ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि सर्वाधिक गुंतवणूक मिळवण्यासाठी देशातील खासगी क्षेत्रातील सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने (Suryoday Small Finance Bank) त्यांच्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेने 1 ते 5 वर्षाच्या एफडीवर 49 ते 160 बेसिस पॉईंटने म्हणजेच 0.49% ते 1. 60% वाढ केली आहे. बँकेचे हे नवीन व्याजदर 5 मे 2023 पासून लागू झाले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर बँकेकडून जास्तीत जास्त 9.10% व्याज देण्यात येत आहे.
बँकेत ग्राहक 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात. सूर्योदय स्मॉल फायनास बँक सर्वसामान्य ग्राहकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 4% ते 9.10% व्याजदर देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीसाठी 4.50% ते 9.60% व्याजदर देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार बँकेच्या नियमित ग्राहकांना 5 वर्षाच्या एफडीवर 9.10% व्याजदर दिला जाणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 9.60% व्याजदर देण्यात येणार आहे.
Table of contents [Show]
7 दिवस ते 6 महिने
7 ते 14 दिवसांसाठी बँक सामान्य ग्राहकांना 4% तर जेष्ठ नागरिकांना 4.50% व्याजदर देत आहे. तसेच 15 दिवस ते 45 दिवसाच्या कालावधीतील एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 4.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 4.75% व्याज देण्यात येत आहे.
46 दिवस ते 90 दिवसातील एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 4.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 5% व्याज देण्यात येत आहे.
91 दिवस ते 6 महिन्यांच्या कालावधीतील एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 5% तर ज्येष्ठ नागरिकांना 5.50% व्याज देण्यात येत आहे.
6 महिने ते 2 वर्षापेक्षा कमी कालावधी
6 महिने ते 9 महिन्यांच्या कालावधीतील गुंतवणुकीवर सर्वसामान्य ग्राहकांना 5.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 6% व्याज बँकेकडून देण्यात येत आहे. तसेच 9 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 6% तर ज्येष्ठ नागरिकांना 6.50% व्याज देण्यात येत आहे. 1 वर्ष ते 1.6 वर्षासाठी सर्वसामान्य ग्राहकांना बँक 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज देण्यात येत आहे. 1.6 वर्ष ते 2 वर्षापेक्षा कमी एफडीमधील गुंतवणुकीवर सर्वसामान्य ग्राहकांना 8.01% व ज्येष्ठ नागरिकांना 8.51% व्याज देण्यात येत आहे.
2 वर्षापेक्षा जास्त ते 5 वर्षापेक्षा कमी कालावधी
2 वर्षापेक्षा जास्त ते 998 दिवसांपर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.51% व ज्येष्ठ नागरिकांना 8.01% व्याज देण्यात आले आहे. 999 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 9% व ज्येष्ठ नागरिकांना 9.50% व्याज देण्यात येत आहे. 32 महिने 27 दिवस ते 3 वर्षा पर्यंतच्या गुंतवणुकीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज देण्यात येत आहे. 3 वर्षापेक्षा जास्त ते 5 वर्षापेक्षा कमी कालावधीतील गुंतवणुकीवर सर्वसामान्य ग्राहकांना 6.75% व ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याज देण्यात येणार आहे.
5 वर्ष ते 10 वर्षापेक्षा कमी कालावधी
5 वर्षाच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 9.01% तर ज्येष्ठ नागरिकांना 9.26% व्याज मिळणार आहे. 5 वर्षाहून अधिक आणि 10 वर्षापेक्षा कमी कालावधीतील गुंतवणुकीवर बँक सर्वसामान्य ग्राहकांना 6% व ज्येष्ठ नागरिकांना 6.50% व्याज मिळणार आहे.
Source: hindi.moneycontrol.com