डिजीटल पेमेंटसाठी (Digital payments) सध्या विविध अॅप उपलब्ध आहेत. शिवाय बँकांच्या अॅपवरूनही पैशांचे व्यवहार करता येतात. गुगल पे (Google pay), फोन पे (Phonepe) ही काही अॅप्स आहेत. यावरून यूपीआय पेमेंट (Unified Payments Interface) होतात. यातलंच एक अॅप म्हणजे पेटीएम (Paytm). सहज पैसे ट्रान्सफर होत असल्यानं या अॅपला अधिक मागणी असल्याचं मागच्या काही आकडेवारीवरून दिसून येतंय. नोटाबंदीच्या काळात पेटीएमनं आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. वन 97 कम्यूनिकेशन्स (One97 Communications) ही पेटीएमची मूळ कंपनी आहे. या कंपनीला आता अच्छे दिन आले आहेत.
Table of contents [Show]
आयपीओ लॉन्च, मात्र लिस्टिंगच्या दिवशी दणका
या वर्षाच्या (2023) जानेवारी-मार्च या तिमाहीत पेटीएमच्या तोट्यात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळालंय. तर फायदाही दुप्पट झाल्याचं दिसून येतंय. कंपनीच्या एकत्रित महसुलामध्ये तब्बल 52 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय. पेटीएममधल्या भागधारकांना याचा किती फायदा होतो, हे आता पाहावं लागणार आहे. कंपनीनं आपला आयपीओदेखील लॉन्च केला होता. 18,000 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा हा आयपीओ होता. याची किंमत प्रचंड होती, मात्र तरीदेखील यात अनेकांनी उत्साहानं सहभाग तर घेतला. पण लिस्टिंगच्या दिवशी त्यांना दणका बसला. तब्बल 25 टक्क्यांहून अधिकचं नुकसान सहन करावं लागलं. तेव्हापासूनच कंपनीचे शेअर्स सतत खाली राहिले आहेत.
Led by payments and loan distribution business growth, in Fourth Quarter of FY23, our revenue jumped to ₹2,334 crore up 51% YoY and EBITDA before ESOP grew to ₹101 crorehttps://t.co/4j7OIwBn5S pic.twitter.com/OzcsTHbjhl
— Paytm (@Paytm) May 5, 2023
तोटा किती?
कंपनीचा किती टक्के फायदा झाला किंवा महसुलात वाढ झाली याची आकडेवारी तर पाहिली. मात्र यासोबतच कंपनीचा तोटाही होतोय. कंपनी फायद्यात आहे, याचा अर्थ तोटा नाही, असं अजिबात नाही. मागची तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च (2023) या कालावधीत पेटीएमचा तोटा कमी झाला. तो 150 कोटी इतका होता. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचा एकत्रित तोटा 168 कोटी रुपये होता. मागच्या आर्थिक वर्षात याच कालावधीचा विचार केल्यास दोन्ही आकडेवारीत प्रचंड तफावत दिसून येतेय. 2021-22च्या याच तिमाहीत हा तोटा 761 कोटी रुपये इतका नोंदवला गेला होता. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीच्या कालावधीत हा तोटा 392 कोटी रुपये इतका होता.
तोटा भरून काढण्याचा प्रयत्न
कंपनीच्या महसुलात वाढ झालीय. मात्र तोटा भरून काढणं हे कंपनीसमोरचं लक्ष्य आहे. पेटीएमचा एकत्रित महसूल वाढलाय. तो 52 टक्क्यांनी वाढून 2,335 कोटी रुपये इतका झालाय. याच आकड्यात आणखी भर घालून आपला तोटा भरून काढत नफ्यात येण्याचा प्रयत्न कंपनीकडून होताना दिसून येतोय. त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर कंपनीनं विविध मूल्यवर्धित सेवा सुरू केल्या आहेत. सोबतच पेटीएम प्लॅटफॉर्म चार्जही घेतं. त्यातून पेटीएमला चांगला महसूल मिळतो. एअरटेल पेमेंट्स बँकेच्या पेटीएममधल्या विलीनीकरणाबाबतची चर्चादेखील दोन्ही कंपन्यांमध्ये सुरू झालीय. त्यामुळे त्याचादेखील फायदा पेटीएमच्या महसूलवाढीत होणार आहे.
नियमित आणि मासिक यूझर्स वाढले
ऑपरेशन लेव्हलवर कंपनीनं 101 कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय. मागच्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2021-22 या कालावधीत कंपनीचा नफा 368 कोटी रुपये इतका होता, असं पेटीएमनं सांगितलं. पेटीएम या प्लॅटफॉर्मवर विक्री केलेल्या एकूण वस्तूंचं मूल्य म्हणजेच एकूण व्यापारी मूल्य वार्षिक आधारावर 40 टक्क्यांनी वाढून 3.62 लाख कोटी रुपये इतकं झालंय. नियमित यूझर्स तर आहेतच. मात्र मासिक आधारावर व्यवहार करणारेही ग्राहक वाढत असल्याचं कंपनीनं सांगितलंय. आताची आकडेवारी पाहता मासिक व्यवहार करणारे ग्राहक 27 टक्क्यांनी वाढत 90 दशलक्ष इतके झाले आहेत.