Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Offer on Electric Bicycle : TATA कंपनीची इलेक्ट्रिक सायकल ऑफरसह बाजारात दाखल; एका चार्जमध्ये 30 किमी धावते

Offer on Electric Bicycle : TATA कंपनीची इलेक्ट्रिक सायकल ऑफरसह बाजारात दाखल; एका चार्जमध्ये 30 किमी धावते

सध्या पर्यावरण प्रेमींमध्ये ई सायकलचा वापर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेत टाटाच्या स्ट्रायडर बाइक्स या कंपनीने झीटा प्लस (Zeeta Plus) नावाने आणखी एक इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलला 36-volt/6 Ah उच्च क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सायकलची ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते.

टाटा उद्योग समूहातील स्ट्रायडर बाइक्स (stryder bikes) या कंपनीने इलेक्ट्रिक सायकल (Electric Bicycle) लाँच केली आहे. कंपनीने पुरुष आणि महिला दोघांच्या वापरांसाठी वेगवेगळ्या रेंजमधील सायकल तयार केल्या आहेत. टाटाच्या इलेक्ट्रिक सायकल या तरुण सायकलस्वारांच्या आवडीनिवडीचा विचार करून टिकाऊ, सुरक्षित आणि स्टायलिशसाठी पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. सध्या टाटाची झीटा प्लस (Zeeta Plus) ही इलेक्ट्रिक सायकल बाजारात विक्रीसाठी दाखल झाली असून ग्राहकांनाही विशेष ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. आज आपण या इलेक्ट्रिक सायकल आणि ऑफर बद्दल जाणून घेणार आहोत.

Zeeta Plus इलेक्ट्रिक सायकलची वैशिष्ट्ये-

सध्या पर्यावरण प्रेमींमध्ये ई सायकलचा वापर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेत टाटाच्या स्ट्रायडर बाइक्स या कंपनीने झीटा प्लस (Zeeta Plus) नावाने आणखी एक इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलला  36-volt/6 Ah उच्च क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सायकलची ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल जवळपास 30 किलोमीटर पर्यंत धावू शकते. तसेच 3 ते 4 तासांतच सायकलची बॅटरी पूर्णपणे चार्ज होते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पॅडल न मारता 25 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने ही सायकल धावू शकते, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.


सायकलवर मिळतेय दमदार ऑफर-

कंपनीकडून ग्राहकांसाठी लाँचिंग ऑफर देण्यात आली असून झीटा प्लस या सायकलवर ग्राहकांना 18 टक्के सुट देण्यात आली आहे. स्ट्राइडरकडून झीटा प्लस ही सायकल ग्राहकांना ऑफर कालावधीमध्ये  एकूण 26,995 रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या सायकलची किंमत तब्बल 6000 रुपयांनी वाढविण्यात येईल. त्यावेळी ग्राहकांना ही सायकल 32995 रुपयांना खरेदी करावी लागणार आहे.

दोन प्रकारचे रंग, ऑटो-कट ब्रेक -

स्ट्रायडरची ही इलेक्ट्रिक सायकल दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ग्रे आणि फॉरेस्ट ग्रीन कलर उपलब्ध आहेत. सायकलच्या इतर फिचर्स संदर्भात सांगायचे झाल्यास या इलेक्ट्रिक सायकलला ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. सायकलच्या हँडल बारवर डिस्प्ले देण्यात आला आहे. या सायकलला 250W मोटारचा वापर करण्यात आला असून या सायकली बॅटरी ही फ्रेममध्ये फिक्स करण्यात आली आहे.