Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Industrial License 2023: औद्योगिक परवाना आता 3 ऐवजी 15 वर्षांसाठी मिळणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

केंद्र सरकारने की IDR कायद्यांतर्गत जारी केलेले सर्व औद्योगिक परवाने तीन वर्षांच्या ऐवजी 15 वर्षांसाठी वैध असतील. उद्योग विकास आणि नियमन (IDR) कायद्यांतर्गत उद्योगांना परवाने देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 15 वर्षांचा परवाना दिला जाणार असला तरीही वेळोवेळी याबाबत कंपन्यांवर देखरेख देखील ठेवली जाणार आहे.

Read More

सावधान! 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कॅश व्यवहार करताय? आयकर विभागाची येईल नोटीस

हॉटेल, लक्झरी बँक्वेट्स, महागडी शॉपिंगची दुकाने, IVF सेंटर्स, डिझायनर शॉपिंग सेंटर्स सह इतरही आस्थापने जेथे नागरिक रोखीने व्यवहार करतात. असे सर्व व्यवहार आता आयकर विभाग पडताळून पाहणार आहे. तसेच आर्थिक व्यवहार करताना कुटुंबातील अनेकांची पॅनकार्ड वापरली असतील तर अशा व्यवहारांचीही तपासणी होणार आहे.

Read More

Career Opportunities : कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कोणत्या? माहित करून घ्या

Career opportunities in agriculture sector : काळानुसार प्रत्येक क्षेत्रात नोकरीच्या संधी भरपूर आहेत. पण, त्यासाठी धडपड खूप करावी लागते त्याचबरोबर माहितीही असावी लागते. तरुण वर्गाचा कल शेती क्षेत्राकडे वाढला आहे. त्यांनाही यात भरपूर संधी आहेत. त्या कोणत्या जाणून घेऊया.

Read More

मेगा प्रोजेक्ट! 7 हजार कोटींचं मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचं कंत्राट L&T ला मिळालं

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचे एकूण अंतर सुमारे 508 किलोमीटर आहे. यापैकी 135.45 किलोमीटर मार्ग तयार करण्याचे काम कंपनीला मिळाले आहे. हाय स्पीड रेल्वेमुळे मुंबई-अहमदाबाद अंतर 2 तासात कापता येईल.

Read More

Vodafone Idea Crisis: व्होडाफोन आयडियाचा पाय आणखी खोलात; आर्थिक चणचणीमुळे बँक गॅरंटी मिळेना

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोनच टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असून व्होडाफोन आयडियाचे (Vi) ग्राहक कमी होत आहेत. नेटवर्क सक्षम करण्यास कंपनीकडे पुरेसा पैसा नाही. तसेच गुंतवणूकदारही पैसे लावण्यास तयार नाहीत. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती खालावली आहे.

Read More

Edible Oil Price: जगभरात खाद्यतेलाचे भाव कमी, भारतात मात्र लक्षणीय वाढ! कारणं काय?

Edible Oil Price: जगभरात सध्या खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र भारतात अद्याप खाद्यतेलाचे दर चढेच आहेत. जगभरातल्या मागच्या काही महिन्यातल्या घडामोडी पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली. मात्र भारतातल्या किंमती त्यानुसार कमी झालेल्या नाहीत.

Read More

Go First Airlines ची उड्डाणे 25 जुलै पर्यंत रद्द, आर्थिक अडचणीवर मार्ग निघेना!

जेव्हापासून कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाली आहे, तेव्हापासून कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर पगार दिलेले नाहीत. या अडचणींचा सामना करत असलेल्या एअरलाइन्सने अनेकांना कामावरून काढून टाकले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या प्रवाशांना पुरेशी सेवा देण्यासाठी देखील कंपनीकडे मनुष्यबळ नाहीये. त्यामुळे कंपनीने 25 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Read More

भारतीय पासपोर्टवर 57 देशांमध्ये विना व्हिसा फिरता येणार; जाणून घ्या हे 57 देश

Henley Passport Index Ranking 2023: जागतिक पासपोर्ट इंडेक्स रिपोर्ट 2023 मध्ये सिंगापूरच्या पासपोर्टने जपानला मागे टाकत पहिल्या क्रमांक पटकावला आहे. या पासपोर्टवर 192 देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची गरज पडणार नाही.

Read More

Adani Group: गौतम अदानींचे दोन व्यवसाय विक्रीला; बेन कॅपिटल खरेदी करणार 90% समभाग

अदानी कॅपिटल आणि अदानी हाऊसिंगमध्ये बेन कॅपिटल ही कंपनी 90% गुंतवणूक करणार आहे. या व्यवहारामुळे गौतम अदानी यांची दोन्ही कंपन्यांतील कौटुंबिक मालकी संपुष्टात येईल. या व्यवहाराला मंजूरी मिळाली असून चालू वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल.

Read More

Twitter New Logo: ट्विटरला नवा लोगो मिळणार! एलन मस्क यांनी शेअर केली नव्या लोगोची आयडिया

एलन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याची घोषणा केली आहे. आता आयकॉनिक पक्षाऐवजी 'X' लेटर ट्विटरचा नवा लोगो असेल. आज (सोमवार) सायंकाळपर्यंत ट्विटरचा लोगो बदललेला असेल, असेही मस्क यांनी म्हटले आहे. लोगो बदलण्याचा निर्णय मस्क यांनी दोन दिवसांत अमलात आणल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Read More

Provident Fund वरील व्याज कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट

2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मंडळाने निश्चित केलेल्या EPF वर 8.15% व्याजदराला वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याचाच अर्थ पीएफ मधील गुंतवणुकीवर ग्राहकांना यावर्षी घवघवीत 8.15% व्याजदर मिळणार आहे.

Read More

Free Sanitary Pads: विद्यार्थीनींना शाळेत मोफत सॅनिटरी पॅड मिळणार का? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

शालेय विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणार का? या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 6 वी ते 12 वी पर्यंतचे शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक पाळी काळात स्वच्छतेसाठी मोफत सॅनिटरी पॅड मिळावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर आज सुनावणी आहे.

Read More