Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

PAN Card : बंद झालेलं पॅन कार्ड पुन्हा कसं सुरू करायचं? किती खर्च येईल? जाणून घ्या

PAN Card : आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. आधारशी लिंक नसलेली सर्व पॅन कार्ड 1 जुलैपासून निष्क्रिय करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना त्यांचा पॅन आणि आधार लिंक करता आलेला नाही आणि त्यांचा पॅन निष्क्रिय झाला आहे, त्यांनी टेन्शन घेऊ नका. कारण पॅन कार्ड ॲक्टिव करण्याचा मार्ग अजूनही बाकी आहे. जाणून घेऊया डिटेल्स

Read More

Tomato Price Hike: केंद्र सरकार घेणार महाराष्ट्राकडून टोमॅटो विकत, महाष्ट्रासह इतरही राज्यातून करणार खरेदी

Central Government Buy Tomatoes: गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र टोमॅटो महागल्याची चर्चा आहे. 20 ते 30 रुपये किलोला मिळणारे टोमॅटो 150 ते 180 रुपये किलो दराने मिळायला लागल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आता तर गृहीणींबरोबरच केंद्र सरकारच्या चिंतेतही टोमॅटो महागल्याने भर पडली आहे.

Read More

ST Nagpur Division: नागपूर - पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला 34 लाखाचे उत्पन्न

Nagpur - Pandharpur Wari Income: आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी विठूरायाचे दर्शन घेतले. यात नागपूरातील भाविकही मागे राहीले नाहीत. नागपूर विभागाने देखील 22 ते 29 जून दरम्यान नागपूर ते पंढरपूर स्पेशल बसेस सोडल्या. या आठ दिवसांमध्ये एकूण 60 स्पेशल बसेस सोडण्यात आल्याने, त्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला 34,25,440 रुपयांचे उत्पन्न झाले.

Read More

Reliance-Future group: दिवाळखोर बिग बझारसह फ्यूचर ग्रुप रिलायन्सच्या ताब्यात? लवकरच सुरू होणार नवा ब्रँड

Reliance-Future group: फ्यूचर ग्रुपचा ब्रँड बिग बझार सध्या दिवाळखोरीचा सामना करत आहे. आता हा बँड लवकरच रिलायन्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला (RRVL) फ्यूचर एंटरप्रायझेस लिमिटेडचा (FEL) संभाव्य खरेदीदार मानलं जात आहे.

Read More

Economy Of Maharashtra : ..तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत 1 लाख कोटी डॉलरवर पोहोचेल - आर्थिक सल्लागार परिषद

टाटा ग्रुपचे चेअरमन आणि राज्य आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी सल्लागार परिषदेचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला. त्या अहवालात करण्यात आलेल्या शिफारशी या महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे चंद्रशेखरन यांनी सांगितले.

Read More

UPI France: भारताची UPI पेमेंट सिस्टिम फ्रान्स स्वीकारणार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

भारतीय UPI (Unified payment system) पेमेंट जगभरात नावाजलेले आहे. जलद, सुरक्षित आणि सुलभ पेमेंट असल्यामुळे सिंगापूरसह काही देशांनी ही सिस्टिम स्वीकारली आहे. आता फ्रान्स देखील युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत UPI France लाँच होऊ शकते.

Read More

Navi Technologies: बाजारात IPO आणण्याआधी नावी फिनटेक कंपनीकडून कर्मचारी कपात

फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी नावीने (Navi) 200 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा पुढील काही दिवसांत IPO येणार आहे. मात्र, त्याआधीच कंपनीने खर्च कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नावी भांडवली बाजारातून 3350 कोटी रुपये उभारणार आहे. यास सेबीनेही परवानगी दिली आहे.

Read More

Dearness Allowance: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित महागाई भत्ता, सरकारने केली महत्वाची सुधारणा

Dearness Allowance: केंद्राच्या अख्यत्यारितील सार्वजनिक उपक्रमांतील (CPSEs) यातील संचालक मंडळ आणि सुपरवायझर स्तरातील कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राईसेस या विभागाने यासंबधी अधिसूचना जारी केली आहे.

Read More

Shivneri Bus: शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त; राज्यात धावणार 'जन-शिवनेरी' बस

राज्य परिवहन महामंडळाकडून लवकरच 'ई-शिवनेरी' बसची सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच या बस राज्यात जन शिवनेरी म्हणून ओळखल्या जातील. सध्या जन-शिवनेरी बस ही प्रायोगिक तत्वावर 10 जुलैपासून नाशिक-पुणे या महामार्गावर सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात तब्बल 100 ई-शिवनेरी (जन शिवनेरी) राज्यातील विविध रस्त्यांवर धावताना दिसतील.

Read More

Tesla electric car: भारतात अवघ्या 20 लाखांत मिळणार टेस्ला इलेक्ट्रिक कार? नेमका प्रस्ताव काय?

Tesla electric car: जगभरात लोकप्रिय असलेली आणि महागडी टेस्ला कार आता भारतात स्वस्त मिळणार आहे. एलन मस्क यांची ईव्ही उत्पादक कंपनी भारतीय बाजारपेठेत 20 लाख रुपयांच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार (EV) आणणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, कंपनी भारतात ईव्ही तयार करण्यासाठी प्लांट स्थापन करणार आहे.

Read More

महाराष्ट्रात 1,18,422 कोटी रुपयांची फॉरेन इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पहिले

Foreign Investment In Maharashtra: महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्यात आली आहे आणि त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिला ठरला आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गेल्याने महाराष्ट्राच्या गुंतवणूकीवर कसलाही परिणाम झालेला नाही. तर नागपूर सोबतच पूर्व विदर्भात 59 कोटी रुपयांचे प्रकल्प लाइनअप झालेले आहेत.

Read More

Retail Inflation In June 2023: जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81% वर पोहोचली, खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या

गेल्या महिन्यात मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.30 टक्के इतका नोंदवला गेला होता. त्यांनतर आता जून महिन्यात हाच दर 4.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता, जून महिन्यातील महागाईचा दर हा सर्वाधिक होता असे सांख्यिकी मंत्रालयाने जरी केलेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी, याच महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7% इतका नोंदवला गेला होता.

Read More