आयसीएफला (Integral Coach Factory) भेट दिल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली, ते म्हणाले, की वंदे भारत मेट्रो आणि स्लीपर कोच बनवण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे, आयसीएफ व्यतिरिक्त, भारतीय रेल्वे (Indian railways) रायबरेली इथल्या मॉडर्न कोच फॅक्टरी आणि लातूरमधल्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरी या आपल्या दोन कारखान्यांमध्येदेखील सेमी-हाय स्पीड ट्रेनचं उत्पादन करणार आहे. राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरनं 15 ऑगस्ट 2023पर्यंत या नव्या अत्याधुनिक गाड्यांच्या 75 सेवा सुरू करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर कोच
वंदे भारत एक्स्प्रेसचं स्लीपर व्हर्जन 550 किलोमीटरहून अधिक प्रवासासाठी उपयुक्त असणार आहे. राजधानी, दुरंतो यांसारख्या सुपरफास्ट ट्रेनची जागा ही ट्रेन घेणार आहे. स्लीपर व्हेइकल व्हर्जन ट्रेन फेब्रुवारी 2024पर्यंत तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वंदे मेट्रो 100 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर धावणार आहे. आगामी काळात लोकलऐवजी रेल्वेच्या या गाड्या आणण्याची योजना आहे.
Inspected Vande Bharat train production at ICF, Chennai. pic.twitter.com/9RXmL5q9zR
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) July 8, 2023
वंदे भारत एक्स्प्रेसचे एकूण किती व्हर्जन?
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पूर्णपणे स्वदेशी आहे. आता वंदे भारतचे तीन व्हर्जन असतील. पहिलं व्हर्जन असेल चेअरकार, दुसरं असणार आहे स्लीपर कोच आणि तिसरं वंदे मेट्रो. हे तिनही व्हर्जन प्रवाशांना खास अनुभव देतील, असा रेल्वेनं विश्वास व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे, तिकीट दर जास्त असल्यानं सध्या वंदे भारत एक्स्प्रेसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. आता नवीन व्हर्जनमधल्या तिकीटदराबाबत रेल्वे काय निर्णय घेते, यावर प्रवासीसंख्या आणि रेल्वेला मिळणारा महसूल अवलंबून आहे.
एकूण वंदे भारत एक्स्प्रेस किती?
वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन देशाच्या बहुतांश भागात सध्या धावत आहे. देशभरात एकूण 25 वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या आहेत. ही नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-कटरा, मुंबई-गांधीनगर, नवी दिल्ली-अंब अंदौरा, चेन्नई-म्हैसूर, बिलासपूर-नागपूर, हावडा-न्यू जलपायगुडी, विशाखापट्टणम-सिकंदराबाद, मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, दिल्ली-राणी आहेत. कमलापती, सिकंदराबाद-तिरुपती, चेन्नई-कोइम्बतूर, दिल्ली कॅंट-अजमेर, टीव्हीसी-कन्नूर, हावडा-पुरी, गुवाहाटी-न्यू जलपायगुडी, आनंद विहार-डेहराडून, राणी कमलापती-जबलपूर, खजुराहो-भोपाळ-इंदूर, मडगाव-मुंबई, बेंगळुरू, रांची-पाटणा, गोरखपूर-लखनौ आणि जोधपूर-साबरमती.