Adhik Maas 2023 : दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजेच भगवान विष्णूचा आवडता महिना आहे असे मानले जाते. यालाच मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. 18 जुलै 2023 पासून अधिक मास सुरू झाला असून तो 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सौर वर्ष आणि चांद्र वर्षातील फरक संतुलित करण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिकमास येते.
Table of contents [Show]
अधिक मास कशाला म्हणतात?
भारतीय मोजणी पद्धतीनुसार, प्रत्येक सौर वर्ष 365 दिवस आणि सुमारे 6 तासांचे असते, तर चंद्र वर्ष 354 दिवसांचे मानले जाते. दोन वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक आहे, जो दर तीन वर्षांनी सुमारे 1 महिन्याचा होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्याला अधिक मास म्हणतात. अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त दान केले जाते. मंदिरात, गोरगरिबांना आणि नवीन लग्न झालेल्या मुली व जावयाला अधिक महिन्यात दान देणे शुभ मानले जाते. तुमच्या जावयाला अधिक महिन्यात काय दान कराल? जाणून घ्या, काही आयडिया.
अधिक मासमध्ये धातूपासून बनलेल्या वस्तूचे दान
दान हे नेहमी आपल्याला जमेल तसे केले जाते. परंतु काही वेळा आपल्या मुलीला सासरी काय म्हणतील? बोलतील का? या भीतीने आईवडील आवाक्या बाहेर खर्च करतात. पण आता तसे नाही, आता मार्केटमध्ये सोन्याची, चांदीची, तांबे, पितळची भांडी, भेटवस्तू मुबलक किमतीमध्ये मिळतात. ज्यामुळे तुम्ही दानही करू शकता आणि मानही राखू शकता. पुढील वस्तु देऊ शकता जावयाला भेट.
निरंजनी दिवा
मार्केटमध्ये सध्या वेगवेगळ्या डिझाईनच्या निरंजनी बघायला मिळतात. त्यात चांदी, तांबे, पितळ या तिन्ही धातुपासून बनलेल्या निरंजनी असतात. तुम्हाला जावयाला तांब्याचे दान करायचे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला हवी ती निरंजनी तुम्ही दान करू शकता. याची किंमत धातूनुसार वेगवेगळी असेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊन आपल्या जावयाला भेट म्हणून देऊ शकता. यामध्ये सुद्धा अनेक प्रकार येतात.
कृष्ण, गणपती मूर्ती
कृष्ण आणि गणपती मूर्ती मुलीला लग्नात सुद्धा दिली जाते. तुम्ही अधिक महिन्यामध्ये सुद्धा पितळ, चांदीची, सोन्याची मूर्ती मुली व जावयाला भेट म्हणून देऊ शकता. आता ट्रेंडमध्ये असलेले मूर्तीचे आकार सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. या मूर्ती देण्यासाठी आकर्षकही वाटतात आणि चांगल्या कामाची सुरवात करण्यासाठी शुभ आशीर्वाद सुद्धा तुम्ही देऊ शकता.
सोने, चांदी, पितळ, तांबे या चारही धातुपासून बनलेले भांडे
या अधिक मासमध्ये तुम्ही जावयाला ताट, प्लेट, वाटी, ग्लास यापैकी कोणतेही भांडे देऊ शकता. प्रत्येक भांड्याचे काही न काही धार्मिक महत्व असते. त्या विचाराने तुम्ही ही भेट जावयाला भेट म्हणून देऊ शकता. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा आहे. विदर्भात जावयाला तांब्याची भांडी देऊन त्यांचा मानपान केला जातो, तर काही ठिकाणी चांदी, सोन्याची भांडी दिली जाते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            