Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Threads App: ट्विटरला करा बाय बाय! मेटा आणत आहे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, कधी होणार लॉन्च? वाचा...

Threads App: ट्विटरला करा बाय बाय! मेटा आणत आहे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, कधी होणार लॉन्च? वाचा...

Image Source : www.appleinsider.com

Threads App: मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरला टक्कर देण्यासाठी मेटा एक प्रतिस्पर्धी आणत आहे. कंपनी या आठवड्यात टेक्स्ट-बेस्ड अ‍ॅप थ्रेड्स अ‍ॅप लॉन्च करण्याची शक्यता आहे. जेव्हा ट्विटर यूझर्स नवीन अ‍ॅप शोधू लागले तेव्हाच मेटानं थ्रेड्स अ‍ॅपची घोषणा केली आहे.

एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून ट्विटर चर्चेत आहे. खरं तर वादात आहे. कंपनीनं अनेक वादग्रस्त निर्णय घेतले अजूनही ही मालिका सुरूच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्विटरवर प्रत्येकच बाबीसाठी पैसे मोजावे लागणं (Paid) आणि इतर बाबतीत मर्यादा घालून दिल्यानं ट्विटर यूझर्स वैतागले असून नव्या प्लॅटफॉर्मच्या शोधात आहेत. नुकताच ट्विटरनं 6,000, 600 पोस्टचा नवा नियम लागू केला, तेव्हापासून यूझर्सनी इतरत्र शोधाशोध सुरू केली. त्यात मेटानं (Meta) ही बातमी दिली आहे.

कधी लॉन्च होईल अ‍ॅप?

हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Text-Based Chatting App) 'थ्रेड्स' गुरुवार, 6 जुलैला येण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, या 'थ्रेड्स' अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे यूझर्स फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामप्रमाणेच (Instagram) यूझरनेम ठेवू शकणार आहेत. तसंच इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या सर्वांना 'थ्रेड्स'वर फॉलो करता येणार आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर ही माहिती देण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअरवर याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नवे अ‍ॅप लॉन्च करण्याचा निर्णय का?

'थ्रेड्स' हे अ‍ॅप मेटा कंपनीतर्फे असणार आहे. हे अ‍ॅप लॉन्च करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एलन मस्क यांनी ट्विटरवर जाहीर केलेले निर्बंध होय. ट्विटडेक (TweetDeck) वापरण्यासाठी अकाउंट व्हेरिफाय करणं आवश्यक असल्याची केलेली घोषणा याचादेखील यात समावेश आहे. शिवाय पेड बाबींवर यूझर्सचा आक्षेप आहे. ब्लू टिक, शब्दमर्यादा, ट्विटडेक अशा विविध बाबींमध्ये प्रचंड निर्बंध आल्यानं आणि अनेक फीचर्स पेड केल्यानं यूझर्सदेखील आता ट्विटरला दणका देण्याच्या तयारीत आहेत.  

यूझर्सकडून ट्विटर अल्गोरिदमचा शोध सुरू

या स्पर्धेत #DigitalNagrik ला काय मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे सबस्क्रिप्शन नसलेल्या यूझर्सना फक्त 600 मेसेज वाचण्याचे निर्बंध ट्विटरनं घातले. एलन मस्क यांनी हे निर्बंध जाहीर केल्यानंतर, ब्लूस्काय (Bluesky) आणि मास्टोडॉन (Mastodon) यासारख्या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्टिव्हिटी वाढल्या आहेत. तसंच एक चांगला सक्षम आणि तुलनेनं कमी वादग्रस्त असा पर्याय यूझर्स शोधत आहेत.

मस्क यांचं फर्मान

एलन मस्क यांनी ट्विट केलं होतं, की व्हेरिफाइड यूझर एका दिवसाला केवळ 6000 पोस्ट पाहू शकतो. तर अनव्हेरिफाइड यूझर्स केवळ 600. पण काही तासांत त्यांनी ही मर्यादा 3 वेळा बदलली. मस्क यांनी शनिवारी रात्री एका ट्विटमध्ये म्हटलं होतं, की डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम हॅकिंग रोखण्यासाठी, आम्ही आमच्या स्तरावर काही तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या आहेत, व्हेरिफाइड ट्विटर अकाउंट्स दररोज 6000 पोस्ट, अनव्हेरिफाइड अकाउंट्स 600 पोस्ट्स प्रतिदिन वाचू शकणार आहेत. तर नवीन अनव्हेरिफाइड खात्यांना दररोज 300 ट्विटची मर्यादा घालून दिली आहे.