Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BNCAP Mechanism: भारताची स्वत:ची कार अपघात चाचणी सुविधा; वाहनांना मिळणार सेफ्टी रेटिंग

Car Testing in India

Image Source : www.auto.economictimes.indiatimes.com

1 ऑक्टोबर 2023 पासून कार टेस्टिंगची सुविधा सरकार सुरू करणार आहे. भारतामध्ये जगभरातील आघाडीच्या कार निर्मिती कंपन्यांचे प्रकल्प आहेत. तसेच कार आयातही केल्या जातात. या सर्व कारच्या मॉडेलची चाचणी अनिवार्य असेल. त्यानंतरच वाहनांना परवाना दिला जाईल.

BNCAP Mechanism: रस्त्यावर कोणतीही कार येण्याआधी तिची अपघात चाचणी घेतली जाते. यातून अपघातावेळी वाहनाला किती नुकसान पोहचू शकते तसेच आत बसलेल्या नागरिकांना किती धोका आहे याचा अंदाज बांधला जातो. (BNCAP car testing) जर अपघात चाचणीमध्ये कार फेल झाले तर वाहनाला परवानगी देखील नाकारली जाते. सध्या भारतात कार चाचणीची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. Global NCAP आणि इतर काही परदेशी कंपन्या क्रॅश टेस्टिंगमध्ये आघाडीवर आहेत. आता भारत सरकार स्वत:ची कार टेस्टिंग फॅसिलिटी आणणार आहे.

वाहनांना सेफ्टी रेटिंग मिळणार

भारत न्यू कार अॅसेसमेंट प्रॉग्राम (BNCAP) सरकारद्वारे लाँच केला जाणार आहे. याद्वारे कारला सेफ्टी रेटिंग दिले जाणार आहे. ज्या वाहनाचे रेटिंग चांगले आहे त्या कंपनीची गाडी सुरक्षित समजली जाते. ग्राहकही जास्त रेटिंग असलेली कार खरेदी करण्यावर भर देतात. कार खरेदीचा निर्णय घेताना रेटिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

कधी पासून कार टेस्टिंग सुरू होणार?

1 ऑक्टोबर 2023 पासून कार टेस्टिंगची सुविधा सुरू होणार आहे. भारतामध्ये जगभरातील आघाडीच्या कार निर्मिती कंपन्यांचे प्रकल्प आहेत. तसेच कार आयातही केल्या जातात. या सर्व कार मॉडेलची चाचणी करणे अनिवार्य असेल. त्यानंतरच वाहनांना परवाना दिला जाईल. चाचणीसाठी तयार केलेली गाडी आणि चाचणीचा खर्च वाहन कंपनीद्वारे केला जाईल.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मागील काही वर्षांपासून वाहन नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. गाडीमध्ये मागे बसलेल्या व्यक्तीलाही सीट बेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. सोबतच पुढच्या सीटसोबत मागच्या सीटवरील प्रवाशांसाठीही एअर बॅग्जची सुविधा असावी यासाठी सरकार आग्रही आहे. सध्या फक्त प्रिमियम आणि टॉप मॉडेलमध्येच सर्व सीटला एअर बॅग्ज आहेत. भविष्यात गाडीतील सर्व प्रवाशांसाठी एअर बॅग्ज अनिवार्य होऊ शकते.