Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Great Summer Sale 2023: फक्त 10 हजारांच्या रेंजमध्ये 'हे' 5 बेस्ट स्मार्टफोन खरेदीची संधी, जाणून घ्या डिटेल्स

Amazon Great Summer Sale 2023

Image Source : www.businessinsider.in

Amazon Great Summer Sale 2023: तुम्हीही कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अमेझॉन ग्रेट समर सेल तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. या सेलमध्ये तुम्हाला 10 हजारापेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. कोणते आहेत ते स्मार्टफोन, जाणून घेऊयात.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनने खास ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल (Amazon Great Summer Sale 2023) सुरु केला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करता येतील. हा सेल 4 मे 2023 पासून ते 8 मे 2023 पर्यंत चालू राहणार आहे.

तुम्हीही कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. या सेलमध्ये तुम्हाला 10 हजारापेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. उत्कृष्ट फीचर्स आणि प्रीमियम डिझाईनसह हे फोन अमेझॉनवर उपलब्ध आहेत. त्याबद्दल माहिती करून घेऊयात.

10 हजार रुपयांमध्ये 'हे' 5 बेस्ट स्मार्टफोन खरेदी करता येणार 

Samsung Galaxy M13

Samsung Galaxy M13 हा स्मार्टफोन ग्राहकांना अमेझॉनवरून 9,699 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनची रॅम 4GB असून स्टोरेज 64GB देण्यात आले आहे. याची बॅटरी क्षमता 6000mAh इतकी असल्याने दीर्घकाळ मोबाईल वापरता येणार आहे. 6.6 इंचाचा डिस्प्ले, 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

Nokia G11 Android 12

Nokia G11 Android 12 हा स्मार्टफोन केवळ 9,249 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये कंपनीने 4GB रॅम दिली असून 64GB स्टोरेज पुरवले आहे. 6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 5050mAh क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. त्यासोबतच 50MP कॅमेरा मिळाल्याने ग्राहकांना उत्तम फोटो काढण्यासाठी मदत होणार आहे.

Lava Blaze 2

Lava कंपनीचा हा स्मार्टफोन ग्राहकांना 18% डिस्काउंटसह 8999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनची रॅम 6GB असून स्टोरेज 128GB इतके आहे. या फोनची बॅटरी क्षमता 5000mAh आहे. हा फोन वजनाने अगदी हलका आहे. 6.5 इंचाच्या डिस्प्लेसह या मोबाईलमध्ये 13MP आणि 2MP असे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत.

Redmi 12C

शाओमी कंपनीचा Redmi 12C हा स्मार्टफोन ग्राहकांना 36% डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहे. हा फोन अमेझॉन सेल्सच्या माध्यमातून केवळ 8999 रुपयांना खरेदी करता येईल. यामधील रॅम 4GB असून स्टोरेज 64GB पुरवण्यात आले आहे. तसेच 50MP ड्युअल पोर्टेबल कॅमेरासह 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Oppo A17k

नेव्ही ब्ल्यू रंगाचा Oppo A17k स्मार्टफोन अमेझॉन ग्रेट इंडियन समर सेलमध्ये 27% डिस्काउंटसह खरेदी करता येईल. हा डिस्काउंट पकडून या फोनची किंमत 9,499 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 3GB  रॅम आणि 64GB स्टोरेज दिले आहे. तसेच याची बॅटरी क्षमता 5000 mAh इतकी आहे. 8MP रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा कंपनीने दिला आहे. 

Source: navbharattimes.indiatimes.com