Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sovereign Gold Bond: 2018 मधील गोल्ड बाँडमधून गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट; मुदतपूर्व पैसे काढण्याची तारीख चेक करा

Sovereign Gold Bond

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी सॉवरिन गोल्ड बाँड (SGB) मध्ये गुंतवणूक केली होती त्यांना पाच वर्षानंतर दुप्पटीने फायदा झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Premature redemption price जाहीर केली आहे. म्हणजेच या बाँडमध्ये जी गुंतवणूक केली होती ती मुदतपूर्व काढून घेता येणार आहे.

Sovereign Gold Bond premature redemption: आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी सॉवरिन गोल्ड बाँड (SGB) मध्ये गुंतवणूक केली होती त्यांना 5 वर्षानंतर दुप्पट फायदा झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने premature redemption price जाहीर केली आहे. म्हणजेच या बाँडमध्ये जी गुंतवणूक केली होती ती गुंतवणूकदारांना मुदतपूर्व काढून घेता येणार आहे.

2017-18 आर्थिक वर्षात ज्या गुंतवणूकदारांनी सिरिज-1 गोल्ड बाँड खरेदी केले होते तेव्हा प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 2,901 रुपये होती. आता पाच वर्षानंतर या बाँडचे प्रतिग्रॅम मूल्य 6,115 एवढे झाले आहे. यास पर युनिट व्हॅल्यू असेही म्हणतात. बाँडचे मूल्य 110% नी वाढले आहे. 

गुंतवणूक काढून घेण्याची अंतिम तारीख काय?

या गोल्ड बाँडमधून गुंतवणूक मुदतपूर्व काढून घेण्याची अंतिम तारीख 12 मे 2023 आहे.

मुदतीआधीच पैसे काढून घेणे म्हणजे काय?

गोल्ड बाँड इश्यू केल्यानंतर पाच वर्षांनंतर Premature redemption म्हणजेच मुदतीपूर्वी पैसे काढून घेता येतात. पाच वर्षांनंतर ज्या दिवशी व्याज मिळते तेव्हा ही गुंतवणूक तुम्ही काढू शकता.

गोल्ड बाँडमधील गुंतवणूक काढून घेण्याआधीच्या आठवड्यात बाजारामध्ये सोन्याची जी किंमत असेल त्यानुसार सॉवरिन गोल्ड बाँडचे दर ठरवले जातात. त्यास रिडम्प्शन रेट असेही म्हणतात. India Bullion and Jewellers Association Ltd (IBJA) या संघटनेद्वारे सोन्याचे दर जाहीर केले जातात. ते दर ग्राह्य धरुन आरबीआय सुवर्ण रोख्यांची किंमत ठरवते.

Sovereign Gold Bond म्हणजे काय? 

सार्वभौम सुवर्ण रोखे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) इश्यू केले जातात. या बाँड्सला सरकारची हमी असते. हे बाँड आरबीआयकडून वर्षातून सुमारे पाच वेळा इश्यू केले जातात. हे फिजिकल गोल्ड नसून रोख्यांमधील गुंतवणूक आहे. इश्यू तारीख तुम्ही आरबीआयच्या संकेतस्थळावर चेक करू शकता. वर्षात कधीही गोल्ड बाँड खरेदी करता येत नाहीत. जेव्हा आरबीआयकडून बाँड इश्यू केले जातात. तेव्हाच अप्लाय करून गोल्ड बाँड खरेदी करता येतात. ऑनलाइन, पोस्ट किंवा बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही या बाँडसाठी अप्लाय करू शकता.

गोल्ड बाँड खरेदी करण्याचे फायदे काय? (Benefit of Investing in SGB)

1) फिजिकल गोल्ड सांभाळण्याची गरज नाही. इ-गोल्ड तुमच्या खात्यात सुरक्षित राहील.
2) सरकारने जारी केलेले बाँड असल्याने सुरक्षिततेची चिंता नाही. 
3) जेवढे सोने तुम्ही खरेदी केले आहे त्यावर 2.5 % सहा महिन्यातून एकदा व्याज मिळेल. वर्षातून दोनदा व्याजाचा हप्ता मिळेल. 
4) गोल्ड बाँड खरेदी करताना जीएसटी भरावा लागत नाही. मात्र, दुकानातून सोने खरेदी करताना जीएसटी द्यावा लागतो. 
5) गुंतवणुकीवर कोणताही कर कापून जाणार नाही. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) लागू होत नाही. 
6) डिमॅट खात्यात ठेवू शकता. त्यामुळे कधीही खरेदी विक्री करता येईल. मात्र, असे करताना कर लागू होईल.  
7) गोल्ड बाँडला गहाण ठेवून त्या बदल्यात बँकेकडून कर्ज मिळवू शकता.