Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OLX Auto: आर्थिक अडचणीत असलेल्या ओएलएक्स ऑटोची अखेर विक्री, 537 कोटींना झाली डील

OLX Auto

CarTrade Tech कंपनीने सोबेक ऑटोची 537 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. कार ट्रेडने बीएसईला (Bombay Stock Exchange Ltd.) दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सोबेक ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​100 टक्के शेअर्स कंपनी खरेदी करणार आहे. सोबेक ही OLX इंडियाच्या ऑटो सेल्स डिव्हिजनची मालकी कंपनी आहे. या दोन कंपनीमध्ये झालेल्या व्यवहाराची माहिती त्यांनी काल, 10 जुलै 2023 रोजी बीएसईला कळवली आहे.

ओएलएक्स या कंपनीबद्दल सर्वांनाच कल्पना आहे. जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करण्यासाठी हे एक लोकप्रिय पोर्टल म्हणून ओळखले जाते. याच कंपनीचा ओएलएक्स ऑटो (OLX Auto) हा उद्योग, जुना वाहनांची खरेदी-विक्री करत होता. मात्र आता OLX Auto बद्दल एक मोठी बातमी आली आहे. Sobek Auto India Pvt Ltd (OLX Auto ची मूळ कंपनी) कंपनीला कार ट्रेड टेक कंपनीने (Car Trade Tech) खरेदी केले आहे.

लॉकडाऊन नंतर ओएलएक्स ऑटो आर्थिक अडचणींचा सामना करत होती. जुन्या वाहनांची खरेदी विक्री देखील रोडावली होती. अमेरिका, भारत,थायलंड येथील उद्योग देखील मंद गतीने सुरु होता. वेगवगेळ्या देशातील ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय मागच्याच महिन्यात कंपनीने घेतला होता, त्यांनतर कंपनी विक्रीसाठी काढली जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज आज खरा ठरला आहे.

कार ट्रेड टेक कंपनीने सोबेक ऑटोची 537 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. कार ट्रेडने बीएसईला (Bombay Stock Exchange Ltd.) दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सोबेक ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​100 टक्के शेअर्स कंपनी खरेदी करणार आहे. सोबेक ही OLX इंडियाच्या ऑटो सेल्स डिव्हिजनची मालकी कंपनी आहे. या दोन कंपनीमध्ये झालेल्या व्यवहाराची माहिती त्यांनी काल, 10 जुलै 2023 रोजी बीएसईला कळवली आहे.

पुढे काय होणार?

कार ट्रेड टेक कंपनीने OLX Auto ची खरेदी केल्यानंतर काय होणार असा सगळ्यांचा प्रश्न पडला होता. खरे तर कर ट्रेड कंपनी देखील वाहनांची खरेदी-विक्री करण्याच्या व्यवसायात आहे. त्यामुळे कंपनीने OLX Auto चे काम जैसे थे परिस्थितीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपनीची मालकी केवळ बदलणार आहे. तसेच ग्राहकांना जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करता येणार आहे. कंपनीने या आधीच 800 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कंपनीकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ नाहीये. कार ट्रेड टेक कंपनीने खरेदी केल्यानंतर कंपनीच्या पॉलिसीनुसार उद्योगाची दिशा ठरवली जाणार आहे.

पुढील 30 दिवसांत होणार अधिग्रहण 

BSE ला सादर केलेल्या माहितीनुसार येत्या 30 दिवसांत कंपनीचे अधिग्रहण होणार असून संपूर्ण 100% शेअर कार ट्रेड कंपनीकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. 537.43 कोटी रुपयांत ही डील ठरली असून येत्या 30 दिवसांत कार ट्रेड टेकला ओएलएक्स ऑटोला ठरलेली रक्कम अदा करायची आहे.