सहारामध्ये गुंतवणूक केलेल्यांना आता त्यांचे पैसे परत केले जात आहेत. केंद्र सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक पोर्टल विकसित केले आहे. जिथे पारदर्शी पद्धतीने गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत. जर तुम्हीही सहारामध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यात तुमचे पैसे अडकले असतील, तर आता सीआरसीएस-सहारा रिफंड पोर्टलद्वारे (CRCS Sahara Refund Portal) पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
परंतु याबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे. तुम्ही कितीही गुंतवणूक केली असली तरी, सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजारांपर्यंतची रक्कमच गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्ही सहारात 1 लाख रुपये जरी गुंतवलेले असले तरीही, तुम्हांला 10 हजार रुपयेच मिळणार आहेत. अशा परिस्थितीत ज्यांनी 10 हजारांपेक्षा अधिक पैसे गुंतवले होते असे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. बाकी पैसे कधी आणि कसे मिळणार याबाबत सध्या विचारणा होते आहे. चला तर जाणून घेऊया, याबाबत केंद्र सरकारने काय म्हटले आहे ते…
सध्या फक्त 10 हजार रुपयांपर्यंतच परतावा
याबाबत अधिक माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रिफंड प्रक्रियेत सुरुवातीच्या टप्प्यात केवळ 10 हजार रुपयांपर्यंतचे पैसे गुंतवणूकदारांना दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात जवळपास 1.07 कोटी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दिले जातील. हे असे गुंतवणूकदार आहेत ज्यांच्या एकूण ठेवी फक्त 10,000 रुपयांपर्यंत आहेत.
'सहारा रिफंड पोर्टल' पर जमाकर्ताओं के रजिस्ट्रेशन और दस्तावेजों के सत्यापन के बाद राशि सीधे उनके बैंक खाते में ट्रांस्फर कर दी जाएगी। pic.twitter.com/kIqMjjbhK5
— Amit Shah (@AmitShah) July 18, 2023
बाकी पैसे कधी मिळणार?
10,000 रुपये रिफंड दिल्यानंतर बाकी पैसे कधी मिळतील याबाबत सध्या विचारणा होते आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यात केवळ 4 कोटी गुंतवणूकदारांनाच त्यांचे पैसे मिळणार आहेत. यात जवळपास 5,000 कोटी रुपयांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला जाणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना दहा हजारांपर्यंत रक्कम परत दिली जाणार आहे.
यानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे राहिलेले पैसे परत मिळावेत म्हणून सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाणार असून त्यांच्याकडे आणखी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होईल याबाबत अजूनतरी कुठलीही स्पष्टता नाही.
प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की आता जर 10,000 रिफंड दिले तर ज्याची रक्कम जास्त आहे त्याच्या उरलेल्या पैशांचे काय होणार? खरं तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात फक्त 4 कोटी गुंतवणूकदारांनाच परतावा मिळेल. 5,000 कोटींचा परतावा दिल्यानंतर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांना आणखी निधी देण्याचे आवाहन करणार आहोत. जेणेकरून नंतर ज्यांच्याकडे 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे आहेत त्यांचे पैसेही परत करता येतील. मात्र ही रक्कम कधी मिळणार याबाबत काहीही सांगता येणार नाही.
45 दिवसांत मिळणार पैसे
पोर्टलद्वारे ज्या गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे मिळवण्यासाठी क्लेम केला आहे, त्यांच्या क्लेमचा निपटारा 45 दिवसांच्या आता लावला जावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी आणि क्लेम करावा असे सांगण्यात आले आहे.