Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITC market cap: बाजारातल्या तेजीच्या दरम्यान आयटीसीचा नवा विक्रम, 6 लाख कोटींच्या पुढे मार्केट कॅप!

ITC market cap: बाजारातल्या तेजीच्या दरम्यान आयटीसीचा नवा विक्रम, 6 लाख कोटींच्या पुढे मार्केट कॅप!

ITC market cap: एफएमसीजी, हॉटेल्स, सॉफ्टवेअरपासून ते कागदापर्यंत व्यवसाय करणाऱ्या आयटीसी या कंपनीनं शेअर बाजारात नवा विक्रम केला आहे. गुरुवार, 20 जुलैला स्टॉक 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यानंतर या समभागाचे बाजार भांडवल नवीन विक्रमी उच्चांकावर आहे. त्यानंतर या कंपनीचं एकूण मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

आयटीसी (Indian Tobacco Company) या कंपनीचं मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मार्केट कॅपच्या (Market cap) बाबतीत ही देशातली एक मोठी कंपनी बनली आहे. सीएनबीसीनं हे वृत्त दिलं आहे. जास्तीत जास्त बाजार भांडवलाच्या बाबतीत आयटीसीच्या पुढे फक्त 5 कंपन्या आहेत. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance induatries) 17.63 लाख कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर एचडीएफसी (HDFC) बँक दुसऱ्या स्थानावर आहे. अलीकडेच एचडीएफसीच्या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचं बाजार भांडवल वाढलं आहे. या खाजगी क्षेत्रातल्या बँकेचं मार्केट कॅप 12.69 लाख कोटी रुपये आहे. 

आयटीसीपुढे कोणत्या कंपन्या?

टाटा समूहाची आयटी कंपनी असलेली टीसीएस ही 12.60 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. आयसीआयसीआय बँक या यादीत चौथ्या स्थानावर आहे, तिचं एकूण मार्केट कॅप 6.82 लाख कोटी रुपये आहे. तर एचयूएल (Hindustan Unilever Limited) ही 6.29 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह देशातली 5वी सर्वात मोठी कंपनी आहे.

वेगानं वाढणारा स्टॉक

मागच्या 12 महिन्यांत आयटीसीनं निफ्टीच्या सर्व 50 समभागांमध्ये सर्वात वेगानं वाढणाऱ्या समभागांच्या यादीत वरचं स्थान मिळवलं आहे. मागच्या 12 महिन्यांत या समभागात 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर या कालावधीत निफ्टीमध्ये सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. या समभागानं मागच्या 6 महिन्यांत सुमारे 45 टक्के इतका परतावा दिला आहे. तर गुरुवार, 20 जुलैला या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय?

बाजार भांडवल (Market capitalization) कोणत्याही कंपनीच्या सध्याच्या समभागांचं एकूण मूल्य दर्शवते. यावरून सध्या त्या कंपनीचा एकूण बाजारभाव किती, हे कळतं. शेअर बाजारात हे शेअर्स खरेदी-विक्री होत राहिल्यानं या शेअर्सचं एकूण मूल्यही बदलत राहतं. मार्केट कॅपचा कंपनी, तिची मालमत्ता किंवा इतर मालमत्तांशी काहीही संबंध नाही. एखाद्या कंपनीचं मार्केट कॅप ठरवण्यासाठी त्या कंपनीच्या शेअरची किंमत विकल्या गेलेल्या एकूण समभागांच्या संख्येनं गुणाकार केली जाते.