Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

YouTube Premium सर्विस महागली, गुगलने घेतला मोठा निर्णय

गेल्या दशकात व्हिडियो आणि म्युजिकच्या बाबतीत एकटे युट्युब मैदानात होते. आता मात्र वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी, 2018 मध्ये, YouTube ने प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन वाढवला होता, त्यानंतर आता यात वाढ करण्यात आली आहे.

Read More

TCS, विप्रोसह 4 बड्या IT कंपन्यांतील कर्मचारी संख्या रोडावली; कर्मचाऱ्यांवरील खर्चातही वाढ

व्यवसायातील मंदीच्या पाश्वभूमीवर देशातील चार बड्या आयटी कंपन्यांतील कर्मचारी संख्या रोडावल्याचे समोर आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांची पगारवाढही लांबणीवर टाकली आहे. इन्फोसिसमधील सुमारे 7 हजार कर्मचारी कमी झाले आहेत.

Read More

EPFO: मे महिन्यात भविष्य निर्वाह निधीत 16.30 लाख सदस्यांचा समावेश, महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले

कामगार मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये असे सांगण्यात आले की, यावर्षी मे महिन्यात 16.30 लाख सदस्य सामील झाले आहेत. आकडेवारीनुसार, मे महिन्यात देशभरातील 3,673 कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना EPFO ​​च्या सामाजिक सुरक्षा निधीत नोंदणीकृत केले आहे. 3,673 कंपन्यांमधील एकूण 16.30 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

Read More

जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर, गौतम अदानींचा नंबर कितवा?

श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क (Elon Musk) हे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 255 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) असून त्यांची संपत्ती 203 अब्ज डॉलर इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर 160 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेझोस (Jeff Bezos) हे आहेत. फेसबुकचे मार्क झुकरबर्ग या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.

Read More

SBI Infra Bond: गुंतवणुकीची संधी! स्टेट बँक ऑफ इंडिया 10 हजार कोटींचे इन्फ्रा बाँड बाजारात आणणार

स्टेट बँक ऑफ इंडिया 10 हजार कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर बाँड बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. गुंतवणुकीवर निश्चित परतावा पाहिजे असल्यास हे बाँड एक चांगला पर्याय आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे बाँड बाजारात येऊ शकतात.

Read More

Stevia Farming : शुगरच्या रुग्णांना फायदेशीर असलेल्या 'या' वनस्पतीची लागवड करून शेतकरी मिळवू शकतात लाखोंचा नफा

Stevia Farming : स्टीव्हिया साखरेपेक्षा तीनशे पट गोड आहे. मात्र, त्यात कॅलरीजचे प्रमाण शून्य आहे. म्हणूनच डॉक्टर साखरेच्या रुग्णांना स्टीव्हियापासून बनविलेले पदार्थ घेण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊया, याची शेती कशी केली जाते?

Read More

Rice export ban: बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर सरकारनं घातली बंदी, काही अटींवरच परवानगी

Rice export ban: बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीसंदर्भात सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर सरकारनं बंदी घातली आहे. तांदळाच्या निर्यातीवरच्या बंदीमुळे भारतातून तांदूळ आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर दबाव येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Read More

YCMOU : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला सुरुवात; कमीत कमी खर्चात करू शकता आपले शिक्षण पूर्ण

YCMOU Admission : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे रेग्युलर कॉलेज न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वरदानच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण याच विद्यालयातून पूर्ण केले आहे. मागील वर्षी विद्यापीठाने ड्युअल पदवीचे शिक्षण देण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे या वर्षी ड्युअल पदवीचे शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Read More

Adhik Maas 2023 : अधिक मासमध्ये मुलगी आणि जावयाला भेट म्हणून देऊ शकता 'या' वस्तु, जाणून घ्या सविस्तर

Adhik Maas 2023 : दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजेच भगवान विष्णूचा आवडता महिना आहे असे मानले जाते. यालाच मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. 18 जुलै 2023 पासून अधिक मास सुरू झाला असून तो 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जाणून घेऊया, या अधिक मासात जावयाला तुम्ही काय भेट देऊ शकता?

Read More

ITC market cap: बाजारातल्या तेजीच्या दरम्यान आयटीसीचा नवा विक्रम, 6 लाख कोटींच्या पुढे मार्केट कॅप!

ITC market cap: एफएमसीजी, हॉटेल्स, सॉफ्टवेअरपासून ते कागदापर्यंत व्यवसाय करणाऱ्या आयटीसी या कंपनीनं शेअर बाजारात नवा विक्रम केला आहे. गुरुवार, 20 जुलैला स्टॉक 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यानंतर या समभागाचे बाजार भांडवल नवीन विक्रमी उच्चांकावर आहे. त्यानंतर या कंपनीचं एकूण मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

Read More

Sahara Refund: सहारात गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या मिळणार केवळ 10,000 रुपये, बाकी पैशांचं काय होणार?

'सहारा'मध्ये तुम्ही कितीही गुंतवणूक केली असली तरी, सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजारांपर्यंतची रक्कमच गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्ही सहारात 1 लाख रुपये जरी गुंतवलेले असले तरीही, तुम्हांला 10 हजार रुपयेच मिळणार आहेत. अशा परिस्थितीत ज्यांनी 10 हजारांपेक्षा अधिक पैसे गुंतवले होते असे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

Read More

Stock Holding Limit: साखर कंपन्या सरकारच्या रडारवर; स्टॉक होल्डिंग लिमिटची तपासणी करणार

साखरेची मागणी आणि पुरवठा यामध्ये गफलत होत असल्यामुळे त्याचा किमतीतही त्याप्रमाणेच चढ-उतार येत आहेत. परिणामी सर्वसामान्यांना चढ्या दराने साखर खरेदी करावी लागत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने साखर कंपन्यांच्या स्टॉक होल्डिंग लिमिटची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More