• 05 Jun, 2023 17:50

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Samsung Fab Grab Fest 2023 : कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करा कोणतीही वस्तू, मिळेल भरघोस डिस्काउंट

Samsung Fab Grab Fest 2023

Image Source : www.samsung.com

Samsung Fab Grab Fest 2023 : सॅमसंग कंपनीने खास आपल्या ग्राहकांसाठी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट 2023 कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु केला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहक त्यांना आवडणाऱ्या उत्पादनांची थेट खरेदी करू शकतील आणि बंपर डिस्काउंट मिळवू शकतील. कंपनी कोणत्या उत्पादनांवर किती डिस्काउंट देत आहे, जाणून घेऊयात.

सॅमसंग (Samsung) ही भारतातील नामांकित कंपन्यांपैकी एक कंपनी असून अनेकांच्या घरी आपल्याला Samsung कंपनीची उत्पादने पाहायला मिळतात. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाइल आणि लॅपटॉप अशा अनेक उत्पादनांची निर्मिती कंपनी करत आहे. कंपनीच्या दर्जेदार उत्पादनांमुळे आणि सेवेमुळे ग्राहक देखील मोठ्या प्रमाणावर कंपनीची उत्पादने खरेदी करतात. नुकताच Samsung कंपनीने 4 मे 2023पासून यावर्षीचा सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट 2023 (Samsung Fab Grab Fest 2023) सुरु केला आहे.

हा सेल अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर नसून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू करण्यात आला आहे. ग्राहक येथून परवडणाऱ्या किंमतीत  स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि इतर उत्पादनांची खरेदी करू शकतात आणि बंपर डिस्काउंट मिळवू शकतात. नेमका कोणत्या उत्पादनांवर किती डिस्काउंट मिळतोय, जाणून घेऊयात.

टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसीवर मिळेल 'इतका' डिस्काउंट

जर तुम्हाला देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. Frame TV, QLED TV, 43 आणि 55 इंचाचा UHD TV वर कंपनी ग्राहकांना 45 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

गृहिणींना जर घरी फ्रीज खरेदी करायचा असेल, तर 615L Convertible 5in1 Side by Side refrigerator वर ग्राहकांना कंपनीकडून 40 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. सोबतच काही निवडक SBS मॉडल्स कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.  

9 किलो क्षमतेची Front Load Washing Machineवर ग्राहकांना 30 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. तर 32 लिटर क्षमतेचा Convection Microwave  ग्राहकांना 35 टक्के डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

याशिवाय M8 Smart Monitor 32 inch आणि G5 Gaming Monitor 24 inch वर ग्राहकांना चक्क 59 टक्के डिस्काउंट देण्यात आला आहे. तर ऐन उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी WindFree™ AC 1.5 Ton 3 star rating एसीच्या खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

स्मार्टफोन, टॅब आणि लॅपटॉपवर मिळेल 'इतका' डिस्काउंट

Galaxy S21 FE 5G, Flip 3, A54 5G, Galaxy M14, Galaxy F14, Galaxy F23 या सॅमसंगच्या स्मार्टफोनवर ग्राहकांना थोडा नाही, तर तब्बल 57 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

Galaxy Book 2, Galaxy Book Go, Galaxy Book 3, Galaxy Book3 Pro 360 या सॅमसंगच्या लॅपटॉपवर ग्राहकांना 29 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

Galaxy S6 Lite WiFi, Galaxy A8 WiFi आणि Galaxy Watch 4 यासारख्या मॉडर्न टॅबवर ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. ज्यामुळे परवडणाऱ्या किंमतीत ही उत्पादने ग्राहक खरेदी करू शकतील.  

बँक ऑफर्सबद्दल जाणून घ्या

बँक ऑफर्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ग्राहकांना HDFC आणि ICICI बँकेच्या कार्डवर स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि इतर उत्पादनांच्या खरेदीवर 14 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) आणि कोटक बँकेसारख्या (Kotak Bank)  इतर मोठ्या बँकांच्या कार्डवरून ग्राहकांनी Samsung TVs आणि Digital Appliances ची खरेदी केल्यावर त्यांना  22.5 टक्क्यांपर्यंतकॅशबॅक दिला जाईल. 

Source: navbharattimes.indiatimes.com