Free Internet Broadband Connection :भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही सरकारी दूरसंचार कंपनी आहे. ही कपनी ग्राहकांच्या घरात मोफत ब्रॉडबँड कनेक्शन स्थापित (Installation) करेल. म्हणजेच कंपनीला पुढील एका वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२४ पर्यंत ब्रॉडबँड कनेक्शनच्या स्थापनेसाठी शुल्क द्यावे लागणार नाही.
कंपनीची ग्राहक संख्या वाढणार
ब्रॉडबँड कनेक्शन सर्विस देणाऱ्या अनेक कंपन्या इन्स्टॉलेशनसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारतात. ब्रॉडबँड कनेक्शन मिळविण्यासाठी ग्राहकांना पेमेंट चार्जेस म्हणून वेगवेगळी रक्कम भरावी लागत असते. बीएसएनएल सर्व प्रकारची इंटरनेट सेवा देत आहे. यामध्ये कॉपर कनेक्शन आणि फायबर कनेक्शनचा समावेश आहे. बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीची देशभरात स्वत:ची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आहे. त्यामुळे इन्स्टॉलेशन सर्विसचे पेमेंट चार्जे न केल्यास कंपनी आधिकधिक ग्राहक जोडू शकते.
329 रुपयांना डेटा उपलब्ध
329 रुपयांच्या प्लॅन मध्ये ग्राहकांना 1TB डेटासह 20Mbps पर्यंत स्पीड मिळू शकते. डेटा लिमिट संपल्यानंतर 4 Mbps पर्यंत स्पीड मिळते. अश्याप्रकारे कंपनीकडे ग्राहकांसाठी ब्रॉडबँड कनेक्शनसह, ग्राहकांची आर्थिक बचत होईल असे विविध प्लॅन आणले आहेत. 329 रुपयांच्या प्लॅन मध्ये अधिक डेटासह हाय-स्पीड इंटरनेट सेवाही उपलब्ध आहेत. मात्र, हा प्लॅन निवडक शहरातील नवीन ग्राहकांसाठीच आहे. ग्राहकाने किमान सहा महिन्यासाठी हा प्लॅन घेतल्यास त्यांना कंपनी निशुल्क सिंगल-बँड ONT Wi-Fi राउटर देणार आहे. आणि संपूर्ण 12 महिन्यांसाठी प्लॅन घेतल्यास ड्युअल बँड ONT Wi-Fi राउटर मिळणार आहे.
तसेच कॉपर कलेक्शनवर 250 रुपये इन्स्टॉलेशन चार्जेस लागते. तर फायबर कनेक्शन वर 500 रुपये इन्स्टॉलेशन चार्जेस लागतात. हे शुल्क कंपनी माफ करीत आहे. यामुळे निश्चितच कंपनीला ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. BSNL फायबर ब्रॉडबँड कनेक्शन 329 रुपयांचा प्लॅन अनेक राज्यांमध्ये सुरु आहे.