Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Climate Smart Farming : 'क्लायमेट स्मार्ट शेती' उपक्रमाच्या माध्यमातून होणार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, जाणून घ्या

Climate Smart Farming

Climate Smart Farming : "क्लायमेट स्मार्ट शेती' हा उपक्रम राबवून शेतीसाठी अनेक तंत्र विकसित केले जाते. हा उपक्रम आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत बायफ संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागाचा विकास करणे हा आहे. जाणून घेऊया, क्लायमेट स्मार्ट शेती उपक्रमाबाबत आधिक माहिती.

Climate Smart Farming  : भारतातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे, 75 टक्के लोकं शेती करतात. प्रत्येक शेतकऱ्याची शेती करण्याची टेक्निक वेगवेगळी आहे. शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी अनेक प्रयत्न करतात शिवाय सरकरकडूनही त्यांना मदत दिली जाते. सरकारकडून अनेक योजना सुद्धा राबविल्या जातात. क्लायमेट स्मार्ट शेती हा उपक्रम राबवून शेतीसाठी अनेक तंत्र विकसित केले जाते. हा उपक्रम आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत बायफ संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागाचा विकास करणे हा आहे. जाणून घेऊया, क्लायमेट स्मार्ट शेती उपक्रमाबाबत आधिक माहिती.

क्लायमेट स्मार्ट शेती 

भविष्यात हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी क्लायमेट स्मार्ट शेती  (CSA) विकसित करण्यात आले असून अन्न सुरक्षेवर भर घातला आहे. बदलत्या हंगामात नैसर्गिक साधनसंपत्तीचे अत्याधिक शोषण रोखण्यासाठी, अन्नसुरक्षा राखण्यासाठी आणि अधिक पीक उत्पादन आणि अधिक नफा देऊन शेतकरी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी हवामान स्मार्ट शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. क्लायमेट स्मार्ट तंत्राद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध हवामान आणि हवामानानुसार तांत्रिक व गैर-तांत्रिक आधार मिळतो.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘क्लायमेट स्मार्ट शेती’ शेतकऱ्यांना शेतीचा नवा मार्ग दाखवते. 50 टक्के कमी पाणी आणि 20 टक्के कमी खर्चात शेती केल्यासही शेतकरी समृद्ध होऊ शकतो. क्लायमेट स्मार्ट शेती मॉडेल अंतर्गत, धान, मका आणि गहू ही पिके उप-पृष्ठभागावर खोल सिंचनाद्वारे घेण्याचा यशस्वी प्रयोग केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्था, कर्नाल येथे केला गेला होता. क्लायमेट स्मार्ट शेतीमध्ये मॉडेल म्हणून या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधार केंद्राचाही सहभाग आहे. ही पद्धत डिप इरिगेशनचे आधुनिक रूप आहे. डिप इरिगेशनमध्ये, पाण्याची पाइपलाइन जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर ठेवली जाते आणि सिंचनानंतर काढली जाते. 

महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा कार्यक्रम 

आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत बायफ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अनेक गावांमध्ये "क्लायमेट स्मार्ट शेती कार्यक्रम" मागील काही वर्षापासून बायफ संस्थेच्या माध्यामातून राबविला जात आहे. सदर प्रकल्प हा ग्रामीण भागातील विकासासाठी असून त्यामध्ये महिला शेतकरी व बचत गटाच्या महिला सशक्तीकरनातून; त्यांचा समाजिक व आर्थिक स्थर उंचावण्यासाठी विविध घटकांची अंमलबजावणी केल्या जात आहे.

क्लायमेट स्मार्ट शेती  प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

अनेक गावात शेती व महिला शेतकरी या बाबीला केंद्रीभूत करून बदलत्या हवामान व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खरीप हंगामात ''महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा" अमरावती जिल्ह्यातील 262 गावात राबविल्या घेतल्या जाणार आहेत. सोयाबीन,कपासी पिकाच्या अल्पखर्चिक बदलत्या हवामानावर आधारित; गावात निवडलेल्या सुपर चॅम्पियन शेतकऱ्यांच्या डेमो प्लॉटवर पेरणीपासून ते काढणीपर्यंत चे मार्गदर्शन केल्या जानार आहे.

क्लायमेट स्मार्ट शेती  प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून आर्थिक स्थर उंचावते. आयटीसी मिशन सूनेहरा कलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशाळेतून आधुनिक शेती लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्यांचा आर्थिक स्थर कसा वाढविता येईल; यासाठी मार्गदर्शन करते.