Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Printing press business : ऑनलाईन कार्डमुळे प्रिंटिंग व्यवसायाला उतरती कळा, जाणून घ्या व्यवसाय पुन्हा कसा सुरू करावा?

Printing press business

Image Source : www.axismyindia.org

Printing press business : सद्यस्थितीमध्ये कागदी पत्रिकांची जागा ऑनलाइन कार्डने घेतली आहे. काळाच्या बदलानुसार लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सोयीस्कर पडत आहे. आता ई- वेडिंग कार्डचा वापर करून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे आमंत्रणे देण्यात येत आहे. मात्र, यामुळे प्रिंटिंग प्रेस व्यावसायाला उतरती कळा लागली आहे.

Printing press business : काही वर्षा पूर्वीचा आणि आताचा विचार केला तर आपल्याला अनेक बदल घडून आलेले दिसतात. लग्न जुळताच पत्रिका वाटण्याची घाई आता फार कमी झाली आहे, दूरच्या नातेवाईकांना पत्रिका दिली नाही, ते काय म्हणतील? ही काळजी सुद्धा आता कमी झाली आहे. कारण, कागदी पत्रिकांची जागा ऑनलाइन कार्डने घेतली आहे. काळाच्या बदलानुसार लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सोयीस्कर पडत आहे. आता ई- वेडिंग कार्डचा वापर करून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे आमंत्रणे देण्यात येत आहे. मात्र, यामुळे प्रिंटिंग प्रेस व्यावसायाला उतरती कळा लागली आहे.

इंटरनेटमुळे ऑनलाइन  व्यवहार वाढले 

उन्हाळ्यामध्ये लग्नसराईत फक्त पत्रिकेच्या माध्यमातून लाखोंची रुपयांची कमाई व्हायची. आता मात्र लग्नपत्रिका छापण्याऐवजी केवळ पत्रिकेची डिझाइन तयार करून घेतली जाते. कोरोंना काळात तर ऑनलाइन पत्रिकेला खूपच वेग आला. त्याचबरोबर व्यापऱ्यांना लागणारे बिल बुक आता बंद झालेली दिसून येत आहे. अनेक व्यापारी सर्व डेटा कम्प्युटरमध्ये ठेऊ लागले आहेत. 

महागाईचा सपाटा वाढला

प्रिंटिंगसाठी लागणाऱ्या कागदाची किंमत 60 टक्यांनी वाढली आहे. प्रिंटिंगसाठी लागणारी शाईचे दर दुप्पट झाले आहेत. वन फोम कागदाचा रिम 160 वरून 260 रुपये झाला आहे. पत्रिकांचे दर वाढवल्याने लोकांचा कल ऑनलाइन कार्डकडे गेला आहे. ऑनलाइन कार्ड म्हणजे फक्त डिझाईन बनवून ती फॉरवॉर्ड करता येऊ शकते. त्याचा खर्च सुद्धा कमी येतो. पण, त्यातही एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे लोकं काही वेळा क्वालिटीसमोर किंमत मोजत नाहीत. 

व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी काय करावे?

कोणत्याही व्यवसायामधील सर्वात महत्वाचा नियम म्हणजे काळानुसार बदलणे. आपण कोणताही व्यवसाय करत असू, पण आपल्या ग्राहकांना काय पाहिजे यावर आपले लक्ष सर्वात आधी असायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही जर प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करत आहात तर तुम्ही सर्वात आधी तुमच्या ग्राहकांचा कल कशाकडे आहे हे जाणून घ्या. त्यानंतर त्यांना हवे तसे बदल करा. नवनवीन डिझाईन तयार करून दाखवा. 

म्हणजेच आतापर्यंत तुम्ही प्रिंटिंग मशीनच्या साहाय्याने प्रिंट काढून त्यावर नफा मिळवत होते. आता तुम्ही स्वतः तयार केलेले डिझाईन मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही असे तयार करण्यासाठी काय करावे लागेल? यावर फोकस करा. अजूनही काही ग्राहक असे आहेत, ज्यांना क्वालिटी काम पाहिजे. क्वालिटी काम असल्यास पैसे देतांना विचार करत नाही. स्मार्ट वर्क केल्यास नफा हा मिळणारच. 

कम्प्युटरची संख्या वाढवा, नवीन ग्राफिक्स डिझाइनर हाताखाली घ्या. तुम्ही जर इतरांपेक्षा वेगळं काही केलं तर ग्राहक नक्कीच तुमच्याकडे येतील. प्रिंटिंग प्रेस बरोबरच तुम्ही ग्राफिक्स डिझाइनिंग, फोटो ग्राफीचा जोडधंदा सुद्धा करू शकता. त्यातून तुम्हाला उन्हाळ्याच्या सीजनमध्ये भरघोस नफा मिळू शकतो.