Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

PhonePe UPI Lite: फोन पे कडून युपीआय लाइट फिचर लाँच; PIN शिवाय पाठवता येतील पैसे

कमी किंमतीचे UPI पेमेंट अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी फोन पे ने UPI Lite हे फिचर्स आजपासून लाँच केले आहे. पीनशिवाय तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ऑनलाइन व्यवहार करता येतील. जास्तीत जास्त 2000 हजार रुपये तुम्ही युपीआय लाइट वॉलेटमध्ये ठेवू शकता. हे वॉलेट अॅक्टिव्हेट कसे कराल ते जाणून घ्या.

Read More

WHO Alert Over Indian Syrup : डब्ल्यूएचओच्या सतर्कतेनंतर सीडीएससीओनंही कफ सिरप दूषित असल्याचं केलं मान्य

WHO Alert Over Indian Syrup : भारतात बनवल्या जाणाऱ्या एका कफ सिरपमध्ये धोकादायक तत्व असल्याचं आता सीडीएससीओनंही (Central Drugs Standard Control Organisation) मान्य केलंय. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातल्या या कफ सिरपविषयी अलर्ट जारी केला होता. त्यानंतर आता सीडीएससीओच्या तपासातही ही बाब अधोरेखित झालीय.

Read More

Paperless Ticket: बेस्टमधून कागदी तिकिटे होणार हद्दपार; प्रवाशांना सुट्टे पैसे आणि तिकीटे बाळगण्याची गरज नाही

बेस्टने इथून पुढे कागदी तिकीट 100 टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; बेस्टच्या या निर्णयामुळे वर्षभरात तिकिटांच्या कागदावर होणारा 2.50 कोटी रुपयांचा खर्च वाचणार असल्याची माहिती 'बेस्ट'चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली.

Read More

WEF survey: यावर्षी जगावर आर्थिक मंदीचे संकट, भारतावर फारसा परिणाम जाणवणार नाही!

या वर्षी आर्थिक मंदीची लाट येऊ शकते असे जगभरातील अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आर्थिक क्षेत्रात होत असलेले हे बदल काही विकसनशील देशांच्या पथ्यावर पडणार असल्याचे देखील अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. जगभरातील पुरवठा व्यवस्थेतील बदलांचा फायदा भारत आणि भारतासारख्या इतर देशांना होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे...

Read More

Airtel Payments Bank : आधार आधारित व्यवहारांसाठी एअरटेल पेमेंट्स बँकेनं आणलं 'फेस ऑथेंटिकेशन'

Airtel Payments Bank : एअरटेल पेमेंट्स बँकेनं आता आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा आणली आहे. ज्या व्यवहारांना आधार कार्डची आवश्यकता आहे, अशा व्यवहारांसाठी एअरटेलनं फेस ऑथेंटिकेशनची सिस्टम आणलीय. एअरटेल पेमेंट्स बँक ही चार बँकांपैकी एक आहे, ज्यामार्फत आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमसाठी (AePS) फेस ऑथेंटिकेशन ऑफर केलं जातं.

Read More

Jobs in India: भारतात 'या' 3 क्षेत्रात वाढतोय रोजगार, वाचा 'नोकरी.कॉम'च्या अहवालातील निरीक्षणे

Jobs in India: आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात होत असताना अशी काही इतर क्षेत्रे आहेत जिथे रोजगाराच्या संधी मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहेत.Naukri.com च्या पाहणी अहवालात याबद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे.या लेखात जाणून घ्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या वेगाने उपलब्ध होत आहेत.

Read More

Cheque वर रक्कम भरल्यानंतर Only लिहिणे का गरजेचे आहे? जाणून घ्या नियम

Cheque Payment: चेकने कोणताही आर्थिक व्यवहार करताना त्यावरील माहिती नीट भरणे आणि ती तपासणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल, की चेकवर अक्षरात रक्कम भरल्यानंतर त्यापुढे Only असे लिहिले जाते किंवा रक्कम लिहिल्यानंतर (/-) अशा दोन रेषा ओढल्या जातात. त्याचा अर्थ काय जाणून घेऊयात.

Read More

SSY vs PPF: गुंतवणुकीचा कालावधी समान तरीही मिळणारा परतावा वेगवेगळा कसा? जाणून घ्या गणित!

SSY vs PPF: सरकारद्वारे राबवण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या दोन्ही योजनांच्या गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षाचा आहे; असे असले तरीही या योजनांमधून मिळणारा परतावा हा वेगवेगळा आहे. तो किती आहे? या योजनांमध्ये फरक काय आहे, जाणून घेऊयात.

Read More

CMIE Report: एप्रिल महिन्यात 8.11% बेरोजगारी दराची नोंद, शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक

CMIE च्या अहवालानुसार शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत वाढले असल्याचे आढळले आहे. एप्रिलमध्ये शहरी बेरोजगारीचे प्रमाण 8.51% वरून 9.81% इतके वाढले आहे. मात्र, एप्रिलमध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीत थोडीशी घट झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे

Read More

Examination fee: अमरावती विद्यापीठाचा महत्वाचा निर्णय, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क केले माफ

Examination fee: शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा फी माफ केले जाणार आहे.

Read More

Go First airlines : 'गो फर्स्ट'ची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेनं? दोन दिवसांच्या फ्लाइट्स रद्द!

Go First airlines : विमान वाहतूक क्षेत्रातली आणखी एक कंपनी दिवाळखोरीत निघणार की काय, अशी स्थिती निर्माण झालीय. कारण कंपनीच्या अंतर्गत हालचालींनंतर हा कयास बांधला जातोय. कंपनीनं आपली 28 उड्डाणं ग्राउंड केलीत, असं कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलंय.

Read More