Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Eicher Motors Profit: आयशर मोटर्सच्या नफ्यात 48 टक्क्यांनी वाढ; कंपनीने जाहीर केला लाभांश

Eicher Motors Profit

Image Source : Source: www.google.com

Eicher Motors Profit Q4: वर्ष 2023 च्या मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीचा अहवाल जाहीर केला. या तिमाहीत आयशर मोटर्सच्या (Eicher Motors) नफ्यात 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीला झालेल्या या नफ्यामुळे कंपनीने भागधारकांना प्रति शेअर 37 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

Fourth Quarter Ended March Profit 48%: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आयशर मोटर्सला मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत (Fourth Quarter Results) जोरदार नफा झाला आहे. मार्च तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि महसुलात 19 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 37 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

महसुलात 19 टक्क्यांनी वाढ

आयशर मोटर्सच्या वार्षिक आधारावरील महसुलात 19 टक्क्यांनी वाढ  झालेली आहे. ज्यामुळे 3,804 कोटी रुपयांचा महसूल गोळा झालेला आहे. कंपनीच्या बोर्डाने मार्च 2023 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 37 रुपये प्रति इक्विटीच्या अंतिम लाभांशाची  ((final dividend on equity) शिफारस केली आहे. भागधारकांना मंजुरीच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत लाभांश दिला जाणार आहे.

905 कोटी रुपये नफा

आयशर मोटर्स लिमिटेडने गुरुवारी (दि. 11, मे) मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. आकडेवारीनुसार, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) मार्च तिमाहीत वार्षिक आधारावर 48 टक्क्यांच्या वाढीसह 905 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ नफा 610 कोटी रुपये होता.

यंदा कंपनीची दमदार कामगिरी

मार्च तिमाहीत मिळवलेला महसूल कंपनीसाठी आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. चौथ्या तिमाहीत EBITDA (Earnings Before Interest, Taxes, Depreciation, and Amortisation) 934 कोटी रुपये होता,जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 757 कोटीं रुपयांच्या तुलनेत 23 टक्क्यांनी अधिक आहे. कामगिरी आणि नफा मिळविण्या बाबतचे कंपनीसाठीचे हे दमदार वर्ष ठरले.  रॉयल एनफिल्ड आणि व्हीई कमर्शियल या दोन्ही कंपन्यांनी आजवरची सर्वोत्तम व्यवसाय आणि आर्थिक कामगिरी केल्याचे, या नफ्यावरुन स्पष्ट होते.

नवीन मोटरसायकल हंटर 350 आणि सुपर मेटिओर 650 लाँच केल्यामुळे, रॉयल एनफिल्ड ग्रुप कडे नवीन ग्राहक आकर्षित होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आयशर मोटर्सची उपकंपनी असलेल्या रॉयल एनफिल्डने मार्च तिमाहीत 2.14 लाख युनिट्सच्या विक्रीत वार्षिक 18 टक्के वाढ नोंदवली आहे.