Agricultural News : दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला पेरणी सुरू होते. पेरणी सुरू झाली की, शेतकऱ्याला उत्पादन खर्च करावा लागतो. काही शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्टेबल असतात म्हणून त्यांना अडचणी येत नाही. पण, बरेच शेतकरी असे असतात ज्यांच्या तोंडातून पेरणीच्या वेळी 'सध्या पैशाची अडचण आहे' हाच शब्द ऐकायला मिळतो. मग पेरणीच्या वेळी आर्थिक अडचणी येऊ नये किंवा आर्थिक अडचणी कमी झाल्या पाहिजेत या साठी काय करावे? कोणत्या टिप्स वापराव्यात ते जाणून घेऊया.
Table of contents [Show]
उत्पन्नातून आलेले पैसे कारणास्तव खर्च करा
दरवर्षी शेतातील उत्पन्नाचे पैसे आले की, त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कारण नसतांना पैसे खर्च करू नये. पुढील पेरणीसाठी पैसे वाचवूनच बाकी खर्च करावे. शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते त्यामुळे त्यात हलगर्जीपणा करून चालणार नाही. घर खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि इतर आवश्यक खर्च करता येईल इतके पैसे सुद्धा बाजूला काढावे. बचत करायची असेल तर काही महिन्यांच्या खर्चावर लक्ष ठेवावे लागेल. याआधी, तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्ही कोणते खर्च वजा करू शकता आणि कोणते नाही. खर्चाबाबत शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे.
झालेला सर्व खर्च लिहून ठेवा
खर्च करतांना आपण वाहवत जातो आणि आपलं खर्चावर नियंत्रण राहत नाही. झालेल्या खर्चाची नोंद ठेवल्यास खर्चावर नियंत्रण राहते. जर तुम्ही प्रत्येक खर्चाचा मागोवा घेतला नाही तर तुम्हाला उत्पन्न आणि खर्चाची योग्य कल्पना येणार नाही. यामुळे, तुम्ही पैशाशी संबंधित चुकीचे निर्णय घ्याल. खर्च लिहण्यासाठी ट्रॅकिंग आणि खर्च अॅप किंवा स्वयंचलित सॉफ्टवेअर वापरू शकता.
अत्यावश्यक नसतांना कर्ज काढू नका
पेरणीच्या वेळी अनेक शेतकरी उत्पन्नाच्या आशेवर बँकेकडून कर्ज घेतात. काही वेळा ते कर्ज फेडण्यास शेतकरी समर्थ असतो पण काही वेळा निसर्ग साथ देत नाही आणि कर्जाला कर्ज पुरत जाते. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन बिघडते. त्यामुळे शक्य असेल तो पर्यंत कर्जाऐवजी दूसरा पर्याय वापरावा.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्या
शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहे. बियाणे घेण्यापासून ते उत्पन्न घरी येत पर्यंत प्रत्येक कामासाठी शासनांकडून शेतकऱ्यांसाठी योजना आहेत. त्या योजनांची माहिती काढून त्याचा लाभ घेतल्यास बचत होते. त्या बचतीमधून पुढील वर्षी पेरणी होऊ शकते. कर्जमाफी योजना, नापिकी झाल्यास शासनाकडून रक्कम दिली जाते. शेतकरी सन्मान निधी आणि अधिक बऱ्याच योजनांचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.
पीक विमा घेण्यास विसरू नका
शासनांकडून शेतकऱ्यांसाठी अनेक विमा योजना राबविल्या जातात. त्याचबरोबर शेतकरी स्वतः सुद्धा विमा घेऊ शकतात. आता राज्य शासनाकडून 1 रुपयांत पीक विमा काढून मिळणार आहे. शेतातील पिकाचा विमा घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. विमा भविष्याच्या दृष्टीने मदतीचा हात असतो.