Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

YouTube Premium सर्विस महागली, गुगलने घेतला मोठा निर्णय

YouTube Premium

Image Source : www.imdb.com

गेल्या दशकात व्हिडियो आणि म्युजिकच्या बाबतीत एकटे युट्युब मैदानात होते. आता मात्र वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी, 2018 मध्ये, YouTube ने प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन वाढवला होता, त्यानंतर आता यात वाढ करण्यात आली आहे.

युट्युबचा वापर आपण सगळेच करतो. व्हिडियोसाठी सर्वात लोकप्रिय मध्यम म्हणून आजही युट्युबची क्रेझ कायम आहे. अशातच युट्युबची मालकी असलेल्या Google ने YouTube Premium चे सबस्क्रिप्शन शुल्क वाढवले ​​आहे. गुगलच्या या निर्णयामुळे आता यूट्यूब म्युझिकवर जाहिरातमुक्त व्हिडिओ (Ad Free) पाहणे आणि संगीत स्ट्रीमिंग महाग होणार आहे. गुगलच्या या सेवेत ग्राहकांना जाहिरातमुक्त व्हिडियो बघता येतात. लांबलचक जाहिराती टाळण्यासाठी अनेकदा युजर्स या सेवेचा लाभ घेत असतात. जाहिरातमुक्त व्हिडियोसोबतच अनेक सुविधा युजर्सला दिल्या जातात.

किती रुपयांनी वाढले सबस्क्रिप्शन?

यापूर्वी, युट्युबच्या वैयक्तिक वापरकर्त्यांना YouTube साठी दरमहा 11.99 डॉलर म्हणजेचे सुमारे 983 रुपये द्यावे लागत होते. आता या सबस्क्रिप्शन रेटमध्ये बदल केल्यानंतर युजर्सला आता दरमहा 13.99 डॉलर म्हणजेच सुमारे 1,147 रुपये आकारावे लागणार आहेत. हे रेट्स Android वापरकर्त्यांसाठी आहेत.तसेच iOS वापरकर्त्यांसाठी, हे शुल्क 18.99 डॉलर्स म्हणजे सुमारे 1,557 रुपये इतके असणार आहे.

कोणकोणत्या देशांत होणार बदल?

गुगलने जारी केलेल्या एका निवेदनानुसार प्राथमिक स्वरूपात हे रेट्स केवळ अमेरिकेतील ग्राहकांसाठी आकारले जाणार आहेत. मात्र हळूहळू इतर देशांमध्ये देखील ही सदस्यता योजना लागू करण्यात येईल असे म्हटले आहे. युट्युब युजर्सला अधिक चांगली सेवा आणि फीचर्स प्रदान करता यावेत यासाठी आम्ही सबस्क्रिप्शन रेट वाढवत आहोत आसे गुगलने म्हटले आहे. प्रीमियम सबस्क्रिप्शन असलेले वापरकर्ते कोणत्याही निर्बंधाशिवाय, जाहिरातीशिवाय त्यांचे आवडते व्हिडिओ YouTube वर पाहू शकतील. तसेच, YouTube म्युझिक वापरकर्ते 100 दशलक्ष गाण्यांचा आनंद घेऊ शकतील, असे गुगलने म्हटले आहे.

युट्युबची स्पर्धा वाढली!

गेल्या दशकात व्हिडियो आणि म्युजिकच्या बाबतीत एकटे युट्युब मैदानात होते. आता मात्र वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी, 2018 मध्ये, YouTube ने प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन वाढवला होता, त्यानंतर आता यात वाढ करण्यात आली आहे. सध्या युट्युबला त्यांचे प्रतिस्पर्धी Amazon Music, Spotify आणि Apple Music यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे.