात झेपावणार? 425 कोटी रुपये कर्ज देण्यास बँका तयार

गो फर्स्ट एअरलाइन्सची सेवा जुलै महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जदारांनी एअरलाइन्सला 425 कोटी रुपये कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, याआधी DGCA कडून विमान कंपनीचे ऑडिट केले जाणार आहे. मे महिन्यापासून गो फर्स्टची विमाने पार्किंगमध्ये धूळ खात पडली आहेत. आर्थिक चणचणीमुळे कंपनीने आपली सेवा बंद केली होती.

Read More

EV Charging facility: 9 हजार पेट्रोल पंपावर EV चार्जिंगची सुविधा; 'या' कंपनीच्या पंपावर सर्वाधिक चार्जिंग स्टेशन

इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढत असून त्या तुलनेत इव्ही चार्जिंग स्टेशनची संख्या अपुरी असल्याची ओरड वाहन मालकांकडून केली जाते. अनेक खासगी कंपन्या इव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायात उतरत आहेत. दरम्यान, आता पेट्रोल पंपावरही इव्ही चार्जिंग सुविधेचा विस्तार होत आहे. देशभरातील 9 हजार पेट्रोल पंपावर इव्ही चार्जिंगची सुविधा आता सुरू झाली आहे.

Read More

Indian Railways: रेल्वे स्थानकावर मिळणार हॉटेलसारखी रूम ती ही अवघ्या 100 रुपयांत! कसं करणार बुकिंग?

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल आणि तुम्हाला रेल्वे स्टेशनवरच राहावं लागत असेल तर तुम्हाला स्टेशनवरच एक खोली मिळेल. तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा इतर कुठेही जाण्याची गरज राहणार नाही.

Read More

Gifted Golden Cradle: उद्योगपती मुकेश अंबानींनी अभिनेता रामचरणच्या बाळाला गिफ्ट केला सोन्याचा पाळणा, जाणून घ्या किंमत

Industrialist Mukesh Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी, अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या मुलीला एक सोन्याचा पाळणा गिफ्ट दिला आहे. शुक्रवारी राम चरण आणि उपासना यांच्या मुलाचे नाव क्लिन कारा कोनिडेला ठेवण्यात आले. याप्रसंगी अंबानी कुटुंबियांकडून ही भेट वस्तू देण्यात आली.

Read More

India Green Energy: जागतिक बँकेकडून भारताला 12 हजार कोटींचे अर्थसहाय्य; ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारण्यास मदत

2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. मात्र, अद्यापही भारतात 56% ऊर्जा जीवाश्म इंधनापासून निर्माण होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक बँकेने भारताला आर्थिक मदत दिली आहे. ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने मंजूर केले आहेत.

Read More

Cultivation Of Vegetables : पावसाळ्यात 'या' भाज्यांची लागवड करून शेतकऱ्यांना मिळू शकतो भरघोस नफा

Cultivation Of Vegetables : भारतात अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात ज्या वर्षभर उपलब्ध असतात. काही भाज्या अशा आहेत ज्या केवळ एका हंगामात उपलब्ध असतात. तर जाणून घेऊया, पावसाळ्यात कोणत्या भाज्या उपलब्ध असतात आणि त्या भाज्यांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना किती नफा मिळू शकतो?

Read More

DA Hike for State Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! महागाई भत्ता वाढला, जूनच्या वेतनात रोख मिळणार

DA for State Employees: राज्यात जवळपास 17 लाख कर्मचारी आहेत. राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार महागाई भत्ता 38% वरुन 42% इतका वाढवण्यात आला आहे.

Read More

भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार! एकत्रीकरणानंतर HDFC Bank देशातील दुसरी बलाढ्य कंपनी

HDFC बँक आणि HDFC या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यामुळे एचडीएफसी बँक भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. जगभरातील बँकांच्या यादीतही एचडीएफसीने चौथ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे.

Read More

SDRF Fund : केंद्र सरकारकडून 6,194 कोटी रुपयांच्या आपत्ती निवारण निधीला मंजुरी

देशात मान्सून सर्व दूर पोहोचला आहे. या काळात अनेक ठिकाणी पूर, भूस्खलन , विजा पडणे या सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील 19 राज्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत एकूण 6,194.40 कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आहे.

Read More

Shinde Fadnavis Government: शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती; वर्षभरात घेतले हे फायद्याचे निर्णय

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शुक्रवारी (दि. 30 जून) एक वर्ष पूर्ण झाले. या नवीन सरकारने राज्यातील जनतेसाठी कोणत्या योजना दिल्या? काय सोयीसुविधा दिल्या? एकूणच नागरिकांना या सरकारकडून काय मिळाले हे आपण पाहणार आहोत.

Read More

Seafood Exports : मत्स्यउद्योगाची अर्थक्रांती; भारताने 64 हजार कोटींचे सीफूड केले निर्यात

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताने सीफूड निर्यातीमध्ये आतापर्यतचा उच्चांक गाठला असल्याची माहिती केंद्रीय मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत FY2023 मध्ये भारताने निर्यातीमध्ये 26.73% आणि मूल्याच्या बाबतीत 4.31% वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 23 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वोच्च 17,35,286 टन सीफूडची निर्यात झाली आहे. या माध्यामातून सुमारे 64 हजार कोटीची कमाई केली आहे.

Read More