Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

UPI Payments: फ्रान्ससोबतच इतर 13 देशांमध्ये करता येणार UPI पेमेंट, लाखो भारतीयांना होणार फायदा

येत्या काही दिवसांत UPI द्वारे अनेक आखाती देश आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये व्यवहार करता येणार असल्याचे देखील शुक्ला यांनी म्हटले आहे. आखाती आणि अमेरिकन देशांशी याबाबत चर्चा सुरु असून, त्यावर सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास NIPL चे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश शुक्ला यांनी व्यक्त केला आहे.

Read More

Ajay Banga on Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड आशादायी, डिजिटलायजेशनचा होणार फायदा

जागतिक अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितीत आहे. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करून, बंगा म्हणाले की, डिजिटल पायाभूत सुविधांसाठी भारत सरकारने विकसित केलेले मोबाईल अॅप्स आज लोकांचे जीवन सोपे करत आहेत.

Read More

NITI Aayog Report: पाच वर्षात 13.5 कोटी नागरिक झालेत गरीबीतून मुक्त, नीती आयोगाने केला रिपोर्ट सादर

Poverty Report Of NITI Aayog: NITI आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी प्रसिद्ध केलेल्या 'राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक: प्रगती पुनरावलोकन 2023' या अहवालात दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या पुढाकारामुळे पाच वर्षात 13.5 कोटी नागरिक गरीबीतून मुक्त झाले आहेत.

Read More

Agri Central App : स्मार्ट शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत करणारा ॲग्री सेंट्रल ॲप काय आहे? जाणून घ्या

Agri Central App : कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानापासून ते पद्धतीपर्यंत बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होत आहे. आपण ज्या App बाबत माहिती जाणून घेणार आहोत ते प्रगत तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व माहिती देते, जी शेतकऱ्याला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Read More

Onion: सरकार करणार 3 लाख टन कांदा खरेदी, टोमॅटो नंतर कांदा रडवणार, सणासुदीत कांदा महागण्याची शक्यता

Onion Buffer Stock: देशात टोमॅटोनंतर आता कांदा लोकांना रडवू शकतो, याचे कारण म्हणजे देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याच्या किमती वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आधीच सतर्क झाले आहे. कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी सरकारने 3 लाख टन कांदा खरेदी केला आहे. तसेच कांदा सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा सुरु आहे.

Read More

France Work Visa: आनंदाची बातमी! फ्रान्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यास 5 वर्षांचा वर्क व्हिसा मिळणार

फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना 12 ते 24 महिन्यांचा वर्क व्हिसा मिळतो. त्यानंतर कायमची नोकरी मिळाली नाही तर देश सोडावा लागतो. आता फ्रान्समध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदत 5 वर्ष करण्यात आली आहे. त्याचा भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होईल.

Read More

Sahara Refund Portal : सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल सुरू होणार; गुंतवणूकदारांना दिलासा

सहारा इंडियाच्या तब्बल 24000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात देशभरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. आता या पीडित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह मंगळवारी सहारा रिफंड पोर्टल (Sahara Refund Portal) लाँच करणार आहेत. 18 जुलैला सकाळी 11 वाजता अटल ऊर्जा भवन येथे या पोर्टलचे लोकार्पण केले जाणार आहे.

Read More

Elon Musk on Twitter: ट्विटरची प्रकृती चिंताजनक! महसूल अर्ध्यावर तर कर्जात वाढ, एलन मस्क म्हणाले...

Elon Musk on Twitter: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरची प्रकृती चिंताजनक अवस्थेत आहे. कंपनीचा जाहिरात महसूल निम्म्यावर आला आहे, कॅश फ्लो निगेटिव्ह आहे आणि त्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर आहे. या सर्व परिस्थितीवर कंपनीचे मालक एलन मस्क यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Read More

Cricket World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना मोटेरा स्टेडियममध्ये रंगणार; अहमदाबाद फ्लाइट बुकिंग 300 टक्क्यांनी महागली

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील फॅन्ससाठी पर्वणीच. ICC Cricket World Cup 2023 ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, तीन महिने आधीपासूनच अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइट्सचे दर 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. हॉटेल बुकिंगही वाढली आहे. मोटेरा स्टेडियममध्ये 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना रंगणार आहे.

Read More

Indian Currency in Nepal: नेपाळमध्ये भारतीय रुपयाला 'बुरे दिन', नेपाळमध्ये रुपये घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार

सध्या 100 रुपयांच्या भारतीय नोटेच्या बदल्यात 160 नेपाळी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र नेपाळ मधील काही व्यावसायिक 120-130 रुपये देताना दिसत आहेत. तसेच 500 भारतीय रुपयांच्या बदल्यात 800 नेपाळी रुपये मिळणे अपेक्षित असताना 700-750 नेपाळी रुपये बदलून दिले जात आहेत. नेपाळ मधील व्यावसायिकांना अचानकपणे असा निर्णय घेतल्यामुळे सामान्य भारतीयांना मात्र नाईलाजाने कमी पैसे घ्यावे लागत आहेत.

Read More

Panasonic Battery: भारतात बॅटरी निर्मितीमध्ये जपानची बलाढ्य कंपनी पॅनासॉनिक उतरणार

पॅनासॉनिक कंपनी भारतामध्ये बॅटरी निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मर्सडिझ बेन्झ, ह्युंदाई आणि फोक्सवॅगन या कंपन्यांना पॅनासॉनिकद्वारे बॅटरीचा पुरवठा केला जाऊ शकतो. सध्या पॅनासॉनिक ही टेस्ला कंपनीला सर्वाधिक बॅटरी पुरवठा करते.

Read More

Tomato Price: तुम्हाला माहित आहे का 'या' कारणांमुळे टोमॅटोच्या किंमतीचा भडका उडाला

Tomato Price: मे महिन्यात सर्वसाधारणपणे 10 ते 15 रुपये प्रती किलो दराने टोमॅटोची विक्री सुरु होती. मात्र जून महिन्यात टोमॅटोची आवक घटली. उत्तरेत आलेली उष्णतेची लाट आणि मे-जूनमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने टोमॅटोचे पिक आडवे केले. ज्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या किंमतीचा भडका उडाला.

Read More