डिमर्जरनंतर नवीन कंपनीचं नाव जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (Jio Financial Services - JFSL) असणार आहे. आरआयएलच्या (RIL) भागधारकांना प्रत्येक 1 शेअरमागे जिओ फायनान्सचा 1 शेअर (Share) मिळणार आहे. या डिमर्जरला गेल्या महिन्यात नियामक मान्यता मिळाली. शुक्रवारी बोर्डाच्या बैठकीत रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली.
Table of contents [Show]
बोर्डात कोणाचा समावेश?
ईशा अंबानी आणि माजी कॅग राजीव महर्षी यांना नवीन फायनान्स कंपनीच्या संचालकपदी घेण्यात आलं आहे. कंपनीनं सांगितलं, की गृह सचिव आणि सीएजी राहिलेले माजी ब्युरोक्रॅट राजीव महर्षी यांची आरएसआयएलमध्ये पाच वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंडियन बँक्स असोसिएशनचे (IBA) मुख्य कार्यकारी सुनील मेहता आणि पीडब्लूसीसोबत (PwC) काम करणारे सीए (CA) बिमल मनू तन्ना यांचीदेखील स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हितेश कुमार सेठिया सीईओ
बँकर हितेश कुमार सेठिया यांची 3 वर्षांसाठी आरएसआयएलमध्येचे एमडी आणि सीईओ (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीसाठी आता कंपनीच्या सदस्यांची, आरबीआयची आणि आवश्यक असलेल्या इतर मंजुरीची आवश्यकता आहे. सेठिया संचालक म्हणून नियुक्त झाल्याच्या प्रभावी तारखेपर्यंत पद धारण करतील. आरएसआयएल बोर्डानं राजीव महर्षी, सुनील मेहता आणि बिमल मनु तन्ना यांची 6 जुलै 2028 पर्यंत पाच वर्षांच्या मुदतीसाठी अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली.
ईशा अंबानीचाही समावेश
बोर्डानं मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि अंशुमन ठाकूर यांना बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यापासून आरएसआयएलच्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपर्यंत आरएसआयएलचे संयुक्त वैधानिक लेखा परीक्षक म्हणून लोढा आणि कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट हे पद धारण करतील.
चंद्रशेखरन यांनी सोडलं पद
बाफासुब्रनानियन चंद्रशेखरन यांनी 7 जुलै 2023पासून कंपनीच्या संचालक मंडळातून स्वतंत्र संचालक म्हणून पद सोडलं आहे. आरआयएलनं नियामक फाइलिंगमध्ये याबाबत सांगितलं, की ते यासंदर्भात योग्य पावलं उचलत आहेत. यामध्ये वाटपाची रेकॉर्ड तारीख निश्चित करणं आणि रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या (RSIL) शेअर्सची स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग करणं समाविष्ट आहे.