Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Vadilal Group: विकला जात आहे तुमचा आवडता आईस्क्रीम ब्रँड वाडीलाल, कोणत्या कंपनीशी डील?

Vadilal Group: भारतीयांचा आवडता आईस्क्रीम ब्रँड वाडीलाल विकला जाणार आहे. अमेरिकेची एक कंपनी भारतातली ही प्रसिद्ध कंपनी विकत घेणार आहे. आईस्क्रीम आणि फ्रोझन फूड वाडीलाल ग्रुप खरेदी करण्यात बेन कॅपिटलनं स्वारस्य दाखवलं आहे.

Read More

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला 500 दिवस पूर्ण; जगावर झालेले पाच मोठे आर्थिक परिणाम

Russia Ukraine War: पाचशे दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्यातील थंडीत सुरू झालेलं रशिया-युक्रेन युद्ध अद्याप थांबलेले नाही. या युद्धात 143 बिलियन डॉलर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सोबतच जगभरात महागाई, पुरवठा साखळीत अडथळा निर्माण होण्यासही युद्ध कारणीभूत ठरले. युरोपला या युद्धाचा सर्वाधिक फटका बसला. पाहूया 500 दिवसांमध्ये नेमके काय घडले.

Read More

Vande Bharat Express: लवकरच धावणार स्लीपर आणि मेट्रो वंदे भारत एक्स्प्रेस, भारतीय रेल्वे मिशन मोडवर...

Vande Bharat Express: भारतीय रेल्वे 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस वंदे भारतच्या आणखी दोन व्हर्जन सादर करणार आहे. त्यासाठी मिशन मोडवर कामदेखील सुरू झालं आहे. चेन्नईतली रेल्वे इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) वंदे भारत स्लीपर व्हर्जन तसंच वंदे मेट्रो कोच तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Read More

Pradhan Mantri Awas Yojana : शहरी आणि ग्रामीण भागात घरकुल योजनेतून मिळणाऱ्या अनुदानात किती फरक असतो? जाणून घ्या

Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील लोकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. जाणून घेऊया, ग्रामीण व शहरी भागात दिल्या जाणाऱ्या अनुदान रकमेत किती फरक असतो?

Read More

RIL-Jio Financial Demerger: रिलायन्सपासून वेगळं होणार जिओ, डिमर्जरची रेकॉर्ड डेट 20 जुलै निश्चित

RIL-Jio Financial Demerger: रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपली वित्तीय सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कंपनीचे शेअर्स वाटप करण्यासाठी 20 जुलै ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. डिमर्जर 1 जुलैपासून लागू होणार आहे.

Read More

Offer on Electric Bicycle : TATA कंपनीची इलेक्ट्रिक सायकल ऑफरसह बाजारात दाखल; एका चार्जमध्ये 30 किमी धावते

सध्या पर्यावरण प्रेमींमध्ये ई सायकलचा वापर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेत टाटाच्या स्ट्रायडर बाइक्स या कंपनीने झीटा प्लस (Zeeta Plus) नावाने आणखी एक इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलला 36-volt/6 Ah उच्च क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सायकलची ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते.

Read More

Baipan Bhari Deva BO Collection: मंगळागौर पावली! बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई

Baipan Bhari Deva BO Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहे. या दहा दिवसांत चित्रपटाने किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

Read More

सावधान! मंदी आणि नोकरकपातीमुळे जॉब स्कॅममध्ये वाढ; फसवणूक टाळण्यासाठी 'ही' काळजी घ्या

बाजारातील मंदी आणि लेऑफचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. बनावट जॉब पोर्टल तयार करून माहिती घेतली जात आहे. तसेच मुलाखती आणि बनावट ऑफर्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. फ्रिलान्स काम मिळवून देण्याचेही अनेक घोटाळे होत आहेत. या सर्व घोटाळ्यांपासून कसे वाचायचे ते जाणून घ्या.

Read More

Indian Startup: भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक रोडावली, गेल्या 4 वर्षातील सर्वात कमी गुंतवणुकीची नोंद

गेल्या सहामाहीत झालेल्या गुंतवणुकीत जवळपास 57% गुंतवणूक ही नवोदित स्टार्टअप्समध्ये झाल्याचे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे. जगभरात असलेल्या आर्थिक मंदीचे संकट यासाठी कारणीभूत असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. गुंतवणुकदार सध्या विचारपूर्वक आणि जगभरात सुरु असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना ते भरपूर वेळ घेत असल्याचे देखील यात म्हटले आहे.

Read More

Cotton Production: कापूस उत्पादन 14 वर्षांच्या निचांकावर; मराठवाड्यात 40 लाख हेक्टरवरील पिकांचं पावसामुळे नुकसान

जगात सर्वात मोठा कापूस निर्यातदार असण्याचा मान भारताकडे होता. मात्र, आता परिस्थिती बदल आहे. चालू वर्षी कापसाचे उत्पादन कमालीचे रोडावणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. या हंगामात देशातील कापूस उत्पादन 14 वर्षांच्या निचांकावर पोहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर निर्यात 19 वर्षातील सर्वात कमी होईल, असे अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

Sandalwood Plantation : चंदनाची लागवड करून मिळवू शकता भरघोस नफा, जाणून घ्या लागवडीसाठी किती येणार खर्च?

Sandalwood Plantation : शेतकरी आपले संपूर्ण आयुष्य शेतात घालवतो, त्यानंतरही तो चांगला पैसा कमवू शकत नाही. त्यामुळेच आता बहुतांश शेतकरी पारंपरिक शेतीपासून दूर जाऊन काहीतरी वेगळे करत आहेत. तुम्हालाही काही वेगळे करायचे असेल तर ही आयडिया तुमच्यासाठी.

Read More

Trainman App: ट्रेनमन अ‍ॅपची मालकी असलेल्या स्टार्क एंटरप्राईसेसमध्ये 30% हिश्श्याची अदानींकडून 3.5 कोटींना खरेदी

Trainman App: गेल्याच महिन्यात अदानी डिजिटल लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने स्टार्क एंटरप्राईसेस प्रायव्हेट लिमिटेड (Stark Enterprises) या कंपनीतील 100% हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली होती. स्टार्क एंटरप्राईसेसचे ट्रेनमन अ‍ॅप आहे.

Read More