Uses of Drones: IFFCO व्यतिरिक्त, Ayotechworld Navigation ने देखील Agrochemical कंपनी Syngenta सोबत भागीदारी केली आहे आणि देशाच्या विविध भागांमध्ये 17,000 किलोमीटरचा ड्रोन प्रवास केला आहे. या आर्थिक वर्षात 3,000 हून अधिक ड्रोन विकण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
ड्रोनद्वारे फवारणीचे प्रशिक्षण दिले जाणार
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लि.(इफ्को) कंपनी ही नॅनो युरिया आणि नॅरो डायमोनियम फॉस्फेट (डीएपी) फवारणीसाठी 2,500 कृषी-ड्रोन्स खरेदी करण्याची योजना आखत आहे. यासाठी 5,000 ग्रामीण उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचा इफकोचा मानस आहे. या ग्रामस्थांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 'कंपनी डिसेंबर 2023 पर्यंत IFFCO ला 500 ड्रोन पुरवेल', अशी माहिती Iotechworld Aviation च्या अधिकाऱ्यांनी दिली.
Iotechworld Aviation ही कंपनी देशातील पहिल्या DGCA प्रकारच्या प्रमाणित ड्रोन 'Agribot'ची निर्माता आहे. आयोटेकवर्ल्डला धनुका अॅग्रीटेक या कृषी रसायन कंपनीचा पाठिंबा आहे.
ड्रोनचे शेतीतील फायदे
ड्रोनच्या वापरामुळे वेळ आणि पैसा तर वाचतोच, पण त्याचबरोबर शेतीची उत्पादकताही वाढते. याशिवाय पिकांवर कीटकनाशक फवारणीसारख्या कृषी कार्यात ड्रोनचा वापर केल्याने, ते शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे खत आणि कीटकनाशक कंपन्यांसह विविध कंपन्यांकडून तसेच शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांकडून ड्रोनला प्रचंड मागणी आहे.
कंपनीचे उद्दीष्टे
या आर्थिक वर्षात 3,000 हून अधिक ड्रोनची विक्री करण्याचे Iotechworld Aviation कंपनीचे उद्दिष्ट आहे आणि ती SAARC, दक्षिण पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी क्षेत्रांमध्ये निर्यातीची संधी शोधत आहे.