Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Infra Bond: गुंतवणुकीची संधी! स्टेट बँक ऑफ इंडिया 10 हजार कोटींचे इन्फ्रा बाँड बाजारात आणणार

Investment in bonds

Image Source : www.economictimes.indiatimes.com

स्टेट बँक ऑफ इंडिया 10 हजार कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर बाँड बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. गुंतवणुकीवर निश्चित परतावा पाहिजे असल्यास हे बाँड एक चांगला पर्याय आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे बाँड बाजारात येऊ शकतात.

SBI Infra Bond: निश्चित परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 10 हजार कोटींचे इन्फ्रा बाँड बाजारात आणणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. दीर्घकालीन कर्जासाठी बाजारात मोठी मागणी असल्याने SBI हे बाँड बाजारात आणणार आहे. 

जुलै महिनाअखेरीस बाजारात येणार?

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे बाँड बाजारात येऊ शकतात. बाँड बाजारात आणण्यासाठी बँकेला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. यापूर्वी SBI ने जानेवारी महिन्यात इन्फ्रा बाँड इश्यू केले होते. त्यातून 9,718 कोटी रुपये उभारले होते. आता पुन्हा 10 हजार कोटी रुपये बाँड विक्री करून SBI पैसे उभारणार आहे. 

इन्फ्रा बाँड म्हणजे काय?

राज्य, केंद्र सरकारे, बँका, सरकारी उद्योग, अधिकृत खासगी उद्योगांना बाँडची विक्री करून निधी पुरवठा केला जातो. हे बाँड सर्वसाधारणपणे 10 ते 15 वर्षांसाठी जारी केले जातात. तसेच त्यांना 5 वर्षांचा लॉक-इन पिरियड असतो. म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर पहिले 5 वर्ष बाँड विकता येत नाहीत. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदार NSE आणि BSE वर बाँडची खरेदी-विक्री करू शकतो.

बाँडमधील गुंतवणूक फायद्याची ठरेल का?

ज्यांना शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीची जोखीम घ्यायची नसेल ते निश्चित परतावा देणाऱ्या बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात. या बाँडमधून आकर्षक परतावा देखील मिळतो. एसबीआय बाँडवर किती व्याजदर मिळेल हे येत्या काही दिवसांतच समजेल.

बाँडमध्ये तुलनेने जोखीम कमी असते. बाँड मार्केट मागील वर्षापासून वाढत आहे. 2022-23 आर्थिक वर्षात बाँडद्वारे 8.2 लाख कोटी रुपये उभे केले. तर चालू वर्षी 9 लाख कोटींचे बाँड बाजारात येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.