Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Navi Technologies: बाजारात IPO आणण्याआधी नावी फिनटेक कंपनीकडून कर्मचारी कपात

फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी नावीने (Navi) 200 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा पुढील काही दिवसांत IPO येणार आहे. मात्र, त्याआधीच कंपनीने खर्च कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नावी भांडवली बाजारातून 3350 कोटी रुपये उभारणार आहे. यास सेबीनेही परवानगी दिली आहे.

Read More

Dearness Allowance: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित महागाई भत्ता, सरकारने केली महत्वाची सुधारणा

Dearness Allowance: केंद्राच्या अख्यत्यारितील सार्वजनिक उपक्रमांतील (CPSEs) यातील संचालक मंडळ आणि सुपरवायझर स्तरातील कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राईसेस या विभागाने यासंबधी अधिसूचना जारी केली आहे.

Read More

Shivneri Bus: शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त; राज्यात धावणार 'जन-शिवनेरी' बस

राज्य परिवहन महामंडळाकडून लवकरच 'ई-शिवनेरी' बसची सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच या बस राज्यात जन शिवनेरी म्हणून ओळखल्या जातील. सध्या जन-शिवनेरी बस ही प्रायोगिक तत्वावर 10 जुलैपासून नाशिक-पुणे या महामार्गावर सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात तब्बल 100 ई-शिवनेरी (जन शिवनेरी) राज्यातील विविध रस्त्यांवर धावताना दिसतील.

Read More

Tesla electric car: भारतात अवघ्या 20 लाखांत मिळणार टेस्ला इलेक्ट्रिक कार? नेमका प्रस्ताव काय?

Tesla electric car: जगभरात लोकप्रिय असलेली आणि महागडी टेस्ला कार आता भारतात स्वस्त मिळणार आहे. एलन मस्क यांची ईव्ही उत्पादक कंपनी भारतीय बाजारपेठेत 20 लाख रुपयांच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार (EV) आणणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, कंपनी भारतात ईव्ही तयार करण्यासाठी प्लांट स्थापन करणार आहे.

Read More

महाराष्ट्रात 1,18,422 कोटी रुपयांची फॉरेन इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पहिले

Foreign Investment In Maharashtra: महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्यात आली आहे आणि त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिला ठरला आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गेल्याने महाराष्ट्राच्या गुंतवणूकीवर कसलाही परिणाम झालेला नाही. तर नागपूर सोबतच पूर्व विदर्भात 59 कोटी रुपयांचे प्रकल्प लाइनअप झालेले आहेत.

Read More

Retail Inflation In June 2023: जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81% वर पोहोचली, खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या

गेल्या महिन्यात मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.30 टक्के इतका नोंदवला गेला होता. त्यांनतर आता जून महिन्यात हाच दर 4.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता, जून महिन्यातील महागाईचा दर हा सर्वाधिक होता असे सांख्यिकी मंत्रालयाने जरी केलेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी, याच महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7% इतका नोंदवला गेला होता.

Read More

EV Battery: इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी निर्मितीला चालना मिळणार; लिथियम धातूच्या खाणकामास खासगी कंपन्यांना परवानगी

इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीतील लिथियमची 70% आयात परदेशातून होते. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक लिथियम धातू मिळतो. भारतामध्येही लिथियमचे साठे जम्मू काश्मिरात सापडले आहेत. आता खासगी कंपन्यांना लिथियम धातूचे खाणकाम करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. सोबतच इतर पाच खनिजेही खासगी कंपन्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. या निर्णयाचा इव्ही उद्योगाला फायदा होणार आहे.

Read More

Gold Jewellery Import: गोल्ड ज्वेलरी आयातीवर निर्बंध; आयात धोरणातील पळवाटांचा व्यापाऱ्यांनी घेतला फायदा

व्यापारी तूट वाढत असताना सरकारने काही ठराविक सोन्याचे दागिने (प्लेन गोल्ड ज्वेलरी) आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. सरकारी धोरणातील पळवाटांचा काही व्यापारी आणि डिलर्सकडून फायदा घेण्यात येत होता. त्यामुळे आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. इंडोनेशियाहून अचानक सोन्याची आयातही वाढली होती.

Read More

Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून मिळेल, कुक्कुटपालन आणि शेळीपालनासाठी कर्ज

Loans for poultry and goat rearing : या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात फक्त 4% व्याज द्यावे लागेल. तर पशुसंवर्धनासाठी खाजगी बँकांकडून कर्ज घेतल्यावर 7% पर्यंत व्याज द्यावे लागते. जाणून घ्या डिटेल्स

Read More

Rainy Season Agricultural crops : फक्त भातच नाही तर पावसाळ्यात 'या' पिकांची शेतीही मिळवून देऊ शकते भरभरून उत्पन्न

Rainy Season Agricultural crops : पावसाळा सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत देशातील बहुतांश शेतकरी भातशेतीमध्ये गुंतले आहेत. असे अनेक शेतकरी आहेत जे पारंपारिक शेतीपासून दूर गेले आणि अधिक नफा मिळविण्यासाठी विविध प्रकारची शेती करतात. जाणून घेऊया, त्या पिकांबद्दल ज्यांची लागवड तुम्ही पावसाळ्यात अगदी आरामात करू शकता. त्याचबरोबर या पिकांच्या लागवडीतून तुम्हाला बंपर नफाही मिळू शकतो.

Read More

GMLR Project: मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कखालून जाणार बोगदा; सहा हजार कोटींच्या प्रकल्पासाठी तीन कंपन्यांची बोली

गोरेगाव-मुलूंड लिंकरोड निर्मितीचा प्रकल्प सुमारे साडेआठ हजार कोटींचा आहे. त्यापैकी दुहेरी बोगदा निर्मितीसाठी 6 हजार 300 कोटी खर्च येणार आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून हा बोगदा जाणार आहे. 4.7 कि.मी लांबीचा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण होणार आहे. बोगदा तयार करण्यासाठी तीन बड्या कंपन्यांनी बोली लावली आहे.

Read More

Mobile Solar Plant : मोबईल सोलर प्लांट काय आहे? कमी खर्चात सिंचनासाठी कशी मदत होऊ शकते? जाणून घ्या

Mobile Solar Plant : भारतातील शेतकरी आता आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने शेती करू लागले आहेत. त्यामध्ये परदेशातून शेतीसाठी आधुनिक यंत्रे आणणारे अनेक शेतकरी आहेत. त्याचबरोबर जुगाड करून आधुनिक यंत्रे बनवणारे अनेक शेतकरी आहेत, ज्याचा विचारही मोठे इंजिनियर्स करू शकत नाहीत. जाणून घेऊया, अशाच एका यंत्राविषयी ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेताला हव्या त्या ठिकाणी सिंचन करू शकता.

Read More