Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

McDonald's Fine: McDonald's मध्ये घडलेल्या किळसवाण्या प्रकारामुळे कंपनीला 5 कोटींचा दंड

McDonald's

Image Source : Source: www.restaurant.indianretailer.com

McDonald's Pay Fine of Rs 5 crore : विविध फूड ब्रँड्सच्या मोठमोठ्या जाहिराती बघून आपण खाद्यपदार्थांच्या मोहात पडतो. पिझ्झा, बर्गर, नूडल्स आणि फ्रँकीज सर्वांना खाऊ वाटते. भूक लागली की आजच्या तरुण पिढीतील अनेक जण मॅकडोनाल्डकडे धाव घेताना दिसतात. मात्र ही बातमी वाचून मॅकडोनाल्ड मध्ये जाऊन मनसोक्त बर्गरआधी तुम्ही नक्कीच विचार कराल.

Rat Faeces Found In Burgers : तुम्हाला बर्गर खायला आवडत असेल आणि त्यातही केवळ मॅकडोनाल्डचच बर्गर प्रचंड आवडत असेल, तर जरा थांबा. कारण एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील मॅकडोनाल्ड्च्या आउटलेटमध्ये बर्गर खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला उंदराची विष्ठा असलेला बर्गर देण्यात आला. हा प्रकार बघून त्या ग्राहकाने तक्रार केली. त्यानंतर मॅकडोनाल्ड्सला 5 मिलियन युरो म्हणजेच 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला आहे. 

फूड पॅकिंगमध्ये सापडली उंदराची विष्ठा

ब्रिटनमधील मॅकडोनाल्ड्च्या आउटलेटमध्ये बर्गर खरेदी करण्यास गेलेल्या ग्राहकाला बर्गरच्या पॅकिंगमध्ये उंदराची विष्ठा दिसली. याची ग्राहकाने अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्य निरीक्षकांनी केलेल्या पाहणीनंतर  ब्रिटनमधील मॅकडोनाल्ड्च्या आउटलेटमध्ये उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे आढळून आले. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला होणारा धोका लक्षात घेता, हे आऊटलेट बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला.

यापूर्वीही घडलेल्या घटना

यापूर्वी 2021 मध्ये पूर्व लंडनच्या लेटनस्टोनमध्ये अशीच एक घटना घडली होती. मॅकडोनाल्ड् मधून एका ग्राहकाने चीझ बर्गर खरेदी केला होता. तेव्हा त्याला त्यात कचरा आढळला होता. तर एका महिलेला बर्गर मध्ये उंदराचे अवशेष दिसले होते.

कंपनी देणार 5 कोटींचा दंड


मॅकडोनाल्ड्मधील पदार्थ कसे तयार केले जातात याची तपासणी अन्न निरिक्षक करत असतात. अस्वच्छता किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास कंपनीला दंड आकारला जातो. तसेच शॉप बंद करण्याचे आदेशही दिले जातात. भारतामध्ये विविध ब्रँड्सच्या हॉटेलमध्ये अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेमुळे कारवाई केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. लंडनमधील या प्रकरणाची जगभर चर्चा झाली. मॅकडोनाल्ड्ला तब्बल 5 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या प्रकरणानंतर मॅकडोनाल्ड्च्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिले की, आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छता राखण्याचा आम्ही पूरेपूर प्रयत्न करतो. मात्र आमचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.