Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Food Order From ONDC: सरकारी ONDC प्लॅटफॉर्मवरुन फूड ऑर्डर कसे कराल? स्टेप बाय स्टेप गाइड

Food Order From ONDC

Image Source : www.theprint.in

आता ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यासाठी फक्त झोमॅटो आणि स्वीगीवर विसंबून राहण्याची गरज नाही. सरकारी ONDC प्लॅटफॉर्मद्वारेही तुम्ही घरबसल्या आवडती डीश ऑर्डर करू शकता. फ्री डिलिव्हरी आणि ऑर्डरवर चांगला डिस्काउंटही मिळू शकतो. ONDC वरून ऑर्डर कशी करता येईल, हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया.

Food Order From ONDC: ऑनलाइन भाजीपाला आणि फूड ऑर्डर करणाऱ्या अॅप्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोणती वस्तू ऑनलाइन खरेदीसाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन या कंपन्यांची नावं पटकन सुचतात. तसेच घरबसल्या हॉटेलमधून पिझ्झा, बिर्याणी ऑर्डर करण्यासाठी झोमॅटो, स्वीगी अॅपवर ग्राहक जातात. मात्र, आता तुम्हाला कोणतीही वस्तू किंवा फूड ऑनलाइन ऑर्डर करायचे असल्यास सरकारी ONDC प्लॅटफॉर्म आला आहे.

इ-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी स्वत:चा प्लॅटफॉर्म उभा करण्याचा विचार केंद्र सरकार मागील काही दिवसांपासून करत होते. त्यातून ONDC म्हणजेच Open Network for Digital Commerce हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. यावर देशातील आघाडीचे विक्रेते रजिस्टर झालेले आहेत.

झोमॅटो, स्वीगीवरुन फूड ऑर्डर करताना वेगवेगळ्या ऑफर्स असतात. चांगल्या ऑफर्सच्या शोधात ग्राहक कायमच असतात. ONDC वरुन फूड ऑर्डर करताना तुम्हाला डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरीही मिळू शकते. त्यामुळे पुढील वेळी तुम्ही जेव्हा ऑनलाइन फूड ऑर्डर कराल तेव्हा ONDC वरील डिस्काउंट चेक करायला विसरू नका. मात्र, ही सेवा अद्याप सर्व शहरांत सुरू झाली नाही. काही ठराविक शहरांमध्येच ONDC ऑनलाइन ऑर्डर सुविधा आहे. 

ONDC चे स्वत:चे अॅप आहे का?

नाही. ONDC प्लॅटफॉर्मचे स्वत:चे अॅप अद्याप बाजारात उपलब्ध नाही. भविष्यात ते उपलब्ध होऊ शकते. मात्र, पेटीएम आणि Magicpin या फूड लिडिव्हरी अॅपवरून तुम्हाला ONDC ऑर्डर करता येईल. इतरही काही अॅप्सद्वारे फूड ऑर्डर करता येईल. मात्र, येथे आपण फक्त दोन अॅपद्वारे फूड कसे ऑर्डर करता येईल ते पाहू.

पेटीएमवरुन ONDC अंतर्गत फूड ऑर्डर कसे कराल? 

  • पेटीएम अॅप ओपन करून सर्च बटनवर क्लिक करा.
  • ONDC असे टाइप करून ONDC स्टोअरवर जा.
  • या स्टोअरवर तुम्हाला विविध हॉटेल्स आणि डिशेस दिसतील.
  • तुमच्या आवडत्या हॉटेलला सिलेक्ट करू शकता किंवा फूड सेक्शनमधून डिश निवडू शकता.
  • पत्ता टाकून ऑनलाइन पेमेंट करा.

Magicpin अॅपद्वारे ONDC स्टोअरवरुन फूड ऑर्डर कसे कराल

  • मॅजिकपिन अॅप डाऊनलोड करुन तुमचा पत्ता आणि फोन नंबरची नोंदणी करा. 
  • सर्च बारमध्ये ONDC असे टाइप करा. 
  • ONDC ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ONDC स्टोअर पेजवर जाल.
  • येथे तुम्हाला हॉटेल आणि विविध डिशेस दिसतील.
  • आवडती डीश सिलेक्ट करुन ऑनलाइन पेमेंट करा.
  • डिलिव्हरी बॉयद्वारे ऑर्डर घरी मागवू शकता किंवा डिलिव्हरी पिकअप करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.