Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sugar Price : उसाची एफआरपी वाढली; कारखानदारांच्या आग्रही भूमिकेने साखर महागणार?

Sugar Price : उसाची एफआरपी वाढली; कारखानदारांच्या आग्रही भूमिकेने साखर महागणार?

Image Source : www.business-standard.com

साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही. नव्या वाढीव एफआरपीमुळे साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे एफआरपीसोबत ताळमेळ घालण्यासाठी साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या दरामध्ये वाढ करण्याबाबतही सरकारने विचार करावा असे मत इस्माचे अध्यक्ष झुनझुनवाला यांनी व्यक्त आहे.

साखर हा प्रत्येकाच्या आहारातील नियमित वापरला जाणारा एक गोड पदार्थ आहे. मात्र आगामी काळात साखरेची गोडी थोडी कमी होण्याची शक्यता आहे. कारण साखर कारखानदारांकडून साखरेच्या किंमती वाढवण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 2023-24 च्या गाळप हंगामात साखर आणि इथेनॉलच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी साखर कारखानदारांकडून केंद्राकडे विचारणा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वाढीव उसदर दिल्यानंतर ही मागणी समोर येत आहे.

एफआरपी वाढली ‘एमएसपी’वाढीची मागणी-

केंद्र सरकारने 2023-24 हंगामासाठी उसाच्या रास्त आणि फायदेशीर भावात (FRP) प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढ केली आहे. शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात 315 रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे. मागील वर्षी ऊसाला 305 रुपये भाव देण्यात आला होता. त्यामुळे ऊस लागवडीच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील साखर कारखानदारांनी आता एमएसपी (किमान विक्री मूल्य) यामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. एसएसपी (MSP)मध्ये वाढ केल्या शिवाय साखर कारखानदार आर्थिक अडचणीतून बाहेर येणार नाहीत अशी भूमिका साखर कारखानदारांनी मांडली आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA)ची भूमिका-

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने एमएसपी बाबत भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे, की सरकारने शेतकऱ्यांसाठी एफआरपी वाढ केली ही चांगली बाब आहे. मात्र सरकारने यासोबतच साखरेची एमएसपी आणि इथेनॉलच्या खरेदी दरात देखील वाढ करण्याबाबत निर्णय घ्यायला हवा. साखरेची एमएसपीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. गेल्या तीन वर्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही. नव्या वाढीव एफआरपीमुळे साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे एफआरपीसोबत ताळमेळ घालण्यासाठी इथेनॉलच्या दराबाबतही सरकारने विचार करावा असे मत इस्माचे अध्यक्ष झुनझुनवाला यांनी व्यक्त केल्याचे वृत्त बिसनेस लाईनने दिले आहे.

प्रतिक्विटल 400 रुपये वाढ करण्याची मागणी-

केंद्र सरकारने 2019 मध्ये शेवटची एमएसपी केली होती.त्यावेळी साखरेची किमान विक्री किंमत 3100 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत ‘एमएसपी’मध्ये वाढ झालेली नाही. 2019 मध्ये एफ.आर.पी. 2750 रुपये प्रति टन आणि तेव्हापासून एफआरपीमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली आहे. 2023-24 चा एफआरपी 3150 रुपये प्रति टनावर पोहोचला आहे. परंतु साखरेचा एमएसपी 3100 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहे. साखरेचा 80 टक्के नफा आणि इथेनॉल उत्पादनातून 20 टक्के नफा साखर कारखानदार शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे आता एमएसपी किमान 400 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याची गरज आहे. एमएसपी वाढवल्यास आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या साखर कारखानदारांना आर्थिक दिलासा मिळू शकेल, असे मत राज्यातील साखर कारखानदारांनी व्यक्त केले आहे.

तर साखर महाग होणार?

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरात वाढ केल्याने साखर कारखानदारांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. सध्याची एमएसपीही 3100 रुपये प्रति क्लिंटल आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून साखरेचे दर एमएसपीच्या आसपास आहेत. त्यामुळे कारखानदारांच्या मागणी नुसार केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढ करण्यास परवानगी दिल्यास  भविष्यामध्ये साखरेच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.