Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Investment in Maharashtra : राज्यात 40000 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता; 1 लाख 20 हजार रोजगारांची निर्मिती होणार

राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या गुंतवणुकीचे प्रकल्प हे प्रामुख्याने पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागात होणार आहेत. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूकही 40 हजार कोटी रुपये इतकी असले. या प्रकल्पांची निर्मिती झाल्यास राज्यात सुमारे 1 लाख 20 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Read More

Agriculture Officer in Bank : बँकेत कृषी अधिकाऱ्यांचीही पोस्ट असते का? जाणून घ्या, पगार किती मिळत असेल?

Agriculture Officer in Bank : कृषी अधिकारी होण्यासाठी IBPS परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी फलोत्पादन, पशुसंवर्धन, डेअरी सायन्स किंवा इतर कोणत्याही संबंधित विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त करावी लागेल. ग्रॅज्युएशननंतर IBPS द्वारे घेण्यात येणारी परीक्षा द्यावी लागते.

Read More

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल चांगला भाव, FRP मध्ये वाढ!

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने साखर हंगाम 2023-24 साठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी 315 रुपये प्रति क्विंटल या आतापर्यंतच्या ऊसाच्या सर्वोच्च रास्त आणि लाभदायक किंमतीला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फायदा होणार आहे.

Read More

Influencer marketing: सोशल मीडियाने 'सेलिब्रिटी'ची व्याख्या बदलली; भारतात 30 लाखांपेक्षा जास्त इन्फ्लूएन्सर

भारतामध्ये मागील काही वर्षात डिजिटल क्रांती घडून आली आहे. 2030 पर्यंत देशातील इंटरनेट युझर्सची संख्या 100 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आल्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहितीचा पूर आला आहे. लाखो इन्फ्लूएन्सर्स तयार झाले. यातून इन्फ्लूएन्सर मार्केटिंग आणि ब्रँड प्रमोशनची एक वेगळीच अर्थव्यवस्था उभी राहीली आहे.

Read More

Pandharpur Wari 2023: सोलापूरातून विमान सेवा लवकरच, पंढरपूरसह इतर तिर्थक्षेत्रांना चालना मिळणार

Pandharpur Wari 2023: वर्ष 2016 मध्ये उडान योजनेत सोलापूरचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी विमान सेवेच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याने विमान सेवेला खो बसला. आता चिमणीचा अडथळा दूर झाला आहे.

Read More

UBS Layoffs: युरोपमधील UBS बँक 35 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार?

UBS Bank: मंदीमुळे सुरु झालेल्या आर्थिक संकटाचा सामना युरोपातील बँकांनासुध्दा करावा लागत आहे. युरोपमधील सर्वात जुन्या बँकांपैकी एक असलेल्या क्रेडिट सुइस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी, स्विस सरकारने हस्तक्षेप करुन तिचे विलीनीकरण UBS मध्ये केले. परंतु, क्रेडिट सुइस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात UBS बँक आता स्वत: मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली असल्याचे दिसत आहे.

Read More

World Cup 2023: वर्ल्डकप सामन्यांच्या घोषणेनंतर अहमदाबादच्या हॉटेल आणि फ्लाईट्सच्या दरात प्रचंड वाढ

भारत आणि पाकिस्तान अशी लढत असली की क्रिकेट रसिकांना वेगळाच हुरूप येत असतो. आता तुम्ही देखील अहमदाबाद येथे होणाऱ्या ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना लाइव्ह पाहण्याचा आणि अंतिम सामना बघण्याचा विचार करत असाल, तर लवकरात लवकर तुमचे हॉटेल बुकिंग करा. जितक्या उशिरा बुकिंग कराल तितके जास्त पैसे मोजावे लागतील हे लक्षात असू द्या!

Read More

Vedanta Share: अनिल अग्रवालांची वेदांता सुरू करत आहे नवा व्यवसाय, 3500 तरुणांना मिळणार नोकऱ्या

Vedanta Share: अनिल अग्रवाल यांची वेदांता कंपनी आता एक नवा व्यवसाय सुरू करणार आहे. या माध्यमातून रोजगारनिर्मितीदेखील होणार आहे. जवळपास 3500 होतकरू असलेल्यांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read More

US Products in India: प्रधानमंत्री मोदींच्या अमेरिका भेटीनंतर अमेरिकन सफरचंद, अक्रोड आणि बदाम होणार स्वस्त...

2018 साली अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव स्टील उत्पादनांवर 25 टक्के आणि काही ॲल्युमिनियम उत्पादनांवर 10 टक्के आयात शुल्क लादले होते. तसेच अमेरिकेने स्वीकारलेल्या व्यापार धोरणानुसार भारताला 'फेव्हर्ड कंट्री' या श्रेणीतून काढून टाकले होते. अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी भारताने जून 2019 मध्ये 28 अमेरिकन उत्पादनांवर सीमाशुल्क लादले होते.

Read More

Jio Financial Services: जिओ नॉन-बँकिंग कंपनीकडून ग्राहकांना मिळणार ईएमआयची सुविधा

Reliance Begins Consumer Finance Pilots: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँकेसह ग्राहकांना फायनान्स पुरवण्याचा (Customer Financing) व्यवसाय सुरू केला आहे. जिओला या संधीचा लाभ घेत NBFC (Non-Banking Financial Companies) ग्राहकांना आकर्षित करायचे आहे.

Read More

Monsoon season business : पावसाळ्यात सुरू करू शकता 'हे' 5 व्यवसाय, जाणून घ्या डिटेल्स

Monsoon season business : सिजनेबल व्यवसाय सुरू करून लोक खूप चांगला नफा कमावतात आणि प्रत्येक हंगामात त्या वस्तूंचा व्यवसाय यशस्वी होतो, ज्यांचा त्या वेळी अधिक वापर केला जातो आणि लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तर जाणून घेऊया, पावसाळ्यात चालणारे बिझनेस कोणते आहेत?

Read More

PAN-Aadhar Link: तुमचंही पॅन-आधार लिंक फेल होत आहे का? मग या स्टेप्स फॉलो करा

आयकर विभागाने पॅन-आधार कार्डवरील डेटा जुळत नसल्याने लिंक करताना अडचण येऊ शकते, याबाबत नागरिकांना सावध केले आहे. जर ही माहिती मिसमॅच होत असेल नागरिकांना इतर पर्याय दिले आहेत. बायोमेट्रिक अथाँटिकेशनद्वारे तुम्ही लिंक करू शकता. तसेच पॅन-आधारकार्ड आधी अपडेट करून पुन्हा लिंक करण्याच प्रयत्न करू शकता. लिंक करण्यासाठी लेखात दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

Read More