Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

SEBI : आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या सात कंपन्यांच्या संपत्तीचा सेबी करणार लिलाव, 13 कोटी कमावण्याचा अंदाज

गुंतवणूकदारांची दिशाभूल करून, त्यांच्याकडून अवैधरीत्या भांडवल जमा केल्याचा आरोप या सात कंपन्यांवर करण्यात आला आहे. या सातही कंपन्यांची सखोल चौकशी केल्यानंतर सेबीने ही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 ऑगस्टला या सात कंपन्यांच्या एकूण 15 मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती स्वतः सेबीने दिली आहे.

Read More

जपानी तंत्रज्ञानाने भारतीय रोड होणार हायटेक; डोंगराळ भागातील रस्ते बांधण्यासाठी मास्टर प्लॅन

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जपान आणि भारतामध्ये सहकार्य करार झाला. JICA ही जपानची रस्ते निर्मिती आणि उवजड उद्योग क्षेत्रातील सरकारी कंपनी आहे. या कंपनीच्या सहकार्याने भारतामध्ये मेट्रोसह इतरही अनेक महत्त्वाचे प्रकल्प याआधी पूर्ण करण्यात आले आहेत.

Read More

Business To Start In Rural Areas : ग्रामीण भागातील लोक करू शकतात 'हे' व्यवसाय, मिळवू शकतात भरघोस उत्पन्न

Business To Start In Rural Areas : अनेकदा लोकांना असे वाटते की, कोणताही व्यवसाय फक्त शहरातच चालू शकतो. पण आज तसं नाहीये, छोट्या गावातही तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त काही भांडवल असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे पुरेशा गोष्टी असतील तर तुम्ही कुठेही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

Farming Idea : डिझेल प्लांटची लागवड करून शेतकरी मिळवू शकतात भरघोस नफा, जाणून घ्या सविस्तर

Farming Idea : डिझेल प्लांटच्या लागवडीसाठी उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक आहे. यासोबतच, त्याच्या लागवडीसाठी, आपल्याला अशा शेताची आवश्यकता असेल जेथे पाण्याचा निचरा योग्य असेल. कोरड्या भागात ही वनस्पती मुबलक प्रमाणात आढळते. जाणून घेऊया, या प्लांटची लागवड करून शेतकरी भरघोस नफा कसा मिळवू शकतात?

Read More

Navi Mumbai Airport: नवी मुंबईतून विमानांचे टेकऑफ! गौतम अदानी यांनी सांगितली नवी मुंबई एअरपोर्टची डेडलाईन

Navi Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड ताण आहे. हवाई सेवेचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळाची उभारणी केली जात आहे. नवी मुंबईतील पनवेलजवळ विमानतळ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 16700 कोटींचा खर्च होणार आहे.

Read More

Cadbury old chocolate: कशी दिसते 121 वर्षे जुनी कॅडबरी चॉकलेट? आता होतोय लिलाव, काय खास?

Cadbury old chocolate: चॉकलेट ही एक अशी वस्तू आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसंच सर्व वयोगटातल्यांना आवडते. आता याच चॉकलेटबद्दल एक रंजक अशी गोष्ट व्हायरल होत आहे. एक-दोन नव्हे तर सुमारे 121 वर्षे जुने कॅडबरी चॉकलेट लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.

Read More

Behavioral Ads: लोकांच्या आवडीनिवडीनुसार जाहिरात दाखवण्यास फेसबुक, इन्स्टाग्रामवर बंदी; 'या' देशाने घेतला कठोर निर्णय

फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर युझर्सच्या आवडीनिवडीनुसार जाहिरात दाखवण्यास नॉर्वे देशाने बंदी घातली आहे. जर मेटाने या नियमाचे उल्लंघन केले तर प्रतिदिन लाखोंचा दंडही आकरण्यात येईल. लोकांच्या माहितीचा गैरवापर होत असल्याचे नॉर्वे सरकारचे म्हणणे आहे.

Read More

Crypto Rules: जगभरातील क्रिप्टो कंपन्यांसाठी नियमावली तयार; G-20 बैठकीत मसुद्यावर चर्चा

क्रिप्टो करन्सी कंपन्यांवर अद्यापही जागतिक स्तरावर नियम किंवा कायदे नाहीत. या आभासी चलनातील गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर क्रिप्टो व्यवहार आणि कंपन्यांवर फायनान्शिअल स्टॅबिलीटी बोर्डने (FSB) नियमावली तयार केली आहे. FSB ही एक जागतिक संघटना आहे. G-20 बैठकीत या नियमांवर चर्चा होणार आहे.

Read More

राज्याचे बजेट कोलमडले;अवघ्या 3 महिन्यात नव्या अर्थमंत्र्यांनी सादर केल्या 41 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

Supplementary Demand 2023-24: तत्कालीन अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात 5 लाख 47 हजार 450 कोटी रुपयांचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात सरकारने 41 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत.

Read More

Tirupati Temple: नारायण मूर्ती यांनी तिरुपती मंदिराला किलोने केले सोने दान, जाणून घ्या सविस्तर

Murty Couple Donate Gold Idol: देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी तिरुपती देवस्थानाला भेट देऊन श्री बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी या दांपत्याने सोन्याचा शंख आणि सोन्याची कासवाची मूर्ती दान केली. दान करण्यात आलेले एकूण सोने हे दोन किलो वजनाचे असुन त्याची किंमत 1.50 कोटींच्या जवळपास आहे.

Read More

Made-in-India Drone : भारत 10000 कोटी खर्चून करणार 97 ड्रोनची खरेदी; सीमेवर टेहळणी

भारतीय संरक्षण दल चीन आणि पाकिस्तान सीमेवर पाळत ठेवण्याच्या उद्देशाने 97'मेड-इन-इंडिया'ड्रोनची (Made In India Drone) खरेदी करणार आहे. भारताने यापूर्वी अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता भारतातच तयार केले जाणारे (Made in india) आणखी 97 सक्षम असे ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Telecom Industry Employment: यावर्षी टेलिकॉम क्षेत्रात 1.26 लाख रोजगारनिर्मिती होणार, कुशल युवांना मिळेल संधी

टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (TSSC) ने फिनिश टेलिकॉम गियर निर्माता नोकियाच्या सहकार्याने अहमदाबाद येथील कौशल्या-द स्किल युनिव्हर्सिटी कॅम्पस (Kaushalya- The Skill University) येथे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स (Center of Excellence) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामार्फत या आर्थिक वर्षात सुमारे 1.26 लाख तरुणांना दूरसंचार उद्योगात नोकऱ्या मिळणार आहेत.

Read More