Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

YCMOU : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला सुरुवात; कमीत कमी खर्चात करू शकता आपले शिक्षण पूर्ण

YCMOU Admission

YCMOU Admission : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे रेग्युलर कॉलेज न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वरदानच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण याच विद्यालयातून पूर्ण केले आहे. मागील वर्षी विद्यापीठाने ड्युअल पदवीचे शिक्षण देण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे या वर्षी ड्युअल पदवीचे शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

YCMOU Admission : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे रेग्युलर कॉलेज न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वरदानच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण याच विद्यालयातून पूर्ण केले आहे. घरची जबाबदारी आणि शिक्षण दोन्ही बाबी एका वेळी पूर्ण करणे कठीण जाते तेव्हा अनेक विद्यार्थी हा पर्याय निवडतात. मागील वर्षी विद्यापीठाने ड्युअल पदवीचे शिक्षण देण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे या वर्षी ड्युअल पदवीचे शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

कधी पर्यंत प्रवेश घेऊ शकता? 

तुम्ही शिकत असलेल्या एखाद्या विद्यापीठातील अभ्यासक्रमाबरोबर यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी, पदविका, किंवा प्रमाणपत्र स्तरावरील (Certificate Courses) करता येऊ शकणार आहे. यासाठी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमध्ये मुक्त शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इथल्या विविध अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना 30 जुलै 2023 पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत.

प्रवेश फी किती असणार आहे? 

राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत असणार आहे. अंध विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफ असणार आहे. 
राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 190 रुपयांमध्ये मध्ये पदवी शिक्षणक्रमास प्रवेश मिळणार आहे.

अर्ज कसा करावा? 

इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठात प्रवेश अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपली नोंदणी करावी लागेल. त्यांनतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्ड चा वापर करून आपल्या खात्यात प्रवेश करावा लागेल. आपली संपूर्ण प्रोफाइल व्यवस्थित फील करावी लागेल. त्यानंतर सर्व डॉक्युमेंटस अपलोड करावे लागतील. त्यानंतर हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करावा, व ऑनलाईन प्रकारे परीक्षा शुल्क भरावे. सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची एक प्रिंट काढावी व ती निवडलेल्या अभ्यासकेंद्रात जमा करावी.